बापसई येथील आदिवासी पाड्यांवर दिवाळी साजरी करण्यात आली
बापसई येथील आदिवासी पाड्यांवर दिवाळी साजरी करण्यात आली 
मुंबई

आदिवासी पाड्यावर दिवाळी साजरी

सकाळ वृत्तसेवा

कल्याण : कर्णिक रोड येथील छत्रपती शिक्षण मंडळाच्या प्राथमिक विद्या मंदिरतर्फे बापसई येथील आदिवासी पाड्यांवर दिवाळी साजरी करण्यात आली. शाळेतर्फे गेल्या 9 वर्षांपासून शाळेतील विद्यार्थी, शिक्षक व पालक सामाजिक बांधिलकीतून हा उपक्रम राबवत आहेत.

धान्य, पणत्या व मिठाईचे वाटप या वेळी करण्यात आले. पणत्या व मुलांनी तयार केलेले आकाशकंदील लावून आदिवासी मुलांच्या चेहऱ्यावर एकच आनंद पाहायला मिळाला. या उपक्रमासाठी डॉ. वसुधा पवार व चिन्मय मिशन यांचे सहकार्य लाभले. शाळेच्या मुख्याध्यापिका भारती वेदपाठक यांनीही या उपक्रमात सहभाग घेतला.

विद्यार्थी व पालकांचे सामाजिक कर्तव्य व जाणीव जागृती या उपक्रमाच्या माध्यमातून रुजविण्याचा प्रयत्न शाळा करते. जल, जंगल, जीवन या आदिवासींच्या हक्कासाठी झगडणारा आमच्या शाळेचा विद्यार्थी विशाल जाधव याच्या माध्यमातून आम्ही हा कार्यक्रम केल्याचे या वेळी शिक्षकांनी सांगितले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Bird Flu: देशात बर्ड फ्लूचा धोका वाढला? आरोग्य मंत्रालयाने दिली महत्त्वाची माहिती

Pregnancy Termination: SCने 14 वर्षांच्या अल्पवयीन मुलीला गर्भपात करण्यासाठी दिलेली परवानगी घेतली मागं; सरन्यायाधीशांनी का बदलला निर्णय?

Virat Kohli : 'तुमच्यापेक्षा माझा खेळ मी अधिक जाणतो म्हणूनच....' विराट कोहलीने टीकाकारांना दिले उत्तर

Latest Marathi News Live Update : संभाजीराजेंवर कुणी दबाव टाकला याचा सामंत आज पर्दाफाश करणार

Jharkhand High Court: कायदेशीर प्रक्रियेशिवाय घर पाडता येणार नाही; बुलडोझर कारवाईसंदर्भात झारखंड हायकोर्टाचे महत्त्वाचे निर्देश

SCROLL FOR NEXT