former BJP corporator Manoj Rai
former BJP corporator Manoj Rai sakal
मुंबई

Dombivali Crime : लग्नाचे आमिष दाखवून फसवणूक व लैंगिक अत्याचार; भाजपचे माजी नगरसेवक मनोज राय यांच्याविरोधात गुन्हा दाखल

शर्मिला वाळुंज

डोंबिवली - कल्याण पूर्वेतील कैलासनगर परिसराचे भाजपचे माजी नगरसेवक मनोज राय यांच्या विरोधात कोळसेवाडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. लग्नाचे आमिष दाखवून फसवणूक व लैंगिक अत्याचार केल्याचा आरोप एका 40 वर्षीय महिलेने राय यांच्यावर केला असून सदर महिलेच्या तक्रारीवरून पोलिसांनी गुन्हा दाखल करत तपास सुरू केला आहे.

भारतीय जनता पक्षाचे माजी नगरसेवक तथा विकासक मनोज राय हे विकासक देखील आहेत. तक्रारदार 40 वर्षीय महिला ही गृहिणी असून पीडित महिलेने कोळसेवाडी पोलीस ठाण्यात दाखल केलेल्या तक्रारीनुसार सन 2015 ते मे 2022 या कालावधीत भाजपचे माजी नगरसेवक मनोज राय यांनी महिलेस लग्नाचे आमिष दाखवून वेळोवेळी शारीरिक संबंध प्रस्थापित केले. त्यातून त्या चार वेळा गर्भवती राहिल्या.

गर्भवती राहिल्यानंतर राय यांनी त्यांस दमदाटी, शिवीगाळ, मारझोड आणि धमकी देऊन गर्भपात करण्यास जबरदस्तीने भाग पाडले. आपण या प्रकरणी कोठे बोलू नये म्हणून आपणास सतत मारहाण केली जात होती. आता हा सगळा प्रकार असह्य झाल्याने आणि आपणास लग्नाचे आमिष दाखवूनही ते मागील नऊ वर्षाच्या कालावधीत न पाळल्याने आपण ही तक्रार माजी नगरसेवक मनोज राय यांच्या विरूद्ध करत आहोत, असे महिलेने तक्रारीत म्हटले आहे.

कोळसेवाडी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र शिरसाट यांनी या तक्रारीची गंभीर दखल घेऊन या प्रकरणाचा तपास सुरू केला आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Kalyan Loksabha: प्रशासनाचा भोंगळ कारभार, मतदार यादीत नाव नसल्याने मतदार हैराण

HSC Result 2024 : उद्या लागणार बारावीचा निकाल, गुणपडताळणी कशी करायची ? एका क्लिक मध्ये जाणून घ्या

Google Map Address Update : गुगल मॅपवर पत्ता बदलणे आता तुमच्या हातात ; फॉलो करा 'या' ट्रिक्स

Maharashtra Lok Sabha 2024 Phase 5 Election Voting LIVE: पवईतील हिरानंदानी मतदार केंद्रावर दोन तासांपासून मतदारांच्या रांगा

Kolhapur Lok Sabha : लोकसभा निकालाची उत्सुकता शिगेला; कार्यकर्त्यांत लागल्या पैजा, सट्टाबाजारातही उलाढाल जोरात

SCROLL FOR NEXT