mhada
mhada 
मुंबई

धोकादायक इमारती कोसळून 48 वर्षांत 800 जणांचा मृत्यू

सकाळवृत्तसेवा

मुंबई - मुंबईतील धोकादायक इमारतींचा तपशील म्हाडा प्राधिकरण गोळा करत आहे. दुरवस्था झालेल्या इमारती कोसळून 48 वर्षांत 800 जणांचा मृत्यू झाला आणि 1183 जण जखमी झाल्याचे उघड झाले आहे.

सीएसएमटीलगतचा हिमालय पूल दुर्घटनेनंतर म्हाडा दुरुस्ती व पुनर्वसन मंडळाने मुंबईतील धोकादायक इमारतींचा आढावा घेण्यास सुरुवात केली. या धोकादायक इमारतींची यादी राज्य सरकारला नुकतीच सादर करण्यात आली आहे. म्हाडाने दिलेल्या माहितीनुसार 1971 ते 2018 या काळात मुंबईतील 3528 इमारती दुर्घटनाग्रस्त झाल्या. दर वर्षी सुमारे 25 इमारतींचा कोणता ना कोणता भाग कोसळतो, असे म्हाडाच्या अहवालात नमूद आहे. म्हाडा दर सहा महिन्यांनी मुंबईतील धोकादायक इमारतींची यादी तयार करते. पावसाळ्याच्या सुरुवातीला या इमारतींमधील रहिवाशांना नोटीस बजावून सदनिका रिकाम्या करण्यास सांगितले जाते.

म्हाडाने राज्य सरकारला सादर केलेल्या यादीनुसार सर्वाधिक 530 धोकादायक इमारती कामाठीपुरा परिसरात आहेत. त्यापैकी 180 इमारती दुर्घटनाग्रस्त झाल्या आहेत. याच भागातील 125 इमारती राहण्यायोग्य नसल्याचे अहवालात नमूद आहे. या इमारतींचा पुनर्विकास करणे हे मोठे आव्हान म्हाडासमोर असल्याचे सूत्रांनी सांगितले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Accident : दोन जणांचा जीव घेऊनही आरोपी का सुटला? कायदा काय सांगतो? कायदेतज्ज्ञांनी सांगितल्या तरतुदी

Lok Sabha Election 2024 : दिव्यात निवडणूक आयोगाचा भोंगळ कारभार चव्हाट्यावर; मतदारांत तीव्र संताप

Nashik Lok Sabha: नाशिकमध्ये आमदार देवयानी फरांदे माजी आमदार वसंत गीतेंमध्ये वाद; बूथवर उडाला गोंधळ

IPL 2024: 'मला फक्त शेवटची संधी द्या...', RCB कडून खेळणाऱ्या स्वप्नील सिंगला व्यक्त होताना अश्रु अनावर

Pune Rain Updates : पुण्यात पावसाचा उद्रेक! कुठे झाडं कोसळली, कुठे पत्रे उडाले तर अनेक रस्त्यांवर पाणीच पाणी

SCROLL FOR NEXT