Call for Give water at the entrance of Ulhasnagar Municipal Corporation
Call for Give water at the entrance of Ulhasnagar Municipal Corporation 
मुंबई

उल्हासनगर पालिकेच्या प्रवेशद्वारावर 'पाणी द्या'ची हाक

दिनेश गोगी

उल्हासनगर : गेल्या अनेक महिन्यांपासून नळांना पिण्याच्या पाण्याचा थेंबही येत नसल्याने संतप्त झालेल्या पॅनल नंबर 3 च्या नागरिकांनी आज दुपारी उल्हासनगर पालिकेवर हंडामोर्चा काढून प्रवेशद्वारावरच "द्या रे द्या, पाणी द्या'ची'हाक दिली.

पॅनल 3 मध्ये शिवसेना भाजपचे प्रत्येकी दोन-दोन नगरसेवक असून बऱ्याच भागातील नळांना पिण्याचे पाणीच येत नाही. याबाबत भाजपच्या नगरसेविका आशा बिऱ्हाड़े, नाना बिऱ्हाड़े सातत्याने पालिकेकडे पाठपुरावा करत होते. मात्र, कोणताही प्रतिसाद मिळत नसल्याने आणि नागरिकांचा घसा कोरडा राहत असल्याने नाना बिऱ्हाडे, शोभा खैरे, तुकाराम सोनवणे, अशोक खैरे, सुनिल सोनवणे, प्रताप सरदार, अनिल पारवानी यांच्या नेतृत्वाखाली महिलांनी पालिकेवर हंडा मोर्चा काढून प्रवेशद्वारावरच पालिकेच्या विरोधात घोषणाबाजी करून द्यारे द्या पाणी द्याची हाक दिली.

शिष्टमंडळाने मुख्यालय उपायुक्त संतोष देहरकर यांची भेट घेतली असता,चार-पाच दिवसांत पाण्याची नवीन लाईन टाकण्याचे काम हाती घेतले जाणार. तोपर्यंत टँकरने पाणीपुरवठा केला जाईल, असे आश्वासन देहरकर यांनी दिल्याची माहिती नाना बिऱ्हाडे यांनी दिली.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

ब्लड रिपोर्ट बदलण्यासाठी विशाल अग्रवालचे डॉ तावरेंना 14 कॉल, पुणे पोर्शे अपघातात पोलिसांकडून नवा खुलासा!

Pakistan: जगाचे डोळे उघडणारे सत्य आलं समोर! वाजपेयींचे नाव घेत नवाज शरीफांनी दिली मोठी कबुली

Kolhapur : महिलेचा गर्भपात करताना मृत्यू; जयसिंगपुरात गर्भलिंग निदान, गर्भपाताचे रॅकेट? शहरात उडाली खळबळ

Nursing Entrance Exam : नर्सिंग प्रवेश परीक्षेसाठी शिक्षक वेठीस; १५ तासांपूर्वी उपस्थित राहण्यासाठी पत्र

Pune Porsche Car Accident: पोर्श अपघात प्रकरणी ससूनचा डॉक्टर तावरेच्या घरी पोलिसांंची धाड

SCROLL FOR NEXT