मुंबई

Corona Vaccination:गर्दी न करता लसीकरण प्रक्रियेत सहभागी व्हा

भाग्यश्री भुवड

मुंबई: कोविन अॅपच्या वाढत्या तक्रारींमुळे रुग्णालय प्रशासन आणि नागरिकांना अडचणीचा सामोरे जावे लागत आहे. त्यामुळे ज्यांना जमेल अशा नागरिकांनी घरी अॅप वर नोंदणी करून लस घेण्यासाठी लसीकरण केंद्रावर यावे. ज्या नागरिकांना अँपवर माहिती भरणे शक्य नाही अशा नागरिकांनी नोंदणीसाठी केंद्रावर यावे. शिवाय, सर्वांना लस मिळणार असून तातडीने लसीकरणासाठी गर्दी न करण्याचे आवाहन पालिका अतिरिक्त आयुक्त सुरेश काकणी यांनी सांगितले.
 
सोमवारी कोविन अॅपमध्ये झालेल्या बिघाडानंतर हा बिघाड मंगळवारी आणि बुधवारी देखील कायम राहिल्याचे समोर आले होते. त्याच, दरम्यान मंगळवारी दुपारपर्यंत अॅप बंद झाल्याने गर्दी जमा झाली. त्यानंतर, बुधवारी चारनंतर काही काळ हे अॅप बंद होत असल्याने ज्येष्ठ नागरिकांच्या लसीकरणात अडचणी निर्माण झाल्या. त्यामुळे, लसीकरण प्रक्रियेत सहभागी होणाऱ्या नागरिकांनी रजिस्ट्रेशन बाहेरून केल्यास रुग्णालय प्रशासनावरील ताण कमी होईल असे काकाणी सांगतात.

अॅपमध्ये येणाऱ्या अडचणींबाबत केंद्र सरकारला पत्र पाठवले आहे. व्हिडिओ कॉन्फरन्स द्वारेही केंद्र सरकारच्या अधिकाऱ्यांशी चर्चा केली आहे. जास्तीत  जास्त लसीकरण करण्याचा पालिकेचा प्रयत्न असणार आहे. कोविड लसींचा पुरेसा साठा आहे. रुग्णालयेही सज्ज आहेत. घरी अॅपवर नोंदणी करून लस घेण्यासाठी लसीकरण केंद्रावर यावे. ज्यांना माहिती भरणे शक्य नाही अशा नागरिकांनी नोंदणीसाठी केंद्रावर आल्यास गर्दी होणार नाही, आणि नियोजन पद्धतीने लसीकरण होऊ शकते असेही काकाणी यांनी स्पष्ट केले. 

----------------------------

(संपादन- पूजा विचारे)

Corona Vaccination bmc additional commissioner suresh kakani appeal people

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Jalgaon Major Accident: भरधाव कारच्या धडकेत मजुरी करण्याऱ्या आईसह दोन चिमुकले ठार!

IPL 2024 DC vs RR : दिल्लीचा राजस्थानला दणका, घरच्या मैदानात मिळवला दणदणीत विजय; संजू सॅमसनचे अर्धशतक व्यर्थ

Virtual Touch: बालकांना 'व्हर्च्युअल स्पर्शा'च्या धोक्याची जाणीवही करुन देणं गरजेच - हायकोर्ट

Navneet Rana: "काँग्रेसला मत देणं म्हणजे थेट पाकिस्तानला मत देणं"; नवनीत राणांचं वादग्रस्त विधान

यवतमाळ जिल्हा कारागृहातील धक्कादायक घटना; कारागृहातील अधिकारी, कर्मचाऱ्यावर कैद्यांच्या टोळीचा हल्ला

SCROLL FOR NEXT