crime news mumbai Son kills mother and father family dispute dombivali
crime news mumbai Son kills mother and father family dispute dombivali Sakal
मुंबई

टिटवाळ्यात आई-वडिलांची मुलाने केली हत्या...

सकाळ वृत्तसेवा

डोंबिवली : टिटवाळा येथील एका ३७ वर्षीय मुलाने आपल्‍या आई-वडिलांची हत्‍या केल्‍याची घटना गुरुवारी सायंकाळच्या सुमारास उघडकीस आली. अनमोल भोसले असे या मुलाचे नाव असून त्याने बुधवारी आई-वडिलांची हत्या केली. त्यानंतर दुसऱ्या दिवशी बहिणीला फोन करून आई-वडिलांचा मृत्यू झाल्याचे सांगत घरी बोलावले; मात्र बहिणीला परिस्थिती संशयास्पद वाटल्याने तिने घटनेची माहिती पोलिसांना दिली. दरम्यान, कौटुंबिक वादातून मुलाने हत्या केल्याचा प्राथमिक अंदाज पोलिसांनी वर्तवला आहे.

मांडा-टिटवाळा परिसरातील पंचवटी चौकातील साई दर्पण इमारतीत अशोक भोसले (वय ७०), पत्नी विजया भोसले (वय ६०) आणि मुलगा अनमोल (वय ३७) हे राहतात. अनमोल हा खासगी कंपनीत नोकरी करतो. गुरुवारी सायंकाळी त्याने बहिणीला फोनवरून संपर्क साधत आई-वडिलांचा मृत्‍यू झाल्याचे सांगत घरी बोलावून घेतले. घरी आल्यानंतर तिला वेगळेच चित्र दिसले. आई-वडील रक्ताच्या थारोळ्यात निपचित पडले होते, तर भाऊ त्यांच्या बाजूलाच बसून होता. तिला हा प्रकार संशयास्पद वाटल्‍याने तिने पोलिसांना याबाबत माहिती दिली. पोलिसांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेत तपास सुरू केला. दोघांचे मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवले.

सकृतदर्शनी परिस्थितीवरून मुलगा अनमोल यानेच हत्या केल्याचा संशय आल्याने पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले. चौकशीत त्याने चाकूने गळ्यावर वार करत दोघांची हत्या केल्याचे कबुल केले. बुधवारी त्याने आई-वडिलांची हत्या केली. दिवसभर तो त्यांच्या मृतदेहाशेजारीच बसून होता. गुरुवारी सायंकाळी बहिणीला फोन करून त्याने आई-वडिलांचे निधन झाल्याचे सांगितले. त्‍यानंतर पोलिसांनी याप्रकरणी गुन्हा दाखल करत अनमोल याला अटक केली आहे. कौटुंबिक वादातून आलेल्या नैराश्यातून त्याने आई-वडिलांची हत्या केल्याचा प्राथमिक अंदाज टिटवाळा पोलिसांनी व्‍यक्‍त केला.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Latest Marathi News Live Update: नागपूरकडे निघालेल्या हेलिकॉप्टरचं जालन्यात इमर्जन्सी लँडिंग

Champions Trophy 2025 : जागा ठरली! पाकिस्तानने केली मोठी घोषणा; PCBच्या निर्णयानंतर BCCI उचलणार मोठं पाऊल?

Kansas Bizarre : आधी बायकोची केली हत्या, मग विम्याच्या पैशातून खरेदी केली चक्क 'सेक्स डॉल'.. पोलीसही झाले हैराण!

Shilpa Shetty: शिल्पाच्या मुलाला पंजुर्लीने दिला आशीर्वाद! काय आहे शिल्पाचं कांतारा कनेक्शन ?

Big Discount: केंद्रानंतर 21 राज्यांनी केली घोषणा! जुनी कार स्क्रॅप करून नवीन कारवर मिळेल 50 हजारांची सूट

SCROLL FOR NEXT