मुंबई

शाळेच्या मैदानात डेब्रिजचे ढिगारे

सकाळवृत्तसेवा

ऐरोली - देशभर प्रजासत्ताक दिन मोठ्या उत्साहात साजरा केला जात असताना दिघ्यातील संजय गांधी नगरातील ज्ञानविकास शाळेतील विद्यार्थ्यांनी मात्र दगडधोंडे तुडवीत झेंड्याला सलामी दिली. दिघा येथील पॉवर हाऊसच्या बाजूला असलेल्या या शाळेसमोरील मैदानात के. रहेजा कंपनीने मोठमोठे दगड आणि माती टाकून शाळेची जागा हडप करण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप युनिव्हर्सल एज्युकेशन सोसायटीचे संस्थापक अध्यक्ष बाबुराम यादव यांनी केला आहे.

दिघ्यात युनिव्हर्सल एज्युकेशन सोसायटीचे ज्ञानविकास हिंदी हायस्कूल व मॉडर्न इंग्लिश स्कूल आहे. शाळेची विद्यार्थीसंख्या ८०० आहे. २८ शिक्षक असलेली ही शाळा सकाळ व दुपार अशी दोन सत्रांत भरते. या शाळेचे एक हजार चौरस मीटर क्षेत्रफळाचे मैदान असून या मैदानावर विद्यार्थ्यांचे खेळ, शाळेतील सांस्कृतिक व सार्वजनिक कार्यक्रम होतात; मात्र दिवाळीच्या सुट्टीत १० नोव्हेंबर २०१८ रोजी के. रहेजा कंपनीने शाळेचे कुंपण तोडून ४० ते ५० ट्रक माती व दगड शाळेच्या मैदानात टाकले. या डेब्रिजमुळे विद्यार्थ्यांना खेळण्यास जागा उरली नाही.

१९८३ पासून इथे शाळा सुरू आहे. ग्रामपंचायत काळात शाळेच्या सर्व परवानग्या घेतल्या असताना बाजूला असलेल्या के. रहेजा कंपनीने गेल्या काही वर्षांपासून शाळेला त्रास देण्यास सुरुवात केली. शाळा हटवून कंपनी जागा हडप करू पाहत आहे, असा आरोप युनिव्हर्सल एज्युकेशन सोसायटीचे संस्थापक अध्यक्ष बाबुराम यादव यांनी केला आहे. याबाबत त्यांनी जिल्हाधिकारी, पालिका व पोलिसांत रीतसर तक्रारी दिल्या असल्या, तरी कुठूनही काही कारवाई होत नसल्याबाबत त्यांनी नाराजी व्यक्त केली. 

या सर्व प्रकाराला रहेजा कंपनीचे मुख्य सुरक्षा अधिकारी चेतन कुठमेथे जबाबदार असल्याचा आरोप त्यांनी केला आहे. पालकांनी शाळेच्या मैदानात दगडमाती टाकली असल्याने संताप व्यक्त केला.

विद्यार्थ्यांची सुरक्षा धोक्‍यात
शाळेसमोरील मैदानात दगड-माती टाकल्याने विद्यार्थ्यांची सुरक्षा धोक्‍यात आली असून आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. त्यामुळे मैदानात खेळता येत नसल्याने विद्यार्थ्यांसह शिक्षक व पालक नाराज आहेत.

शाळा सुरू असताना शाळेच्या मैदानात अशा प्रकारे दगडमाती टाकणे योग्य नव्हे. मैदान पूर्ववत करून विद्यार्थ्यांना खेळायला मिळावे, हीच इच्छा आहे.
- विनोद यादव, प्रभारी मुख्याध्यापक, ज्ञानविकास हिंदी हायस्कूल

एमआयडीसीकडून कंपनीला हा भूखंड मिळाला आहे. भूखंडावर शाळा असली, तरी ती कंपनीची जागा असल्याने आम्ही तिथे कंपनीत चालू असलेल्या कामातून निघालेली दगडमाती टाकली आहे.
- चेतन कुठमेथे, मुख्य सुरक्षा अधिकारी, के. रहेजा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Rain Updates : पुण्यात पावसाचा उद्रेक! कुठे झाडं कोसळली, कुठे पत्रे उडाले तर अनेक रस्त्यांवर पाणीच पाणी

Pune Porsche Crash : कल्याणीनगर अपघातापूर्वी अन् नंतर नेमकं काय घडलं? जाणून घ्या संपूर्ण घटनाक्रम

Mumbai Lok Saha Election : मुंबईत अनेक ठिकाणी संथगतीने मतदान! कळवा-मुंब्र्यात अनेकजण मतदान न करताच परतले

Lok Sabha Election: कल्याण पश्चिम, भिवंडी मतदारसंघात निवडणूक आयोगाचा सावळा गोंधळ; मतदार यादीतून हजारो नागरिकांची नावं गायब

'शरद पवारांनी भाजपला पाठिंबा दिला होता, ती जर सुपारी होती तर आमचीही..'; आव्हाड, राऊतांच्या टीकेला मनसे आमदाराचं प्रत्युत्तर

SCROLL FOR NEXT