मुंबई

कोरोना लसीकरणाबाबत वृद्ध उत्साही, पहिल्या दिवशी इतक्या वृद्धांनी घेतली लस

भाग्यश्री भुवड

मुंबई: सोमवारी भर दुपारी 96 वर्षीय राजम नारायण बीकेसी जंबो कोविड लसीकरण केंद्रातून व्हिलचेयरवरुन बाहेर पडताना दिसले. लस घेतल्याचा आनंद त्याच्या चेहऱ्यावर उमटत होता. जेव्हा त्यांना विचारले की लसबद्दल काही भीती किंवा शंका आहे का, तेव्हा ते म्हणाले की, कसलीही भीती नाही, काही हरकत नाही सर्वांनी घेतलीच पाहिजे. लसी घेण्यासंबंधीचा जोश आणि उत्साह लसीकरण केंद्रात आलेल्या वृद्धांच्या चेहऱ्यावर स्पष्ट दिसत होता. सर्व केंद्रांवर लसीसाठी वृद्ध लोकांची मोठी गर्दी जमली होती. मात्र कोविन पोर्टलमध्ये उद्भवलेल्या समस्या आणि पालिकेच्या काही केंद्रांमध्ये व्यवस्थेच्या अभावामुळे अनेक जणांना अडचणींचा सामना करावा लागला. 

कोरोनावर उपयुक्त लस उपलब्ध झाल्यानंतर सोमवारपासून तिसऱ्या टप्प्यातील लसीकरण मोहिमेला सुरुवात झाली. पालिकेच्या 5 आणि खाजगी 3 अशा एकूण 8 ठिकाणी लसीकरण मोहीम राबवण्यात आली. या लसीकरण मोहीमेत 45 ते 59 वयोपर्यत सोमवारी 260 आणि  60 वर्षांवरील 1,722  अशा एकूण 1,982 लाभार्थ्यांना लस टोचण्यात आल्याचे पालिकेच्या आरोग्य विभागातील अधिकाऱ्याने सांगितले. 

आतापर्यंत सव्वादोन लाखांवर लसीकरण

लसीकरणाच्या तिसऱ्या टप्प्यात सोमवारी बी. के. सी जंबो कोविड केंद्र, मुलुंड जंबो कोविड सेंटर, नेस्को जंबो कोविड सेंटर गोरेगाव, सेव्हन हिल रुग्णालय, अंधेरी, दहिसर जंबो केंद्र आणि खासगी खासगी रुग्णालयांतील एच. जे. दोशी हिंदू सभा रुग्णालय, घाटकोपर, के. जे. सोमय्या वैदयकीय महाविदयालय, शीव  आणि एस. आर. सी. सी. चिल्ड्रन रुग्णालय, महालक्ष्मी या ठिकाणी लसीकरण करण्यात आले. 

शिवाय पालिकेच्या 26 केंद्रांवर 9700 जणांना लस देण्यात आली. यामुळे आतापर्यंत मुंबईत झालेल्या लसीकरणाचा आकडा 228840 वर पोहोचला आहे. दरम्यान, पालिकेच्या 19 लसीकरण केंद्रात 2 मार्चपासून लसीकरण सुरू करण्यात येणार असल्याची माहिती पालिकेच्या आरोग्य विभागातील अधिकाऱ्याने दिली.

----------------------------------------

(संपादन- पूजा विचारे)

Corona vaccination Mumbai 1 thousand 982 people vaccinated first day

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Prakash Ambedkar : सुळे, पाटलांमुळे बारामतीतून माघार ; डॉ. प्रकाश आंबेडकरांनी फोडले गुपित,यंदा खाते उघडणार

Nana Patole : खोके द्या, फोडा अन् राज्य करा ; पटोलेंची मोदींवर टीका,राज्याचे नुकसान केल्याचा आरोप

Sakal Podcast : बीड पंकजा मुंडेंना अवघड जाणार? ते ‘मर्द’ला पराभवाचा ‘दर्द’च होत नाही

Latest Marathi News Live Update : PM मोदींची माढा, धाराशिवसह लातूरमध्ये सभा, तर 25 वर्षानंतर वेल्ह्यात धडाडणार शरद पवारांची तोफ

Water Scarcity : पिण्याच्या पाण्यासाठी दाहीदिशा वणवण ; राज्यात भीषण टंचाई,७४९५ वस्त्यांवर टँकरद्वारे पुरवठा

SCROLL FOR NEXT