kem
kem 
मुंबई

केईएमच्या वादग्रस्त बंगल्याच्या अफवा कायम 

नेत्वा धुरी

मुंबई : परळ येथील हाफकिन कार्यालयासमोर मोठ्या दिमाखात वसलेल्या केईएम अधिष्ठाता बंगल्यात राहण्यास नव्याने अधिष्ठाता पदाचे पदभार स्विकारलेल्या डॉ हेमंत देशमुख यांनी नकार दिला आहे. या अधिष्ठाता निवासात राहण्यास नकार देणारे डॉ हेमंत देशमुख हे पाचवे अधिष्ठाता ठरले आहेत. हा बंगला भूतबंगला असून, या बंगल्यात राहायला जाणारा अधिष्ठाता पदावर जास्त काळ टिकत नाही, असा समज केईएम वर्तुळात आहे. 

परळ येथील केईएम या पालिका रुग्णालयाला बुधवारी नवे अधिष्ठाता मिळाले. परंतु अधिष्ठाता निवासाबाबत असलेल्या अफवांबाबत नव्याने नियुक्त झालेल्या डॉ हेमंत देशमुख यांनीही राहण्यास नकार दिल्याने पुन्हा चर्चांना उधाण आले आहे. केईएम रुग्णालयाचे माजी अधिष्ठाता डॉ संजय ओक हे शेवटचे अधिष्ठाता ठरले. त्यांच्या कारकिर्दीत रुग्णालयातील प्रस्तावित दोन एमआरआय मशीनबाबत वाद निर्माण झाला. या वादानंतर डॉ ओक यांनी 23 वर्षांच्या कारकिर्दीनंतर राजीनामा दिला. या वादावर त्यांना पालिकेकडून नंतर क्‍लिनचीटही मिळाली. ओक यांच्या राजीनाम्यानंतर नियुक्त झालेलेल केईएमचे अधिष्ठाता डॉ मुरारी येवलेकर यांनी अधिष्ठाता निवासात राहायला नकार दिला. डॉ येवलेकर सायन येथील निवासस्थानातच राहणे पसंत केले. परंतु त्यांच्यावर गरीब रुग्ण निधीतील दोन कोटी रुपयांच्या घोटाळ्यात अडकले. सेवानिवृत्तीच्या शेवटच्या दिवशी दोन कोटीच्या घोटाळ्यात त्यांना दोषी मानले गेले. 

यानंतर डॉ संध्या कामत यांनी केईएमच्या अधिष्ठाता पदाची सूत्रे स्विकारली. त्यांनी आजारपणामुळे दोन वर्षानंतर अधिष्ठाता पदाचा राजीनामा दिला. डॉ कामत पेडर रोडयेथील निवासस्थानातून केईएमला ये-जा करत होत्या. त्यानंतर प्रभारी अधिष्ठाता पदी डॉ शुभांगी पारकर यांनी कार्यभार स्विकारला. परंतु वयोवृद्द पालक आणि अगोदरपासूनच केईएम संकुलात राहत असल्याने त्यांनी अधिष्ठाता बंगल्यात राहणे नाकारले. पारकर यांनी मानसोपचारतज्ज्ञ विभागाच्या प्रमुख पदाचा कार्यभार, वैयक्तिक आयुष्यातील घडामोडी यांच्यामुळे अधिष्ठाता पद वर्षभरातच सोडले. त्यावेळी वर्षभरापासून टिळक रुग्णालयाच्या अधिष्ठाता पदावरील डॉ अविनाश सुपे यांनी तातडीने केईएम रुग्णालयाच्या अधिष्ठाता पदाची सूत्रे स्विकारली. मात्र चेंबूरमधील निवासस्थानच आपल्याला योग्य असल्याचे सांगत डॉ सुपे यांनीही अधिष्ठाता निवासात राहणे पसंत केले नाही. डॉ सुपेनंतर डॉ देशमुख यांची अधिष्ठाता पदावर नियुक्ती झाली. 

अधिष्ठाता निवास हा भूतबंगल आहे, असे मी मानत नाही. सध्या राहत असलेल्या घरापासून केईएम रुग्णालयात पाच मिनिटांत चालत जाता येते. अधिष्ठाता पदासह केईएममधील रेडिओलॉजी विभागाचे प्रमुखपदाचा कार्यभार तसेच ऑर्थोपॅडीक सेंटर येथेही येणे जाणे असते. त्यासाठी आताचे घर जास्त योग्य आहे. 
- डॉ. हेमंत देशमुख, नवनियुक्त अधिष्ठाता, केईएम रुग्णालय

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

KKR vs DC : दिल्ली पॉईंट टेबलमध्ये मोठी उसळी घेणार की जेक फ्रेसर मॅर्कगर्कला केकेआर रोखणार?

CSK vs SRH IPL 2024 : चेन्नईनं पुन्हा जिंकला चेपॉकचा गड; हैदराबादची इतिहासातील सर्वात मोठी हार

Sambhajinagar : राज्यातील पहिल्या मोसंबी ग्रेडींग व्हॅक्सीन व कोल्ड स्टोरेज केंद्राचे काम पूर्णत्वाकडे

Share Market : शेअर बाजारातील किरकोळ गुंतवणूकदारांच्या संखेत वर्षात ४.०३ कोटींची वाढ; देशात 'हे' राज्य आघाडीवर

Pune Traffic Updates : पुणे विद्यापीठ चौकातील मेट्रोच्या कामानिमित्त वाहतुकीत बदल

SCROLL FOR NEXT