मुंबई

अमिताभ यांना पाहण्यासाठी आलेल्या युपी मधील व्यावसायिकावरील हल्ला प्रकरणी जुहू पोलिसांनी दोघांना घेतलं ताब्यात

सुमित बागुल

मुंबई : गेल्या काही दिवसांपूर्वीच मुंबईत आलेल्या एका व्यावसायिकाला मारहाण झाल्याची दुर्दैवी घटना जुहूमध्ये घडली होती. या घटनेचा तपास लावत आता मुंबईतील जुहू पोलिसांनी आरोपींच्या मुसक्या आवळ्यात. मुंबईत गेल्या काही दिवसांपूर्वी उत्तर प्रदेशातून आलेल्या ३५ वर्षीय कापड व्यावसायिकाला मारहाण आणि लुटण्याच्या प्रकार घडला होता. या बाबतीत मुंबईतील जुहू पोलिसांनी कारवाई करत दोघांना अटक केलीये. शनिवारी रात्री मुंबई पोलिसांकडून ही कारवाई करण्यात आलीये.  

लॉकडाऊनच्या नियमांचं उल्लंघन  करून अकील शेख नामक व्यक्ती मुंबईत आली होती. जुहू इथल्या रस्तयावर उभं राहून अमिताभ यांची एक झलक तरी मिळेल असं या व्यक्तीला वाटत होतं. ही व्याक्ती एकटी उभी असल्याचं पाहत दोन भामट्यांनी अकील शेख यावर हल्ला करत मोबाईल आणि पाकीट चोरलं होतं. सदर घटना ४ जुलै रोजी घडलीये. याप्रकरणी पोलिसांनी भाईंदरमध्ये वास्तवास असणारा संजय गोपी खारवा उर्फ राजेन्द्र उर्फ खिडकी याला आणि माटुंगा लेबर कॅम्पमध्ये राहणारा सुरेश कानजी खारवा या दोघांना अटक केलीये. 

या आरोपींची सर्वात आधी अकील शेखला एकटाच असल्याचं पाहून त्याला दारू पिणार का म्हणून विचारलं. अकील शेख यांनी नकार दिल्यानंतर त्याला हे दोघे सुनसान जागी घेऊन गेलेत. तिथे पुन्हा त्यांनी अकील शेख या व्यक्तीला दारू पिण्यास सांगितलं. अकील यांनी नकार दिल्यानंतर अकील शेख आणि या दोघांमध्ये वादावादी सुरु झाली. या वादावादीनंतर यातील एकाने अकील यांच्या हातावर, पोटात आणि छातीत चाकूने सपासप वार केलेत. शेख यांच्यावर हल्ला केल्यानंतर या भामट्यांनी अकील शेख यांचा मोबाईल आणि पाकीट घेऊन तिथून पळ काढला. याबाबत जुहू पोलिस स्टेशनचे वरिष्ठ इन्स्पेक्टर पंढरीनाथ वाव्हळ यांनी माहिती दिलीये.       

या दुर्दुवी घटनेननंतर तिथल्या काही स्थानिक लोकांनी जखमी तरुणाला कुपर हॉस्पिटलमध्ये दाखल केलं. सध्या या तरुणावर उपचार सुरु आहेत. परिसरातील CCTV तपासल्यानंतर या दोघा संशयितांची ओळख पटली. सब इन्स्पेक्टर हरीश बिरादार यांच्या माहितीप्रमाणे या दोघांना पुष्प पार्कमधून अटक करण्यात आलीये. 

business man who came to see actors was attacked by duo arrested by mumbai police

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Shocking News : वडिलांनी शेत विकून घर बांधायला ठेवले १४ लाख, १३ वर्षांच्या मुलाने ऑनलाईन गेममध्ये गमावले अन्... धक्कादायक घटनेने सगळेच हादरले

Rahul Gandhi Video : ''भारतात तुम्ही मला सुरक्षा देऊ शकत नाही का?'', राहुल गांधींची पोलिसांबरोबर बाचाबाची, नेमकं काय घडलं? पाहा VIDEO

हिंदूंची जमीन मुस्लिमांच्या नावे केल्याचे आरोप, महिला अधिकाऱ्याच्या निवासस्थानी छापे; ९० लाखांची रोकड अन् कोट्यवधींचं सोनं जप्त

Latest Marathi News Updates : ऑक्टोबरपासून रेल्वे तिकीट बुकिंगमध्ये मोठा बदल!

Mumbai Health Report: राज्यात पावसाळी आजारांचा कहर; मुंबईत सर्वाधिक रुग्णांची नोंद

SCROLL FOR NEXT