मुंबई

उरणच्या कामगार वसाहतीत नळातून येतंय विष ?

सकाळ वृत्तसेवा

उरण : सिडकोच्या हेटवणे जलवाहिनीद्वारे जेएनपीटी वसाहतीत होत असलेला पाणीपुरवठा गेल्या काही दिवसांपासून दूषित आहे. दूषित पाणीपुरवठ्यामुळे इथल्या नागरिकांच्या आरोग्याचा गंभीर प्रश्न निर्माण होऊ शकतो. दरम्यान याबाबत तक्रार करूनही गेल्या ६ दिवसांपासून प्रशासनाने याकडे दुर्लक्ष केले आहे. त्यामुळे प्रशासनाने लवकर दूषित पाणी बंद करून शुद्ध पाणीपुरवठा करावा, अशी मागणी नागरिकांनी केली आहे.

जेएनपीटी बंदरातील कामगारांची आणि अधिकाऱ्यांची वसाहत

देशातील सर्वात मोठे बंदर म्हणून ओळख असलेल्या जेएनपीटी बंदरातील कामगारांची आणि अधिकाऱ्यांची ही वसाहत आहे.  या वसाहतीला दररोज ५ एमएलडी पाण्याची गरज असताना रोज फक्त १ ते १.५ एमएलडी पाणीपुरवठा केला जातो. पूर्वी महाराष्ट्र जीवन प्राधिकरणातर्फे पाणीपुरवठा केला जात असे; मात्र आता सिडकोच्या हेटवणे पाणीपुरवठा योजनेतून पाणीपुरवठा केला जातो. मात्र तो अपुरा असल्याने येथील नागरिकांना पाण्यासाठी नेहमीच वणवण करावे लागते.

सिडकोच्या पाणीपुरवठा विभागाने पाच दिवसांपूर्वी जलवाहिनीच्या दुरुस्तीचे काम हाती घेतल्याने येथील नागरिकांना पाणी समस्यांचा सामना करावा लागला. याबाबत पाणी पुरवठा अधिकारी चिमाजी दलाल यांनी सध्या  वॉशआऊट काढल्यामुळे पाणी चांगले येत असल्‍याचे सांगितले. 

Contaminated water in the labor colony of uran serious health issue may arise


 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Health Insurance : आरोग्य विम्यावर ‘जीएसटी’चा भार; सर्वसामान्यांचे बिघडतेय आर्थिक गणित

Maharashtra Rain Update : महाराष्ट्रावर अतिमुसळधार पावसाचे संकट, पुढील 24 तास महत्वाचे; हवामान विभागाचा हाय अलर्ट

Ashadhi Ekadashi 2025 Live Updates : महाराष्ट्रापुढील सर्व संकटे दूर करण्याची शक्ती पांडुरंगाने द्यावी- देवेंद्र फडणवीस

Beed News: परळीतील गोळीबार खून प्रकरणात न्यायालयाचा मोठा निर्णय ,आरोपींना मिळणार नाही जामीन!

Ashadhi Ekadashi 2025 Special Recipe: आषाढी एकादशीनिमित्त उपवासाला बनवा खास अन् स्वादिष्ट पॅटिस, सोपी आहे रेसिपी

SCROLL FOR NEXT