Home
Home 
मुंबई

परवडणारी घरे ठरणार न परवडणारी

सकाळ वृत्तसेवा

मुंबई - सिडकोच्या महागृहनिर्माण योजनेत सोडतीत विजेते ठरलेले आणि घरांचे स्वप्न साकार होणार म्हणून सुखावलेले सिडकोची घाई आणि बॅंकांच्या धोरणाच्या कचाट्यात सापडले आहेत. सिडकोने सदनिकेचे पैसे भरण्यासाठी २४ ऑक्‍टोबरची मुदत दिली आहे. ही मुदत अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपली असताना, बॅंकांनी पहिला हप्ता देण्यात हात आखडता घेतला आहे. ग्राहकांनीच या परवडणाऱ्या घरांचा तब्बल साडेचार लाख रुपयांचा हप्ता भरावा, अशी भूमिका घेतली आहे.

सदनिकांचे मूळ वितरण पत्र देण्यापर्यंत आणि गृहकर्जाची सुविधा उपलब्ध करून देण्यात सिडकोने ‘निवारा’ या त्रयस्थ यंत्रणेमार्फत नियोजन केले. या केंद्राने मूळ वितरण पत्र उपलब्ध करून देण्यातही घोळ घातला. सोडतीतील लाभार्थ्यांना साडेचार लाखांची आणि त्याच तारखेपर्यंत आनुषंगिक खर्चापोटीची रक्कम मुदत २४ ऑक्‍टोबरपर्यंत मुदत दिली. या मुदतीपासून पुढे जून २०२० पर्यंत टप्प्याटप्प्याने सदनिकेसाठीची रकक्‍म भरण्यासाठीचे वेळापत्रकही दिले. कर्ज घेण्यासाठी बॅंकांकडे लाभार्थ्यांची झुंबड उडाली. पण याच दरम्यान निवडणुकीची धामधूम आणि आचारसंहिता लागू झाल्याने यंत्रणांचे काम मंदावले. स्टेट बॅंक ऑफ इंडियाने (एसबीआय) सुरवातीला सिडकोच्या टप्प्यांप्रमाणे सुलभपणे कर्ज देण्याची तयारी दाखविली. पण अचानक घुमजाव करून, पहिला हप्ता म्हणजे साडेचार लाख लाभार्थ्यांनाच भरावे लागतील, अशी भूमिका घेतली आहे. त्यामुळे ऐनवेळी साडेचार लाख रुपये आणि अन्य शुल्कापोटीची रक्कम कशी उभी करायची ही चिंता सर्वांनाच भेडसावत आहे.

यामुळे ‘परवडणारी घरे’ या संकल्पनेतली घरे पहिल्याच टप्प्यावर ‘न परवडणारी’ ठरू लागली आहेत. सिडकोने पैसे भरण्यासाठीचे वेळापत्रक बदलण्याची मागणी जोर धरू लागली आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Swati Maliwal Assault Case: केजरीवालांच्या पीएला ५ दिवसांची पोलीस कोठडी, न्यायालयाने अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळला

J-K Terrorist Attacks: जम्मू-काश्मीरमध्ये दोन दहशतवादी हल्ले, अनंतनागमध्ये पर्यटक जोडप्यावर गोळीबार, भाजप नेत्याची हत्या

IPL 2024 Playoffs Schedule : प्लेऑफचे शेड्यूल! कुठे अन् कधी कोणत्या संघांमध्ये होणार क्वालिफायर आणि एलिमिनेटर सामने?

IPL 2024, RCB vs CSK: चेन्नईचा 17 व्या हंगामातील प्रवास थांबला! धोनीचीही कारकिर्द संपली? सामन्यानंतरचा पाहा Video

Loksabha Election 2024 : हुश्श..! प्रचार संपला, राज्यात तोफा शांत, तलवारी म्यान

SCROLL FOR NEXT