मुंबई

रशियाचं व्हॅक्सिन टुरिझम: लसीच्या डोससह मिळणार 'या' सुविधा

पॅकेजसाठी किती लाख मोजावे लागणार?

दीनानाथ परब

मुंबई: भारतात पुन्हा एकदा व्हॅक्सिन टुरिझमचा विचार जोर धरु लागला आहे. अनेक भारतीय परदेशात जाऊन कोरोना प्रतिबंधक लसींचे डोस घेण्याचा विचार करत आहेत. सध्याच्या घडीला असा विचार करणाऱ्या भारतीयांसमोर मॉस्कोचा (Russia vaccine tourism) पर्याय आहे. दिल्लीतील एका ट्रॅव्हल एजन्सीने व्हॅक्सिन टुरिझम पॅकेज जाहीर केले आहे. या पॅकेजमध्ये २४ दिवसांसाठी रशिया टूर आणि स्पुटनिक-व्ही (Sputnik-V vaccine) लसीच्या दोन डोसचा समावेश आहे. लसीच्या दोन डोसमध्ये २१ दिवसांचे अंतर असेल. या काळात तुम्हाला रशियाची भ्रमंती घडवली जाईल. प्रतिमाणसी १.३ लाख रुपयांचे हे पॅकेज आहे. (Covid-19 24 days in Russia plus 2 Sputnik V shots for Rs 1.3 lakh)

मॉस्कोत उतरल्यानंतर दुसऱ्याच दिवशी तुम्हाला स्पुटनिक व्ही लसीचा पहिला डोस दिला जाईल, असे ट्रॅव्हल एजन्सीच्या अधिकाऱ्याने सांगितले. रशियात जाऊन कोरोना प्रतिबंधक लसीचा डोस घेण्यासाठी ३० डॉक्टरांची पहिली बॅच १५ मे ला च रवाना झाली आहे. यात गुरुग्राममधले डॉक्टर्स आहे. दुसरी बॅच २९ मे ला जाणार आहे. यात दिल्लीमधील डॉक्टर्स आहेत. त्यांनी ग्रुप बुकिंग केल्याचे ट्रॅव्हल एजन्सीतील कर्मचाऱ्याने सांगितले. टाइम्स ऑफ इंडियाने हे वृत्त दिले आहे.

हे ग्रुप तीन दिवस सेंट पीटर्सबर्गमध्ये काढतील आणि उर्वरित दिवस मॉस्कोमध्ये असतील. पॅकेजमध्ये दिल्लीवरुन हवाई प्रवासाचे तिकिट, ब्रेकफास्ट, डिनर आणि पर्यटन स्थळांच्या भ्रमंतीचा समावेश आहे. सध्या रशियाने भारतीयांना व्हॅक्सिनचा डोस घेण्यासाठी त्यांच्या देशात येण्याची परवानगी दिली आहे. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेमुळे अनेक देशांनी भारतीयांना प्रवेशबंदी केली आहे. महत्त्वाचं म्हणजे रशियात गेल्यानंतर तिथे क्वारंटाईन होण्याचीही आवश्यकता नाही.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai Water Supply: मुंबईत २२ ते २६ डिसेंबरपर्यंत पाणी संकट! 'या' भागांसाठी बीएमसीकडून महत्त्वाचा इशारा जारी, वाचा यादी...

Latest Marathi News Live Update : लोकांना जागरूक करण्यात आम्ही अपयशी ठरत आहोत - दलवाई

Upcoming IPO : 2026 मध्ये IPO ची लाट! पैसे तयार ठेवा; रिलायन्स जिओ, PhonePe ते Flipkart या 10 मोठ्या IPO वर बाजाराची नजर

Pachora Nagar Panchayat : पाचोरा पालिकेत शिवसेनेचा भगवा; २८ पैकी २२ जागांवर गुलाल, वाघ गटाला मोठा धक्का

Pune House Burglary : कुलूप तोडून सोनं-रोकड चोरी; कात्रज-मांजरीत दोन घरफोडीच्या घटना!

SCROLL FOR NEXT