मुंबई

CAPF चे साधारणतः २४०० जवान येणार महाराष्ट्रात ! मुंबई पुण्याला येणार का छावणीचं रूप?

सकाळन्यूजनेटवर्क

मुंबई - महाराष्ट्रात CAPF म्हणजेच  केंद्रीय सशस्त्र पोलिस दलाच्या २० कंपन्या पाठवण्याची महाराष्ट्राचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी केंद्राकडे मागणी केले होती. यावर तात्काळ निर्णय घेत केंद्रीय गृहमंत्रालयाकडून महाराष्ट्राच्या या मागणीला मान्यता देण्यात आलेली आहे. त्यामुळे येत्या काळात महाराष्ट्रातील आणि मुख्यत्वे मुंबई पुण्यातील रस्त्यांवर CAPF चे जवान पाहायला मिळणार आहेत. एका CAPF तुकडीत साधारणतः १२० जवान असतात. त्यामुळे साधारणतः २४०० CAPF चे जवान आता महाराष्ट्रात दाखल होणार आहेत. 

येत्या काळात रमझान ईदचा सण येऊ घातलाय. अशात पोलिसांना देखील विश्रांती देण्याची गरज असल्याने महाराष्ट्राचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी केंद्राकडे याबाबत मागणी केली होती.    

CAPF बोलावण्यामागील ३ प्रमुख मुद्दे :

  • मुंबई महाराष्ट्रात कोरोनाच्या केसेस वाढताना पाहायला मिळतायत. अशात महाराष्ट्रातील पोलिसांना दिवसरात्र काम करायला लागतंय यामुळे पोलिसांवर प्रचंड ताण पडतोय. 
  • महाराष्ट्रात एक हजारांहून अधिक पोलिसांना कोरोनाची लागण झालीये, पोलिस अधिकारी आणि कर्मचारी कोरोनाग्रस्त झाल्याने त्यांच्यासोबतच्या पोलिसांना क्वारंटाईन करण्यात आलंय, यामुळे देखील पोलिसांवरील ताण वाढतोय 
  • सध्या रमझानचा महिना सुरु आहे. येत्या २५ तारखेला ईद आहे. यावेळी काही ठिकाणी लॉ अँड ऑर्डर व्यवस्थित राखली जावी 

हे मुद्दे रास्त असल्याचं म्हणत येत्या काळात केंद्राकडून राज्यांना हवी ती मदत दिली जाईल असं देखील केंद्राकडून स्पष्ट करण्यात आलंय. त्यामुळे येत्या काळात मुबई पुण्याचं रूपांतर छावणीत झालं तर वावगं वाटायला नको. 

central home ministry gave permission to send 20 CAPF companies in maharashtra  

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Asian Games 2026: भारताला मिळालं ५ वं गोल्ड! नीरु ढंडाने एकाच दिवशी दोन पदकं जिंकून रचला इतिहास

Mumbai Protest: मुंबईत मातंग समाज आक्रमक! अनुसूचित जातींमधील उपवर्गीकरणाच्या समर्थनात उग्र आंदोलन, पोलिसांचा लाठीचार्ज

Maharashtra Sugar Season 2026 : साखर कारखाने 15 ऑक्टोबरपूर्वीही सुरू करा, विरोध डावलून शासनाकडून परिपत्रक जारी; नवा संघर्ष पेटण्याची शक्यता

Marathi News Live Updates: मातंग समाजाचा मुंबईत मोर्चा; सीएसएमटी ते मंत्रालय मार्गावर रस्ता अडवण्याचा प्रयत्न, पोलिसांकडून आंदोलकांची धरपकड

Pune MLC Election: शिक्षक, पदवीधर’ची आजपासून रणधुमाळी ;दोन दिवसांत जागा वाटप; सहा ऑक्टोबर अर्ज दाखल करण्याचा शेवटचा दिवस

SCROLL FOR NEXT