मुंबई

हॉटेलच्या स्वयंपाकघरात ग्राहकांना जाऊ द्या

सकाळवृत्तसेवा

मुंबई - ग्राहकांना उपाहारगृहांच्या स्वयंपाकघरात जाण्याची परवानगी द्यावी. त्यासाठी महापालिकेने परवाना देताना तशी अट टाकावी, अशी ठरावाची सूचना महापालिकेच्या महासभेत मांडण्यात आली आहे.

अन्न व औषध प्रशासनाने काही महिन्यांपूर्वी मुंबईतील शेकडो उपाहारगृहांचे परवाने रद्द केले होते. त्या उपाहारगृहांमध्ये स्वच्छतेचे निकष पाळले जात नसल्याचे तपासणीत उघड झाले होते. मुंबईतील अनेक उपाहारगृहांचा दर्शनी भाग सुशोभित असतो; मात्र स्वयंपाकघर गलिच्छ असते. त्यामुळे ग्राहकांच्या आरोग्यावर परिणाम होण्याची शक्‍यता असते. त्यासाठी ग्राहकांनी मागणी केल्यास त्यांना उपाहारगृहांचे स्वयंपाकघर पाहण्याची परवानगी मिळणे गरजेचे आहे, अशी ठरावाची सूचना शिवसेनेच्या तेजस्वी घोसाळकर यांनी महासभेत मांडली आहे. पालिका ३९२ कलमानुसार उपाहारगृहांना परवाने मिळतात. परवाने देताना त्यात अशा अटीचा समावेश करण्याची मागणीही ठरावाच्या सूचनेत करण्यात आली आहे.

मटणाच्या प्रकाराचे फलक 
उपाहारगृहांमध्ये मटण कोणत्या पद्धतीने कापले आहे त्याबाबतचे फलक लावण्यात यावे, अशी ठरावाची सूचना काँग्रेसच्या मेहर हैदर यांनी मांडली. उपाहारगृहांबरोबरच पिझ्झा हट, डॉमिनोज, मॅकडोनाल्ड आदींसारख्या फास्टफूड सेंटरमध्येही मटण कोणत्या प्रकारे कापले त्याची माहिती देणे बंधनकारक करण्याची मागणी करण्यात आली आहे. पूर्व दिल्ली महानगर पालिकेने अशा प्रकारे फलक लावणे बंधनकारक केले आहे. मुस्लिम समाजात हलाल पद्धतीने कापलेले मटण आहारात वापरले जाते.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Jalgaon Major Accident: भरधाव कारच्या धडकेत मजुरी करण्याऱ्या आईसह दोन चिमुकले ठार!

IPL 2024 DC vs RR : दिल्लीचा राजस्थानला दणका, घरच्या मैदानात मिळवला दणदणीत विजय; संजू सॅमसनचे अर्धशतक व्यर्थ

Virtual Touch: बालकांना 'व्हर्च्युअल स्पर्शा'च्या धोक्याची जाणीवही करुन देणं गरजेच - हायकोर्ट

Navneet Rana: "काँग्रेसला मत देणं म्हणजे थेट पाकिस्तानला मत देणं"; नवनीत राणांचं वादग्रस्त विधान

यवतमाळ जिल्हा कारागृहातील धक्कादायक घटना; कारागृहातील अधिकारी, कर्मचाऱ्यावर कैद्यांच्या टोळीचा हल्ला

SCROLL FOR NEXT