NCP Jitendra Awhad
NCP Jitendra Awhad esakal
मुंबई

Jitendra Awhad : भ्रष्टाचाराला अधिकृत मान्यता देत भाजपचा भ्रष्टाचार

सकाळ वृत्तसेवा

ठाणे - देश वाचवायचा असेल तर सत्ता बदल होणे आवश्यक आहे. तसेच भ्रष्टाचाराला अधिकृत मान्यता देऊन भाजपने भ्रष्टाचार केला आहे असा आरोप राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी केला आहे. भारताच्या इतिहासात एवढा मोठा भ्रष्टाचार कधी झाला नव्हता. असेही उद्गार काढत त्यांनी भाजप सरकारवर टीका केली.

रविवार सायंकाळी कळवा येथील भूमिपुत्र मैदान, खारलँड- कळवा येथे हा कोकणचा शिमगोत्सव व पालखी नृत्य स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. याप्रसंगी कल्याण लोकसभा मतदारसंघाच्या महाविकास आघाडीच्या उमेदवार वैशाली दरेकर-राणे यांनीही हजेरी लावेळी होती. त्यावेळी त्यांनी भाजप सरकारवर टीका केली.

सूर्याजी पिसाळ आणि खंडोजी खोपडे यांनी महाराजांबरोबर केलेली गद्दारी आजही महाराष्ट्र विसरलेला नाही म्हणून कोकणवासीयांनी ही सूर्याजी पिसाळ आणि खंडोजी खोपडे यांची जी औलाद निर्माण झालेली आहे. त्यांना कायमचे संपवायला पाहिजे असेही त्यांनी यावेळी म्हटले आहे. शिमगोत्सवानिमित्त आयोजित केलेल्या पालखी नृत्यादरम्यान जमलेल्या कोकणवासीयांना शरद पवार यांच्या आरोग्यासाठी प्रार्थना करा.

याशिवाय मशाल चिन्हावर उभे असलेले विनायक राऊत आणि अनंत गीते या दोन्ही उमेदवारांच्या मशाली मतदान करून पेटवा आणि गद्दारांना जाळून टाका असेही आवाहनही आव्हाड यांनी यावेळी केले आहे. जेव्हा शरद पवार यांचा वापर करायचा होता. तेव्हा तेव्हा तुम्ही त्यांचा वापर करून घेतला.

तसेच आता त्या माणसाने घर बनवले आणि त्यालाच सांगता घराबाहेर जा. असे कोणी वागते का? असा सवाल करत ही यावेळी नाव न घेता अजित पवारांवर टीका केली. तसेच सुनील तटकरे हे कायम अजित पवारांच्या कानात सांगायचं. त्यांना काय दिले नाही.

ते आमचे नेते होते, शिवाय ते स्वतः आमदार-मंत्री, मुलगा-मुलगी- पुतण्या- भाऊ हेही आमदार अशा पाच जणांना पदे दिलेले महाराष्ट्रातील घराणे सांगा तसेच अजित पवारांना 4 वेळा उपमुख्यमंत्री केले तरी ही मंडळी विचारता काय दिले. याशिवाय शरद पवारांचे नाव नसते, तर असे अनेक अजित पवार गल्लीत फिरत असते अशी टीका त्यांनी यावेळी केली.

दरम्यान, शरद पवार यांच्या १०० निर्णयांची इतिहासात नोंद आहे. धोरण असो वा लातूरचा भूकंपा असो, अथवा महिला आरक्षण तसेच कोकणचा कॉलिफॉर्निया करण्याचा निर्णय असो हे ऐतिहासिक निर्णय शरद पवार यांनी घेतले. दुसरीकडे अजित पवार गटाने एक निर्णय सांगा जो महाराष्ट्र विसरणार नाही. फक्त अजित पवारांचा धरणात मोजण्याचा निर्णय लोकांच्या लक्षात कायम राहील अशी खोचट टीका आमदार जितेंद्र आव्हाड यांनी केली.

कोकणी माणूस हा शिस्तबद्ध जीवन जगणारा

एसटी बस दोन वेळा फुल होते. एक शिमगा आणि दुसरी गणपतीला. कोकण वासियांची नाळ जेवढी गावाची जोडलेली आहे. तेवढी कोणाचीच जोडलेली नसते. कोकणी माणूस हा फणसासारखा असतो. पण आतून एकदम नरम असतो. तसेच कोकणी माणूस हा शिस्तबद्ध पद्धतीने जीवन जगणारा माणूस आहे. असाही उल्लेख त्यांनी केला.

बारसू रिफायनीने तुम्हालाही मारण्याचा केला विचार

बारसू रिफायनीने चाळीस हजार जणांचे काम जाऊन चार हजार नोकऱ्या मिळणार आहेत. तसेच कोकणाचे सौंदर्य नष्ट होईल. तसेच समुद्रकिनारी मिळणारे मासे १० किलोमीटर आत जातील आणि त्यामुळे छोटे मासेमारी करणारे कोळी बांधव मारले जातील. म्हणजेच तुम्हालाही मारण्याचा विचार केला गेला आहे. असा आरोपही यावेळी आव्हाडांनी केला आहे. या सर्व गोष्टीचा विचार करूनच मतदान करा, हे सरकार बदलायचं आहेच.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Lok Sabha 2024 Phase 5 Election Voting LIVE: मुंबई दक्षिण मध्य मतदारसंघात सकाळी ९ वाजेपर्यंत सरासरी 8 टक्के मतदान

Akshay Kumar: खिलाडी अक्षय कुमारनं भारताचं नागरिकत्व मिळाल्यानंतर पहिल्यांदाच केलं मतदान; म्हणाला, "माझा भारत देश हा..."

Latest Marathi Live News Update: सुनील राऊत पोलिसांवर भडकले

PM Modi : मतपेढीच्या तुष्टीकरणासाठी संस्थांना धमक्या; पंतप्रधानांची ममतांवर टीका

Standing Problems: तुम्हीही जास्त वेळ उभे राहत असाल तर वाढू शकतात 'या' समस्या

SCROLL FOR NEXT