zon.jpg
zon.jpg 
मुंबई

रायगड जिल्ह्यातील `या` भागात सर्वाधिक कन्टेंमेंट झोन

सकाळवृत्तसेवा

अलिबाग : चौथा लॉकडाऊन सुरु झाल्यानंतर जिल्ह्यात येणाऱ्या चाकरमान्यांचेही प्रमाण वाढले. यामुळे जिल्ह्यात कोरोनाचा फैलाव वेगाने सुरुवात झाल्याने एकूण बाधितांचा आतापर्यंतचा आकडा 840 हुन अधिक झाला आहे. हा फैलाव रोखण्यासाठी जास्त प्रमाणात बाधित रुग्ण सापडणारे परिसर कन्टेंमेंट झोन म्हणून जाहिर करत सील करण्यात येत आहेत. अशा कन्टेंमेंट झोनचे शतक पुर्ण झाले आहे. यातील 51 कंन्टेंमेंट झोन एकट्या पनवेल तालुक्‍यात आहेत. 


सील केलेल्या परिसरात बाधित होणाऱ्या रुग्णांची संख्या आटोक्‍यात आल्यानंतरच ते परिसर कन्टेंमेट झोनच्या निर्बंधातून वगळण्यात येतात. मात्र रायगड जिल्ह्यात 100 पैकी केवळ 9 झोनच वगळण्यात आले आहेत. यावरुन कोरोनाचा प्रसार रोखण्यात जिल्हा प्रशासनाला अद्याप यश आलेले नाही, हे दिसुन येत आहे. 4 मे पर्यंत रायगड जिल्ह्यात केवळ 14 कन्टेंमेंट झोन होते. बुधवारी (ता. 27) पनवेल तालुक्‍यातील आदई येथील प्रयाग गॅलेक्‍सी हौसिंग सोसायटी, माणगाव तालुक्‍यातील पन्हाळघर, अलिबाग तालुक्‍यातील कोळगाव, तळा तालुक्‍यातील शेनाटे परिसर, पोलादपुर तालुक्‍यातील पळचिल आणि उरणमधील बोरीपाखाडी परिसर येथे कन्टेंमेंट झोन जाहीर करत परिसर सील करण्यात आले आहेत. अशा सील केलेल्या परिसरांची संख्या शंभर इतकी झाली आहे. 


विषाणुचा प्रसार रोखण्यासाठी कन्टेंमेंट झोनमधील नागरिकांना झोनमधून बाहेर पडण्यास मनाई केली आहे. येथील नागरिकांच्या आरोग्यावर विशेष लक्ष ठेवण्यात येत आहे. 
उरण तालुक्‍यातील कोटनाका व जेएनपीटी टाऊनशिप येथे पहिला कन्टेंमेंट झोन जाहिर झाला होता. त्यानंतर कन्टेंमेंट झोनची संख्या सातत्याने वाढत गेली आहे. परंतु फैलाव रोखण्यासाठी केलेल्या उपाययोजनांना यश न आल्याने आतापर्यंत फक्त नऊ ठिकाणांची कन्टेंमेंट झोनच्या निर्बंधांमधुन सुटका करण्यात आली आहे. तर 91 ठिकाणी कन्टेंमेंट झोन कायम आहे. 

जिल्ह्यातील कन्टेंमेंट झोन 
पनवेल -51 ,उरण-8 , अलिबाग-6 , खालापूर-3,  माणगाव-3 पोलादपुर-4 , महाड-4 ,रोहा- 1, मुरुड-3, तळा-1, म्हसळा-1 , श्रीवर्धन-1, पेण-2, कर्जत-3 , पाली-0 

सुटका झालेले परिसर 
शास्त्रीनगर- विणानगर (खालापुर), 
सुगवेकर आळी, मोरेश्वर अपार्टमेंट (नेरळ), भोस्ते गाव (श्रीवर्धन), जासई (उरण), नगरपंचायत हद्द (पोलादपुर), कोटनाका व जेएनपीटी टाऊनशिप (उरण), चिंचवली गोहे (खालापूर), बिरवाडी (महाड), साई गणेश रेसिडेन्सी (उलवे).  

 containment zone in raigad distriict Raigad District

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Lok Sabha Hatkanangale: निवडणुकीच्या रिंगणात असलेल्या राजू शेट्टींना चित्रपटात काम करावसं का वाटलं? जाणून घ्या

Gulabrao Patil: भाजपवाल्यांनी काम केलं नाही तर आम्ही... गुलाबराव पाटलांच्या वक्तव्यामुळे BJP कार्यकर्त्यांमधे संभ्रम

Bajrang Punia Suspended : बजरंग पुनियाचे स्वप्न भंगले... डोपिंग टेस्ट न केल्याने निलंबित

Summer Fashion Tips : उन्हाळ्यात कूल आणि स्टायलिश दिसायचंय? मग, अशा प्रकारच्या कलर पॅटर्न्सची करा निवड

Raju Shetti in Hatkanangale: 'राजकारणात यायचं म्हणजे गेंड्याची कातडी लागते'; राजकारण की चळवळ, राजू शेट्टींची कशाला पसंती?

SCROLL FOR NEXT