Railway Authorities
Railway Authorities sakal media
मुंबई

रेल्वे अधिकारी, कर्मचारी आठवड्यातील दोन तास देणार स्वच्छतेसाठी

कुलदीप घायवट

मुंबई : मध्य रेल्वेच्या (Central railway) मुख्यालयातील, मुंबई, पुणे, सोलापूर, भुसावळ, नागपूर येथील विभागातील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी सर्वत्र स्वच्छता राखण्याची प्रतिज्ञा (cleanliness pledge) घेतली आहे. प्रत्येक वर्षाच्या 100 तास म्हणजे प्रत्येक आठवड्यातील दोन तास स्वच्छतेसाठी दिले जाणार आहेत. एकदाच वापराच्या प्लास्टिक विरूद्ध जागरूकता निर्माण करण्यासाठी, प्लास्टिकचा वापर (plastic usage) कमी करण्यासाठी आणि स्वत:, कुटुंब, परिसर आणि कामाच्या ठिकाणी स्वच्छतेच्या पुर्ततेसाठी पुढाकार घेण्याचे वचन प्रत्येकाने घेतले आहे.

गुरुवारी, (ता.16) रोजी मध्य रेल्वेचे महाव्यवस्थापक अनिल कुमार लाहोटी यांनी पुणे विभागाच्या निरिक्षणा दरम्यान मिरज रेल्वे स्टेशनवरील रेल्वे अधिकारी आणि कर्मचाऱ्यांसह स्वच्छतेची प्रतिज्ञा घेतली. तर, मध्य रेल्वेचे अतिरिक्त महाव्यवस्थापक बी. के. दादाभोय यांनी अधिकारी, कर्मचाऱ्यांसह सीएसएमटी येथे स्वच्छतेची प्रतिज्ञा घेतली. 'स्वच्छता पाक्षिक' 16 सप्टेंबरपासून 30 सप्टेंबरपर्यंत रेल्वे, ट्रेन, कार्यालये, वसाहती, कार्यशाळा, देखभाल डेपो, रुग्णालये याठिकाणी याठिकाणी केले जाणार आहे. यावेळी प्रत्येक ठिकाण स्वच्छ ठेवण्यावर भर दिला जाईल, असे मध्य रेल्वेकडून सांगण्यात आले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune News: पुणे पोलिसांनी दाखल केला रवींद्र धंगेकर यांच्यावर गुन्हा, काय आहे कारण?

LTTE Ban: राजीव गांधींची हत्या करणाऱ्या संघटनेवरील बंदी आणखी पाच वर्षांनी वाढवली; मोदी सरकारचा निर्णय

The Great Indian Kapil Show: "मुलींसारखे कपडे घालून लोकांच्या मांडीवर बसणे, हे घृणास्पद!"; 'द कपिल शर्मा' शोवर भडकला कॉमेडियन

PM Narendra Modi: मोदींच्या डोक्यावर शिवशाही जिरेटोप ! वाराणसीमधील उमेदवारी अर्जानंतर प्रफुल्ल पटेलांनी केला सत्कार

Marathi News Live Update: नाशिकमध्ये बस-कारचा अपघात; कारमधील तिघांचा जागीच मृत्यू

SCROLL FOR NEXT