Kishori Pednekar sakal media
मुंबई

BMC : रस्ते अभियंत्यांवर अतिरिक्त भार; महापौरांचा संताप

- समीर सुर्वे

मुंबई : खड्डे दुरुस्तीसाठी (potholes) प्रत्येक प्रभागात नियुक्त करण्यात आलेल्या रस्ते अभियंत्यांवर (Engineer) अतिरिक्त जबाबदारी (Extra responcibilty) सोपविण्यात आली आहे. असा गौप्यस्फोट आज महापौर किशोरी पेडणेकर (kishori pednekar) यांनी केला. तर, दुसऱ्या बाजूला भाजपने 927 खड्डे बुजविण्यासाठी महानगरपालिकेने (bmc) 48 कोटी रुपयांचा खर्च केला असल्याचा आरोप भाजपचे आमदार आशिष शेलार (Ashish Shelar) यांनी केला.

महापौरांनी आज कुर्ला तसेच पुर्व उपनगरातील रस्तांची पाहाणी केली. कुर्ला येथील पाहाणीत रस्त्यावर पडलेले खड्डे बघून महापौरांनी तिव्र नाराजी व्यक्त केली.पावसाने उघडीप दिल्यावर खड्डे दुरुस्ती झालीच पाहिजे.गणपती विसर्जनानंतरही रस्त्यावर खड्डे असतील तर गंभिर बाब आहे.खड्डे दुरुस्तीसाठी प्रत्येक प्रभागात रस्ते अभियंत्यांची नियुक्ती केली आहे.मात्र,या अभियंत्यावर अतिरीक्त जबाबदारी देण्यात आली आहे.अशा शब्दात महापौरांनी प्रशासकीय कामाकाजावर नाराजी व्यक्त केली आहे.या प्रकरणाची चौकशीही करणाार असल्याचे त्यांनी सांगितले.

महापाैरांनी खड्ड्यांवर प्रशासनाला धारेवर धरलेले असताना भाजपने खड्डे दुरुस्तीत नव्या घोटाळ्याचा आरोप केला आहे.पालिकेने खड्ड्याबाबत जे पोर्टल तयार केले त्यावर केवळ 927 खड्डे असल्याचे नमूद झाले आहे. महापालिका दररोज नवी हसवणूकीची स्पर्धाच करते आहे असे चित्र आहे. केवळ खड्डे बुजवण्यासाठी 48 कोटींचा निधी मंजूर करण्यात आला मग तो या 927 खड्यांसाठीच होता का? असा सवाल ही आशिष शेलार यांनी केला. यामध्ये मोठा भ्रष्टाचार आहे त्याची चौकशी सुरु आहे चौकशीत सत्य समोर येईलच.

वरळी कलानगर बाहेर मुंबई आहे का ?

पूर्ण मुंबईचे, संपूर्ण क्षेत्रफळ तुमच्या डोळ्यांसमोर कधी असतं का? संपूर्ण मुंबईचा नकाशा विकासासाठी कधी तुम्ही पाहता का ? याचं कारण नवीन पदपथ करायचा विषय आला की फक्त वरळी. सिग्नल आणि लाईटचे खांब सुशोभित करायचे असतील तर वरळी मुंबईत सर्वत्र ब्रिज आहेत पण पुलाच्या खाबांचे सुशोभीकरण फक्त वरळीत होते. आता थ्रीडी मॅपिंगही वरळीचे करण्यात येत आहे. आणि पाण्याचा निचरा करणारे पंप बसवायचे असतील तर मग कलानगर.वरळी आणि कलानगर पलिकडे मुंबई आहे की नाही? असा सवालही शेलार यांनी केला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Raj Thackeray: उद्धव ठाकरे आणि शिवसेनेपासून राज ठाकरे दूर का होत गेले? वाद ते मनोमिलन timeline

IND vs ENG 2nd Test: शुभमन गिलच्या ३००+ धावा! मोडला विराट कोहलीचा ११ वर्षांपूर्वीचा विक्रम, रिषभ पंतचीही फिफ्टी

Sushil Kedia: माज उतरला, पण गुर्मी कायम; माफीनंतरही नवं ट्विट करत सुशील केडिया पुन्हा बरळले, शहांची स्तुती तर ठाकरेंना...

Divyang Students Demand : दिव्यांग विद्यार्थ्यांची होतेय कुचंबना! ३० जुलैपर्यंत वसतिगृहाचा प्रश्न मार्गी लावा अन्यथा...; विद्यार्थ्यांचा सरकारला इशारा

Raigad News: अलिबाग मार्गावरील कोंडी सुटणार, प्रवाशांचा आरामदायी प्रवास होणार; सरकारचा प्लॅन सत्यात उतरणार

SCROLL FOR NEXT