crime update mumbai Vehicle thief arrested in ten hours due fast tag
crime update mumbai Vehicle thief arrested in ten hours due fast tag sakal
मुंबई

फास्ट टॅगमुळे दहा तासात वाहनचोर गजाआड

सकाळ वृत्तसेवा

भाईंदर : टोलनाक्यावरील टोल वसुलीसाठी जाणारा वेळ वाचविण्यासाठी सर्व वाहनांना फास्ट टॅग बसविण्याचे आदेश आहेत. अनेक वाहनांनी फास्ट टॅग बसवून घेतला असल्यामुले टोल नाक्यावर वेळेची बचत तर होतच आहे मात्र या फास्ट टॅगमुळे भाईंदर येथील चोरीला गेलेल्या डंपरचा अवघ्या दहा तासात शोध लावून चोराला ताब्यात घेणे पोलीसांना शक्य झाले आहे.

भाईंदर पश्चिम येथील अतुल ठाकूर यांचा सिद्धेश ट्रान्स्पोर्ट या नावाचा ट्रक-डंपरचा व्यवसाय आहे. गेल्या आठवड्यात गुरुवारी पहाटे चार वाजता ठाकूर यांना त्यांच्या मोबाईलवर बँकेकडून संदेश आला. एवढ्या सकाळी कोणता संदेश आला म्हणून ठाकूर यांनी संदेश तपासला असता त्यांच्या खात्यातून फास्ट टॅगद्वारे पैसे कट झाल्याचे संदेशात म्हतले होते. फास्ट टॅगचा उपयोग पडघा येथील अर्जुन अली टोलनाक्यावर झाल्याचेही त्यात नमूद करण्यात आले होते. ठाकूर यांना संशय आल्यामुळे त्यांनी तपासणी केली असता त्यांचा डंपर नाहीसा झाल्याचे लक्षात आले. त्यांनी तातडीने भाईंदर पोलीस ठाणे गाठले. पोलीसांनी देखील त्वरित हालचाल केली.

पोलीसांनी सर्वप्रथम फास्ट टॅगबाबत आलेल्या संदेशावरुन डंपर चोर गाडी घेऊन नाशिकच्या दिशेने निघाला असल्याचा कयास केला. त्याच्या पुढचा टोलनाका घोटी याठिकाणी असल्यामुळे घोटी पोलीसांना डंपरची सर्व माहिती देण्यात आली आणि पोलीसांची एक गाडी घोटीच्या दिशेने रवाना केली. घोटी पोलीसांनी घोटी टोलनाक्यावरील कर्मचार्‍यांना सावध केले आणि घोटी टोलनाक्यावर डंपर येताच चोरासह डंपर ताब्यात घेतला. भाईंदर पोलीस देखील थोड्या वेळात घोटी येथे दाखल झाले आणि त्यांनी चोराला अटक केली. आधुनिक तंत्रद्न्यान आणि भाईंदर पोलीसांनी दाखवलेली सतर्कता यामुळे चोरीला गेलेला डंपर अवघ्या दहा तासात ताब्यात घेणे शक्य झाले आहे. अटक करण्यात आलेला चोर हा वाळू चोरांशी संबंधित असून चोरी केलेला डंपर अवैध रेती वाहतूकीसाठी वापरण्यात येणार असण्याची शक्यता पोलीसांनी वर्तवली आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

कोरोना लसीच्या सर्टिफिकेटवरुन PM मोदींचा फोटो काढला! आरोग्य मंत्रालयाने का घेतला निर्णय?

Vishal Patil: "विशाल पाटील भाजपची बी टीम," चंद्रहार पाटलांचा सनसणीत आरोप; प्रचाराच्या अंतिम टप्प्यात सांगलीचा पार चढणार

Johnson Baby Powder: जॉन्सन अँड जॉन्सन कर्करोगाचे खटले निकाली काढणार; कंपनी देणार 6.5 अब्ज डॉलर्सची भरपाई

CSK Playoffs Scenario : CSKवर टांगती तलवार... प्ले-ऑफमध्ये जाण्यासाठी उरला एकच रस्ता; अन्यथा टॉप-4 मधून पत्ता कट

Navi Mumbai Crime: उरण मधील महिलेच्या हत्या प्रकरणात दुसरा आरोपी अटकेत, वय फक्त १९ वर्ष

SCROLL FOR NEXT