मुंबई

#COVID19 ची चाचणी करायची असेल, तर विलगीकरणाचे हमीपत्र द्यावे लागेल! वाचा बातमी सविस्तर

सकाळ वृत्तसेवा

ठाणे : कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी कोव्हीड 19 ची चाचणी करणाऱ्या व्यक्तीला त्याच्या चाचणीचा अहवाल प्राप्त होईपर्यंत घरच्या घरी स्वतःला विलगीकरण करून ठेवण्याबाबतचे किंवा महापालिकेच्या विलगीकरण कक्षात राहण्याबाबतचे हमीपत्र सादर करणे बंधनकारक असणार आहे. संबंधित व्यक्ती कोरोना बाधीत निघाल्यास त्या व्यक्तीपासून नॅान कोव्हीड व्यक्तींस कोव्हीड 19 चा संसर्ग होवू नये म्हणून महापालिका आयुक्त विजय सिंघल यांनी हा निर्णय घेतला आहे.

ठाणे महापालिका क्षेत्रात आयसीएमआरने प्राधिकृत केलेल्या खासगी चाचणी केंद्रांच्या माध्यमातून कोव्हीड-19 ची चाचणीची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. या केंद्रावर कोव्हीड 19 ची तपासणी केल्यानंतर त्याचा अहवाल प्राप्त होण्यासाठी एक किंवा दोन दिवसांचा कालावधी अपेक्षित असतो. जर त्या व्यक्तीचा कोव्हीड चाचणी अहवाल पॅाझिटिव्ह आला तर या कालावधीत त्याच्या पासून अनेक लोकांना कोव्हीडचा संसर्ग होवू शकतो.

प्रसार रोखण्यासाठी आवाहन
ही बाब लक्षात घेवून एखाद्या व्यक्तीने कोव्हीड 19 साठी तपासणी केल्यानंतर त्याचा चाचणी अहवाल प्राप्त होईपर्यंत त्या व्यक्तीला विलगीकरण कक्षात राहणे आवश्यक राहणार आहे. सदर व्यक्ती घरच्या घरी स्वतःला विलगीकरण करून ठेवण्याबाबत किंवा महापालिकेच्या विलगीकरण कक्षात राहण्याबाबतचे हमीपत्र त्याने चाचणीच्यावेळी देणे बंधनकारक राहणार आहे. कोव्हीडची बाधा इतरांना होवू नये यासाठी हा निर्णय घेण्यात आला असून सर्व नागरिकांनी याची नोंद घ्यावी असे आवाहन ठाणे महानगरपालिकेच्यावतीने केले आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Lok Sabha Election 2024 Phase 3 LIVE Updates : सुप्रिया सुळे अजित पवारांच्या घरी दाखल

EVM वर कमळाचं फुलं दिसत नसल्याने आजोबा संतापले...बारामती मतदारसंघात नेमकं काय घडलं?

Session Court : लैंगिक छळ प्रकरणात माजी पंतप्रधान आणि माजी मुख्यमंत्र्यांचे नाव वापरण्यास बंदी; न्यायालयाचा आदेश जारी

Rohit Sharma : 6,8,4,11 आणि 4... वर्ल्ड कपच्या तोंडावर रोहितला झालं तरी काय? BCCI अन् चाहते टेन्शनमध्ये

Lok Sabha Voting 3rd Phase : महाराष्ट्रात सकाळी नऊ वाजेपर्यंत सर्वात कमी मतदान; पश्चिम बंगालमध्ये सर्वाधिक मतदानाची नोंद

SCROLL FOR NEXT