मुंबई

अतिरिक्त गर्दीत घट होणार, CSMT रेल्वे स्थानकावर क्युआरकोड तपासणीचे गेट

प्रशांत कांबळे

मुंबईः  कोरोनाच्या महामारीमुळे गेल्या सात महिन्यांपासून रेल्वेच्या सेवा रद्द करण्यात आल्या होत्या, त्यानंतर आता हळुहळू अनलॉक दरम्यान रेल्वे सेवा सुरू करण्यात येत आहे. मात्र, आता रेल्वेने प्रवास करणाऱ्या प्रवाशांच्या ऑनलाईन तिकीटांवरील क्युआरकोड स्कॅन केल्यानंतर तिकीट कंन्फर्म आहे. कोरोनाचे लक्षण नसल्याचे निष्पन्न झाल्यावरच प्रवाशांना रेल्वे स्थानकावर प्रवेश करता येणार नसल्याने, रेल्वेतील आणि स्थानकांवरील प्रवाशांच्या गर्दी कमी करता येणार आहे.

मध्य रेल्वे मार्गावरील छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथे लांबपल्यांवर प्रवास करणाऱ्या प्रवाशांच्या चेक-इनसाठी क्युआरकोड स्कॅनर मशिनचे गेट तयार करण्यात आले आहे. सुरूवातीला प्रवाशांकडे असलेल्या तिकीटांवरील क्युआरकोड स्कॅन करावा लागणार आहे. ज्यांचे ई-तिकीट आहे. त्यांच्या मोबाईलवरील क्युआरकोड सुद्धा स्कॅन किंवा ई-तिकीट प्रिंट केले असल्यास त्यावरील क्युआरकोड स्कॅन करावा लागणार आहे.

तिकीट स्कॅन केल्यानंतर प्रवाशांच्या शरीराचे तापमान सुद्धा तपासले जाणार आहे. यामध्ये प्रवाशांच्या शरीराचे तापमान आणि तिकीट कंन्फर्म नसल्यास जास्त आढळल्यास प्रवाशाला पुढचा प्रवास करता येणार नाही. हा प्रयोग सध्या सीएसएमटी रेल्वे स्थानकावर मध्य रेल्वेने सुरू केला आहे. सध्या यातील त्रुट्या दूर करण्याचा प्रयत्न सुरू असून, प्रयोग यशस्वी राहिल्यास इतर रेल्वे स्थानकावर अशा मशिन लावण्यात येणार असल्याचे मध्य रेल्वेने सांगितले आहे.

तिकीटचा काळाबाजार थांबणार

रेल्वेचे तिकीट कंन्फर्म करून देतो किंवा वेटिंग तरी काढून देण्याच्या नावावर रेल्वे तिकीटांचा काळाबाजार केला जातो. मात्र, वेटिंग तिकीट असणाऱ्यांना आता रेल्वे स्थानकांवर प्रवेशच मिळणार नसल्याने, तिकीटांचा काळा बाजार करणाऱ्यांवर चपराक बसणार आहे.

तिकीट तपासणीसांची गैरकमाई बंद होणार

धावत्या रेल्वेत वेटिंग तिकीट असणाऱ्या प्रवाशांची तिकीट तपासणीकांकडून आर्थिक लूट केली जाते. वेटिंग असलेल्या प्रवाशांना मनमानी भाडे किंवा गैरकायदेशीर पैसे आकारून त्यांना कंन्फर्म आसन दिल्या जाते. त्यामूळे मुळ वेटिंग प्रवाशांना किंवा आरएसी प्रवाशांना आसन मिळू शकत नाही. मात्र, आता वेटिंग असलेल्या प्रवाशांना रेल्वेत प्रवेश करताच येणार नसल्याने, रेल्वेच्या तिकीट तपासणीकांची ओव्हर कमाई बंद होणार आहे.

प्रवाशांची गर्दी होणार कमी

तिकीट कंन्फर्म असलेल्या प्रवाशांच्या व्यतिरिक्त वेटिंग आणि आरएससी असलेल्या प्रवाशांना रेल्वे प्रवास करता येणार नाही. त्यामुळे रेल्वेतील गर्दी आणि स्थानकांवरील प्रवाशांच्या गर्दीत घट होणार असून, कोविड-19 च्या नियमांचे आपोआप पालन केले जाणार आहे.

लांब पल्यांवर प्रवास करणाऱ्या प्रवाशांनी रेल्वे स्थानकात येण्यापूर्वीच तिकीटांवरचा क्युआरकोड किंवा मोबाईलवरचा क्युआरकोड स्कॅन करायचा आहे. त्यानंतरच गेट सुरू होऊन रेल्वे स्थानकावर प्रवेश मिळणार आहे. प्रवाशांनी स्थानकावर प्रवास करण्यापूर्वीच तिकीटांवरील क्युआरकोड स्कॅन करण्यासाठी सुरू करून ठेवल्यास प्रवाशांना कोणतीही अडचण होणार नाही.

- प्रविण पाटील, जनसंपर्क अधिकारी, मध्य रेल्वे

----------------------------

(संपादनः पूजा विचारे) 

confirmed ticket reservation can enter station Gate QR code check CSMT railway station

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Dharashiv Loksabha election : ...म्हणून ओमराजे निंबाळकर शिंदेंसोबत गेले नाहीत; 'सकाळ'च्या खास मुलाखतीत केला खुलासा

T20 World Cup 2024: BCCI निवड समितीची जय शाह यांच्यासोबत अहमदाबादमध्ये बैठक! टीम इंडियाची घोषणा कधी? अपडेट्स आल्या समोर

Patanjali Products Ban: पतंजलीच्या 14 औषधांवर उत्तराखंडमध्ये बंदी! सुप्रीम कोर्टानं फटकारल्याचा परिणाम

Loksabha election 2024 : बेटों के सम्मान में, 'मर्द' उतरे मैदान मे! ना विजयाची चिंता ना प्रचाराची फिकीर; पुरुषांच्या हक्कासाठी निवडणुकीच्या मैदानात

Thomas Cup 2024: भारताचा पुरुष बॅडमिंटन संघ उपांत्यपूर्व फेरीत, इंग्लंडचा 5-0 ने उडवला धुव्वा

SCROLL FOR NEXT