brother killed sister husband accused arrested by mumbai police crime branch dombivali
brother killed sister husband accused arrested by mumbai police crime branch dombivali sakal
मुंबई

Crime News : भाऊजीच्या मारेकर्‍याला गुन्हे अन्वेषण शाखेकडून अटक...

सकाळ वृत्तसेवा

डोंबिवली : डोंबिवलीत एक धक्कादायक घटना समोर आली आहे. दारू पिऊन शिव्या दिल्याने संतापलेल्या तरुणाने बहिणीच्या चक्क नवऱ्याला चाकूने वार करत हत्या केली आहे. डोंबिवली खंबाळपाडा परिसरात गुरूवारी दुपारच्या सुमारास एक धक्कादायक घटना घडली असून दारू पिऊन शिव्या दिल्याने संतापलेल्या तरुणाने बहिणीच्या चक्क नवऱ्याचा चाकूने वार करत हत्या केली आहे.

या घटनेनं परिसरात मोठी खळबळ उडाली.याप्रकरणी टिळक नगर पोलीस ठाण्यात आरोपी रमेश तेवर विरोधात गुन्हा दाखल करत त्याला अटक केली असून मारीकणी तेवर असं मृत्युमुखी पडलेल्या व्यक्तीचं नाव आहे.

डोंबिवलीजवळच्या खंबाळपाड्यात राहणाऱ्या भाऊजीची हत्या करून मूळ गावी पळण्याच्या तयारीत असलेल्या मेहुण्याला गुन्हे अन्वेषण शाखेच्या कल्याण पथकाने अवघ्या दोन तासांच्या आत अटक केली. रमेश वेलचामी (तेवर) असे या मारेकऱ्याचे नाव असून तो मूळ गावी तामिळनाडू राज्यात पळून जाण्याच्या बेतात होता. मात्र पोलिसांनी त्याला कल्याणच्या रेल्वे प्लॅटफॉर्मवरून अटक केली.

गुरूवारी दुपारच्या सुमारास कांचनगाव-खंबाळपाड्यात राहणारा मारीकन्नी रामास्वामी (तेवर) या बहिणीच्या पतीचा चाकूने वार करून त्याची हत्या केल्यानंतर मेहुणा रमेश वेलचामी बेपत्ता झाला. एकीकडे स्थानिक टिळकनगर पोलिस त्याचा शोध घेत होते. तर दुसरीकडे गुन्हे अन्वेषण शाखेच्या कल्याण पथकानेही समांतर तपास सुरू केला.

वरिष्ठ पोलिस निरीक्षक किशोर शिरसाठ यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक शशांक शेळके, उपनिरीक्षक मोहन कळमकर, जमादार संजय माळी, प्रशांत वानखेडे, प्रविणकुमार जाधव, विकास माळी, रमाकांत पाटील, किशोर पाटील, बापूराव जाधव, विश्वास माने, उल्हास खंडारे, बालाजी शिंदे, गोरखनाथ पोटे, विलास कडू, गुरूनाथ जरग, विनोद चन्ने, राहुल ईशी यांच्या वेगवेगळ्या पथकांकडून फोटो,

तसेच मोबाईलच्या नंबरसह तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे मारेकर्‍याचा शोध घेतला जात होता. कल्याणच्या रेल्वे स्थानक प्लॅटफार्म क्र. 6 या मुंबईच्या दिशेकडील पुलाजवळ पथकाने रमेश वेलचामी याला ताब्यात घेतले. चौकशीदरम्यान रमेश वेलचामी याच्याजवळ गाडी क्र. 22157 चैन्नई एग्मोर या जलद गाडीचे ई-तिकीटआढळून आले. त्याने कांचनगाव-खंबाळपाड्यात राहणारा मारीकन्नी रामास्वामी (तेवर) या बहिणीच्या पतीचा खून केल्याची कबुली दिल्याचे वपोनि किशोर शिरसाठ यांनी सांगितले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai News: 'डायल 108' अ‍ॅम्ब्युलन्स प्रोजेक्ट कंत्राट प्रकरण तापणार? हायकोर्टाकडून राज्य सरकारला नोटीस

Pat Cummins: कमिन्सनं सांगितलं कसं तुटलेलं त्याचं बोट... ऐकून हार्दिक अन् सूर्याही झाले शॉक; Video व्हायरल

Latest Marathi News Live Update : 'तीन टप्प्यांनंतर हे स्पष्ट झालंय की भाजपचा विजय रथ जनता पुढे नेतेय..' - पंतप्रधान मोदी

Wedding Season : नोंदणी पद्धतीने विवाह करायचा आहे? मग, जाणून घ्या सोपी प्रक्रिया

18 आमदारांची प्रतिष्ठा लागली पणाला; नेत्यांच्या कामगिरीवरच लोकसभेच्या उमेदवारांचं भवितव्य अवलंबून!

SCROLL FOR NEXT