PM Narendra Modi: मोदींच्या डोक्यावर शिवशाही जिरेटोप ! वाराणसीमधील उमेदवारी अर्जानंतर प्रफुल्ल पटेलांनी केला सत्कार

PM Narendra Modi: 2014 आणि 2019 च्या दोन्ही सार्वत्रिक निवडणुका पंतप्रधान मोदींनी प्रचंड बहुमताने जिंकल्या होत्या. यावेळी त्यांचा सामना काँग्रेसचे उमेदवार अजय राय यांच्याशी आहे, जे पंतप्रधानांच्या विरोधात इंडिया आघाडीचे उमेदवार आहेत.
Praful Patel felicitated by wearing jiretop to PM narendra Modi
Praful Patel felicitated by wearing jiretop to PM narendra Modiesakal

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लोकसभा निवडणुकीसाठी वाराणसी मतदारसंघातून उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. यावेळी त्यांच्यासोबत उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि चार समर्थक पंडित गणेशवर शास्त्री, बैजनाथ पटेल, लालचंद कुशवाह आणि संजय सोनकर उपस्थित होते. नरेंद्र मोदींनी तिसऱ्यांदा काशीमधून उमेदवारी दाखल केली आहे. याआधी त्यांनी २०१४ आणि २०१९ च्या लोकसभा निवडणुकीत या जागेवरून विजय मिळवला होता.

दरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तिसऱ्यांदा उमेदवारी दाखल केल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे प्रफुल्ल पटेल यांनी नरेंद्र मोदी यांना जिरेटोप घातला आणि सत्कार केला. यावेळी राजनाथ सिंह, अमित शाह, चंद्रबाबू नायडू उपस्थित होते.

यावेळी नरेंद्र मोदी म्हणाले, आज काशीमध्ये आमच्या बहुमोल NDA मित्रपक्षांच्या उपस्थितीने मला सन्मानित केले आहे. आमची युती राष्ट्रीय प्रगती आणि प्रादेशिक आकांक्षा पूर्ण करण्याच्या वचनबद्धतेचे प्रतिनिधित्व करते. आगामी काळात भारताच्या प्रगतीसाठी आम्ही एकत्र काम करू.

Praful Patel felicitated by wearing jiretop to PM narendra Modi
Jalgaon Lok Sabha Constituency : जळगाव लोकसभेतील वाढलेला टक्का कुणाला ठरणार फायदेशीर?

विद्यमान खासदार आणि भाजपचे उमेदवार नरेंद्र मोदी यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात उमेदवारी अर्ज दाखल केला. लोकसभा निवडणुकीच्या सातव्या आणि शेवटच्या टप्प्यात वाराणसीमध्ये 1 जून रोजी मतदान होणार आहे. 4 जून रोजी मतमोजणी होणार आहे.

मोदींनी काल भैरव मंदिरात केली पूजा

उत्तर प्रदेशच्या मुख्यमंत्र्यांनी कालभैरव मंदिराबाहेर पंतप्रधानांचे स्वागत केले. मंदिराबाहेर लोकांनी पुष्पवृष्टी करत 'मोदी, मोदी' आणि 'हर हर महादेव'च्या घोषणा दिल्या आणि पंतप्रधानांचे जंगी स्वागत केले. उमेदवारी दाखल करण्यापूर्वी त्यांनी शहरातील गंगेच्या तीरावर असलेल्या दशाश्वमेध घाटावर पूजा केली.

वाराणसी लोकसभा जागेवर रंजक लढत-

2014 आणि 2019 च्या लोकसभा निवडणुकीत उत्तर प्रदेश काँग्रेसचे प्रमुख राय यांना देखील काँग्रेसने वाराणसीमध्ये पंतप्रधानांच्या विरोधात उभे केले होते, परंतु दोन्ही वेळा त्यांनी तिसरे स्थान मिळवले. लोकसभा निवडणुकीत अजय राय हे तिसऱ्यांदा मोदींशी भिडणार आहेत.

Praful Patel felicitated by wearing jiretop to PM narendra Modi
हवेत उडायचा अन् हवेतच डल्ला मारायचा...110 दिवसात 200 विमानात चोरले मौल्यवान दागिने,  अशी झाली अटक

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com