crime update 44 year old widow women murdered 25 year old boyfriend absconding
crime update 44 year old widow women murdered 25 year old boyfriend absconding sakal media
मुंबई

उल्हासनगर : ४४ वर्षांच्या विधवा महिलेची हत्या, २५ वर्षांचा प्रियकर फरार

सकाळ वृत्तसेवा

उल्हासनगर - एका 44 वर्षीय विधवा महिलेची तिच्या प्रियकराने भिंतीवर डोके आपटून खून केल्याची घटना उल्हासनगरातील विठ्ठलवाडी पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडली. या घटनेनंतर महिलेचा प्रियकर फरार झाला आहे.सुकन्या या 44 वर्षांच्या महिलेच्या पतीचे 7 वर्षापूर्वी निधन झाले. ती सध्या चिंचपाडा परिसरात मुलांसोबत राहत होती. सुकन्याची 25 वर्षांच्या अनिल भातसोडे याच्याशी ओळख झाली होती.

अनिल हा बेरोजगार होता. या ओळखीचे रुपांतर प्रेमसंबंधात झाले. अनिलने सुकन्याला लग्नाचं आश्वासनही दिले होते. अनिल तिच्याकडून पैसेही घ्यायचा. सुकन्याने पैसे न दिल्यास अनिल तिला मारहाण करायचा. मंगळवारी सुकन्या आणि अनिलमध्ये पैशांवरुन वाद झाला. अनिलने सुकन्याला मारहाण करत तिचे डोके भिंतीवर आपटले. यात सुकन्या गंभीर झाली. घटनेनंतर अनिलने तिथून पळ काढला. सुकन्याला स्थानिकांनी खासगी रुग्णालयात नेले. तिथून कळवा येथील सरकारी रुग्णालयात नेत असताना तिचा मृत्यू झाला.

दरम्यान, आरोपी अनिलकडे मोबाईल नसल्याने तो विविध रेल्वे स्टेशनवर प्रवाशांना ‘माझा फोन चोरीला गेलाय’ असे सांगून त्यांच्या फोनवरून भावाला फोन करत आहे. वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजय गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे डिटेक्शनचे उपनिरीक्षक हर्षल राजपूत,हवालदार रामदास मिसाळ,सुजित निचिते यांची टीम अनिलच्या मागावर आहेत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Covishield बनवणाऱ्या कंपनीने ब्रिटिश कोर्टात मान्य केले लसीचे दुष्परिणाम! कोणते साईड एफेक्ट्स होतात जाणून घ्या

Share Market Opening: शेअर बाजाराची वाढीसह सुरुवात; निफ्टी बँक पुन्हा नवीन विक्रमी उच्चांकावर

Rohit Sharma Birthday : 'सलाम रोहित भाई...' मुंबईने टीम इंडियाच्या कर्णधारचा बड्डे अनोख्या पद्धतीने केला साजरा - Video

VIDEO: वडील असावेत तर असे! घटस्फोट झालेल्या मुलीचे माहेरी केले जंगी स्वागत; व्हिडिओ होतोय व्हायरल

Latest Marathi News Live Update : उत्तर मुंबईचे भाजपचे उमेदवार पियुष गोयाल आज भरणार उमेदवारी अर्ज

SCROLL FOR NEXT