Mumbai
Mumbai sakal media
मुंबई

मुंबईत हवेचा दर्जा सुधारला: हवा गुणवत्ता निर्देशांक 'मध्यम'

सकाळ वृत्तसेवा

मुंबई : मुंबईतील उष्मा काहीसा कमी झाल्यानंतर प्रदूषणाची (Mumbai Pollution) पातळीही काही प्रमाणात खाली आली आहे. मुंबईतील हवेचा दर्जा (Air quality) ‘तीव्र प्रदूषणा’वरून सुधारला असून हवेच्या दर्जाची ‘मध्यम’ नोंद झाली आहे. मुंबई शहरात आज हवा गुणवत्ता निर्देशांक १२१ नोंदवला गेला. हवेच्या दर्जाचीही ‘मध्यम’ अशी नोंद झाली आहे. भांडुप आणि वरळीमध्ये प्रदूषणाचा (pollution level) स्तर सुधारला असून तेथे हवा गुणवत्ता निर्देशांक अनुक्रमे ८४ व ८० सह ‘समाधानकारक’ नोंदवला गेला.

कुलाबा, बोरिवली, बीकेसी आणि चेंबूरमधील प्रदूषणाची पातळी मागच्या तुलनेत कमी झाली आहे. कुलाबा ११३, बोरिवली ११५, बीकेसी ११० आणि चेंबूर १०८ अशा हवा गुणवत्ता निर्देशांकासह हवेचा दर्जा ‘मध्यम’ नोंदवला गेला. मालाड, माझगाव आणि अंधेरीमध्ये मात्र प्रदूषणाची समस्या कायमच आहे. तेथील हवेचा दर्जा अद्याप ‘वाईट’ आहे. मुंबईतील सर्वाधिक प्रदूषण पश्चिम उपनगरातील अंधेरी भागात नोंदवले गेले. मालाड २१५, माझगाव २३५ व अंधेरी २७३ असा हवा गुणवत्ता निर्देशांक असून तेथील हवेचा दर्जा ‘वाईट’ नोंदवला गेला आहे.

मुंबईवरील वाळूच्या वादळांचा परिणाम कमी झाला असून सध्या समुद्राकडून जमिनीकडे हवा वाहत आहे. त्यामुळे जमिनीलगतचे धूलिकण वाहून जात आहेत. त्या कारणाने हवेचा स्तर काहीसा सुधारला असून आठवडाभर ही स्थिती कायम राहण्याची शक्यता आहे.
- गुफारन बेग, प्रकल्प संचालक, सफर.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Zakia Wardak: अफगाणिस्तानी अधिकारी करायची तस्करी, दुबईहून 19 कोटींचे सोने आणताना मुंबईत पकडले

'पवित्र ग्रंथ गुरु साहिब'ची पानं गुरुद्वारात घुसून फाडली! जमावाच्या बेदम मारहाणीत तरुणाचा मृत्यू

Nick Jonas: देसी गर्ल प्रियांका चोप्राचा पती निक जोनासची तब्येत बिघडली; व्हिडीओ शेअर करत म्हणाला...

Job Discrimination : मुंबईत नोकरी, पण मराठी माणसालाच नो एन्ट्री? लिंक्डइनवरील पोस्ट होतेय व्हायरल

Latest Marathi News Live Update :उद्धव ठाकरे यांची आज अलिबागमध्ये सभा

SCROLL FOR NEXT