मुंबई

मुंबई - चिकन, मांस विक्रेते वाऱ्यावर

सकाळवृत्तसेवा

नवी मुंबई - सुनियोजित शहर असा नावलौकिक असलेल्या नवी मुंबईत मांस विक्रेत्यांबाबतचे पालिकेचे नियोजन ढेपाळले आहे. शहरात एकीकडे नोडनुसार मासळी मार्केटसाठी मार्केट व ओटले वाटप करणाऱ्या महापालिकेने मांस विक्रेत्यांसाठी मार्केट बांधलेले नाही. त्यामुळे त्यांना उघड्यावर मांस विक्री करावी लागत आहे. यामुळे परिसरात दुर्गंधी पसरत असल्याने आरोग्याचा प्रश्‍न निर्माण झाला आहे.

सिडकोने वसवलेल्या नवी मुंबई शहरात भाजीपाला विक्रेते, किरकोळ बाजार, फेरीवाला क्षेत्र, मासळी मार्केटसाठी जागा आरक्षित ठेवल्या आहेत. शहराच्या गरजेनुसार विविध ठिकाणी आरक्षित केलेल्या किरकोळ बाजारात मासळी व मांस विक्रेत्यांसाठी एक-एक गाळेही दिले आहेत; परंतु सिडकोने २५ वर्षांपूर्वी नियोजन केलेल्या शहराची लोकसंख्या आता १४ लाखांच्या घरात गेली आहे. त्याप्रमाणे मांस विक्रेत्यांची संख्याही पूर्वीपेक्षा जास्त आहे. त्या तुलनेत महापालिकेने अवघ्या दहा जणांनाच मांस विक्रीसाठी गाळे दिले आहेत. 

शहरात सुमारे ५०० पेक्षा जास्त मांस विक्रेते आहेत. त्यापैकी शंभर जणांना महापालिकेने परवाने दिले आहेत. मात्र तेही भाड्याने घेतलेल्या गाळ्यात व्यवसाय करीत आहे. ज्यांच्याकडे परवाना नाही, असे मांस विक्रेते मिळेल त्याठिकाणी व्यवसाय करीत आहेत. विनापरवाना व नियमबाह्य मांस विक्री सुरू असल्यामुळे स्वच्छता, पाणीपुरवठा, मांसाचा दर्जा याबाबत प्रश्‍न निर्माण होत आहे. 

विनापरवाना मांस विक्री सुरू असल्यामुळे महापालिकेचा महसूलही बुडत आहे. त्यामुळे अनेक वर्षांपासून शहरातील विविध मांस विक्रेत्या संघटनांनी प्रशासनाकडे गाळे, ओटले व मार्केट बांधण्याची मागणी केली आहे; परंतु प्रशासनाकडून यावर फारसा विचार होत नसल्याने नाईलाजास्तव मांस विक्रेत्यांना उघड्यावर दुकाने थाटावी लागत आहेत. 

मांस विक्रेत्यांसाठी केवळ २० गाळे
दिघा, ऐरोली, रबाळे, गोठीवली, घणसोली, कोपरखैरणे, पावणे, वाशी, तुर्भे स्टोअर्स, शिरवणे, करावे, नेरूळ सेक्‍टर ३ व १८, बेलापूर, दिवाळे, सीबीडी सेक्‍टर १ व ३ या ठिकाणी महापालिकेने मासळी मार्केटसाठी इमारती उभारल्या आहेत. त्या तुलनेत सानपाडा येथे दोन, तर करावे येथील मार्केटमध्ये आठ असे एकूण १० गाळे मांस विक्रेत्यांना दिले आहेत.

मासळी मार्केटप्रमाणे मांस विक्रेत्यांसाठी गाळे देण्याचे महापालिकेचे धोरण आहे. मात्र महापालिकेला सिडकोकडून काही भूखंड येणे बाकी आहे. त्या भूखंडांवर मांस विक्रेत्यांसाठी गाळे देण्यात येतील.
- दादासाहेब चाबुकस्वार,  मालमत्ता उपायुक्त. 

शहरात मच्छी मार्केटच्या धर्तीवर मांस विक्रेत्यांचे मार्केट उभारावे, तसेच परवान्यासाठीच्या काही जाचक अटी शिथिल कराव्यात, अशी मागणी आम्ही अनेक वर्षांपासून केलेली आहे. मात्र महापालिका मांस विक्रेत्यांबाबत दुजाभाव करीत आहे.
- अब्दुल जब्बार खान,  अध्यक्ष, नवी मुंबई चिकन-मटन विक्रेते फेडरेशन

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sangli Lok Sabha : 'जयंत पाटील काड्या करण्यात आणि संजय पाटील थापेबाजीत पटाईत'; माजी आमदाराची जोरदार टीका

Babil Khan: इरफान खानच्या लेकाचं होतंय कौतुक; पाण्याच्या समस्येसाठी काम करणाऱ्या संस्थेला केली मोठी आर्थिक मदत

Lok Sabha Election: PM मोदींच्या सभेमुळे ६ ठिकाणी वाहनतळ, ५ ठिकाणचे रस्ते बंद, २० मिनीटे अंत्ययात्रा रोखली

Mumbai Crime News: मानखुर्दमध्ये २७ वर्षीय तरुणीची हत्या; 'लव्ह जिहाद' म्हणत धार्मिक रंग देण्याचा प्रयत्न

Latest Marathi News Live Update : 25 कोटी लोकांना गरिबीतून बाहेर काढलं; पंतप्रधान नरेंद्र मोदी माळशिरसमधून लाईव्ह

SCROLL FOR NEXT