मूर्तीवर हिरेजडित सजावट करताना मूर्तिकार सिद्धेश बोरीटकर.
मूर्तीवर हिरेजडित सजावट करताना मूर्तिकार सिद्धेश बोरीटकर.  
मुंबई

हिरेजडित मुकुट शोभतो बरा!       

प्रवीण शिंदे

ठाणे : गणेशोत्सव अवघ्या १३ दिवसांवर येऊन ठेपला असताना, गणेशमूर्तीवर कसबी कारागिरांचे हात फिरू लागले आहेत. गणेशमूर्ती सजवण्याचे काम आता अंतिम टप्प्यात आले आहे. ठाण्यातील अनेक कारखान्यांमध्ये गणेशमूर्तीला अनेक रत्नांनी आणि अलंकारांनी सजवण्याचे काम सुरू झाले आहे. इमिटेशन ज्वेलरी, तसेच चांदीच्या आभूषणांनी घरगुती गणेशमूर्तीसह सार्वजनिक मंडळांच्या गणेशमूर्ती सजूनच मूर्तिशाळेतून रवाना होणार आहेत. 

गेल्या काही वर्षांत सोन्या - चांदीच्या किमतीत वाढ झाल्यामुळे त्याला पर्याय म्हणून गणेशमूर्तीच्या सजावटीसाठी इमिटेशन ज्वेलरीचा वापर होत आहे. किरीट, त्रिशूळ, हातातील कडे, कमरपट्टा, छत्री, भावलीवरील नक्षीकाम, तबक आदी प्रकारची आभूषणे आणि इमिटेशन ज्वेलरी वापरण्यात येत आहे. 

ठाण्यातील पाचपाखाडी परिसरातील मूर्तिकार सिद्धेश अरुण बोरीटकर यांच्या कारखान्यात गणेशमूर्तींना इमिटेशन ज्वेलरीने सजवण्याचे काम सुरू आहे. त्यासाठी लागणारे साहित्य भायखळ्याच्या बाजारपेठेतून आणले जाते. गणेशमूर्तीच्या उंचीनुसार ज्वेलरी वापरली जात असून, त्यानुसारच कारागिरांचे मानधन ठरते. एका दिवसामध्ये एक कारागीर साधारण सहा ते आठ गणेशमूर्तीना सजवण्याचे काम करतो. 

या वर्षी इमिटेशन ज्वेलरीच्या गणेशमूर्तीच्या सुमारे ८०० ते एक हजारच्या आसपास ऑर्डर आल्याची माहिती बोरीटकर यांनी दिली. यंदाही इमिटेशन ज्वेलरीने सजवलेल्या गणेशमूर्ती ठाण्यासह मुंबई, दिल्ली, उत्तर प्रदेश, तमिळनाडू, राजस्थान आणि रत्नागिरीमध्ये रवाना होणार असल्याची माहिती कारागीर मनीष पांचाळ आणि बारक्‍या पन्देरे यांनी दिली.     

पेन्शन योजना सुरू करा!                               
राज्य सरकारने ६० वर्षांपुढील मूर्तिकारासाठी पेन्शन योजना सुरू करावी. गणेशमूर्ती घडवण्यासाठी रात्रंदिवस मेहनत करावी लागते. त्यामुळे अनेक मूर्तिकारांची मुले या व्यवसायात उतरत नाही. त्यामुळे या व्यवसायात इतर भाषिकांचे प्रमाण वाढत आहे. त्यासाठी सरकारने ठोस पावले उचलण्याची गरज आहे.

जागा सर्वांत मोठी समस्या
मूर्तिकारासाठी ‘जागा’ ही सर्वात मोठी समस्या आहे. त्यामुळे सरकारने गणेशमूर्तीच्या कारखान्यांसाठी भूखंड भाडेतत्त्वावर द्यावेत, अशी मागणी त्यांनी केली. यंदा ठाणे पालिकेकडे महिन्यापूर्वीच गणेशमूर्ती घडवण्यासाठी जागेची मागणी केली; मात्र प्रशासनाने परवानगी नाकारल्याने मोठे नुकसान झाल्याचे मूर्तिकार अरुण बोरीटकर यांनी सांगितले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2024 LSG vs RR : केएल शेर तर संजू सवा शेर! राजस्थानचा एक पाय प्ले ऑफमध्ये

DC vs MI : गोलंदाजीतली 'गळती' मुंबईच्या मुळावर; बॅटिंगमध्ये फर्स्ट क्लास तर बॉलिंगमध्ये नापास

Jolly LLB 3 : आता रंगणार जॉली विरुद्ध जॉली केस; सिनेमाच्या शूटिंगबाबत महत्त्वाची अपडेट आली समोर

Google वर जाहिराती करण्यासाठी भाजपने खर्च केले 100 कोटी; BJP पहिल्या स्थानावर तर काँग्रेस कितव्या स्थानावर? वाचा सविस्तर...

CM Yogi Aadityanath : ''काशी अन् अयोध्येनंतर आता मथुरेकडे प्रस्थान...'' योगी आदित्यनाथांचे स्पष्ट संकेत

SCROLL FOR NEXT