मुंबई

सिगरेट तस्करीप्रकरणी कुरिअर कंपनी मालकाला अटक 

सकाळ वृत्तसेवा

मुंबई - एक कोटी रुपयांच्या सिगरेटची तस्करी केल्याच्या आरोपाखाली कुरिअर कंपनीच्या मालकाला सोमवारी महसूल गुप्तवार्ता संचलनालयाने (डीआरआय) अटक केली. त्याच्याकडून मार्रबोलो, पॅरिस गुडांग गरम व बेन्सन अँड हेड्‌ज या परदेशी बनावटीच्या सिगरेटचे 60 बॉक्‍स जप्त करण्यात आले आहेत. 

डीआरआयला याप्रकरणी मिळालेल्या गुप्त माहितीनंतर दक्षिण मुंबईतील चिराबाजार परिसरातील गोदामावर छापा टाकण्यात आला. त्यावेळी तेथे 29 बॅगमध्ये या सिगारेटचे 60 मोठे बॉक्‍स भरले होते. त्यामध्ये सहा लाख 73 हजार 120 सिगरेट होत्या, अशी माहिती अधिकाऱ्याने दिली. जप्त करण्यात आलेल्या सिगरेटमध्ये मार्रबोलो, पॅरिस गुडांग गरम व बेन्सोन अँड हेड्‌ज या परदेशी बनावच्या सिगरेट असून त्यांची किंमत एक कोटी 96 हजार 800 रुपये आहे. ते गोदाम मे. सन कार्गे अँड पॅकर्सचे मालक बिपीन कुमार सिंग याच्या नावावर असून त्यांना याप्रकरणी डीआरआयने अटक केली आहे. या परदेशी बनावटीच्या सिगरेट देशात चढ्या भावाला विकण्यात येतात. त्यांना मोठी मागणी असल्याचे डीआरआयच्या अधिकाऱ्याने सांगितले. 

याप्रकरणी सिंगच्या चौकशीत दिल्लीतील एका व्यावसायिकाने हा सर्व माल पाठवल्याचे सांगितले आहे. त्यातील काही पार्सल हैद्राबाद, तर काही मुंबईत पाठवण्यात आल्याचे त्याने सांगितले. या बॅगांचा सर्व व्यवहार दिल्लीवरून झाला असून रेल्वेद्वारे ते मुंबईत पाठवण्यात आले. पण त्याची कोणतीही पावती अथवा तिकीट सापडले नसल्याचे डीआरआयच्या अधिकाऱ्याने सांगितले. सिंग विरोधात डीआरआयने तस्करीच्या विविध कलमांतर्गत गुन्हा दाखल केला आहे. याप्रकरणी सिंगला न्यायालयीन कोठडीत पाठवण्यात आले असून या तस्करीप्रकरणी डीआरआय दिल्लीतील संशयित व्यापाऱ्याचा शोध घेत आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

KKR vs DC : दिल्ली पॉईंट टेबलमध्ये मोठी उसळी घेणार की जेक फ्रेसर मॅर्कगर्कला केकेआर रोखणार?

CSK vs SRH IPL 2024 : चेन्नईनं पुन्हा जिंकला चेपॉकचा गड; हैदराबादची इतिहासातील सर्वात मोठी हार

Sambhajinagar : राज्यातील पहिल्या मोसंबी ग्रेडींग व्हॅक्सीन व कोल्ड स्टोरेज केंद्राचे काम पूर्णत्वाकडे

Share Market : शेअर बाजारातील किरकोळ गुंतवणूकदारांच्या संखेत वर्षात ४.०३ कोटींची वाढ; देशात 'हे' राज्य आघाडीवर

Pune Traffic Updates : पुणे विद्यापीठ चौकातील मेट्रोच्या कामानिमित्त वाहतुकीत बदल

SCROLL FOR NEXT