Corona Vaccine
Corona Vaccine Sakal
मुंबई

Corona Vaccine : मुंबईत कोरोना लशीचे केवळ सहा हजार डोस शिल्लक

सकाळ वृत्तसेवा

मुंबई महापालिकेकडे कोव्हॅक्सिन लसीचे फक्त सहा हजार डोस शिल्लक आहेत; मात्र कोरोनाचा नवा धोका पाहता आता लोक लसीकरणासाठी पुढे येत आहेत.

मुंबई - सध्या महापालिकेकडे कोव्हॅक्सिन लसीचे फक्त सहा हजार डोस शिल्लक आहेत; मात्र कोरोनाचा नवा धोका पाहता आता लोक लसीकरणासाठी पुढे येत आहेत. शनिवारी (ता. २४) २,८५२ लाभार्थ्यांनी कोरोनाची लस घेतली, त्यापैकी २,४८४ लाभार्थ्यांनी बूस्टर डोस घेतला. भविष्यात लसीची कमतरता भासू नये म्हणून पालिकेने राज्य सरकारकडे पत्र पाठवत लसीची मागणी केल्याचे मुंबई महापालिकेच्या आरोग्य विभागाच्या कार्यकारी आरोग्य अधिकारी डॉ. मंगला गोमारे यांनी सांगितले.

अनेक देशांमध्ये कोरोनाच्या बीएफ.७ या नवीन सब-व्हेरिएंटचा उद्रेक लक्षात घेता, मुंबई पालिकेनेदेखील त्याला सामोरे जाण्याची तयारी सुरू केली आहे. रुग्णालयांमधील खाटांचे व्यवस्थापन, ऑक्सिजनचे नियोजन, क्वॉरंटाईन सुविधा, लसीकरण आणि वॉर रूम सक्रिय करण्यावर पूर्णपणे लक्ष केंद्रित केल्याचे पालिका प्रशासनाकडून सांगण्यात आले आहे.

परदेशातील कोरोना प्रसाराचा वेग पाहता केंद्र सरकारने सर्व राज्यांना अलर्ट केले आहे. यासोबतच त्यावर उपाययोजना करण्यासाठी मार्गदर्शक तत्त्वेही जारी करण्यात आली आहेत. या सूचनेनुसार पालिकेनेही तयारी सुरू केली आहे. मुंबईत कोरोनाचे नवे रुग्ण कमी होत असले, तरी पालिका प्रशासन नवीन सब-व्हेरिएंटला हाताळण्यात कोणतीही कसर ठेवत नसल्याचे चित्र आहे.

सांडपाण्यातील कोरोना विषाणू देखरेखीचा भाग

केंद्रीय आरोग्य मंत्री मनसुख मांडवीय यांनी शनिवारी सांगितले, की दिल्ली आणि मुंबईच्या सांडपाण्याच्या नमुन्यांमध्ये कोरोना विषाणू आरएनए आढळून आला आहे; मात्र पालिकेच्या आरोग्य विभागाने मुंबईकरांना याबाबतची काळजी करू नका असे सांगितले आहे. डॉ. गोमारे यांनी सांगितले, की गेल्या दोन वर्षांपासून सांडपाण्याचे नमुने नियमितपणे तपासले जात आहेत. हा कोविड देखरेखीचा एक भाग आहे. ‘इन्स्कोग’ नेटवर्कद्वारे केलेल्या या चाचणीत नमुने पॉझिटिव्ह आढळले आहेत. सध्या सांडपाण्यात आढळणारा कोविड विषाणू कोणता उपप्रकार आहे आणि सकारात्मकता दर वाढला आहे की नाही, याचे पालिका निरीक्षण करत आहे.

मुंबईत कोरोनाच्या नवीन प्रकाराचा एकही रुग्ण आढळलेला नाही. कोरोनाचा नवीन रुग्ण आढळल्यास फ्लोअर सील करणे, रेल्वे स्थानकांवर चाचणी करणे इत्यादी गोष्टी करत नाही, परंतु गरज पडल्यास हे नियम पुन्हा लागू होतील.

- डॉ. मंगला गोमारे, कार्यकारी आरोग्य अधिकारी, आरोग्य विभाग, मुंबई महापालिका

ऑक्सिजनची पुरेशी सोय

पालिकेच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार प्रमुख रुग्णालये, काही उपनगरीय रुग्णालये, प्रसूतिगृहे आणि कोविड केंद्रांमध्ये सक्रिय केलेल्या पीएसए प्लांटमधून पुरेशा प्रमाणात ऑक्सिजन तयार केला जात आहे. सध्या २७ पीएसए संयंत्रे दररोज १८३.३२ मेट्रिक टन ऑक्सिजनचे उत्पादन करत आहेत.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Nashik Lok Sabha Election : बाबाजी‘ फॅक्टरमुळे नाशिकमध्ये ‘काटे की टक्कर', शेवटच्या दोन दिवसात आले महत्व

Maharashtra Lok Sabha 2024 Phase 5 Election Voting LIVE: धुळ्यात एल एम सरदार हायस्कूल येथील ईव्हीएम बंद पडल्याने गोंधळ

Mobile Hacks: 'या' सोप्या ट्रिक्स वापरा, मोबाईलमधील फोटो डिलिट करण्याची येणार नाही वेळ

Lok Sabha Election: विरोधकांनीही मुस्लिम उमेदवारांना ठेवले दूर! 2019 च्या तुलनेत 2024 ची स्थिती काय?

RCB vs CSK: धोनीच्या षटकारामुळे रिंकूची आठवण... CSK विरूद्ध शेवटच्या ओव्हरला काय होत्या भावना, यश दयालच्या वडिलांकडून खुलासा

SCROLL FOR NEXT