मोनो-मेट्रोत वेगळ्या डब्याची डबेवाला संघटनांची मागणी
मोनो-मेट्रोत वेगळ्या डब्याची डबेवाला संघटनांची मागणी  
मुंबई

मोनो-मेट्रोत वेगळा डबा हवा!

सकाळ वृत्तसेवा

मुंबई : दररोज सुमारे दोन लाख नोकरदारांची भूक भागवणाऱ्या डबेवाल्यांना सध्या मोनो आणि मेट्रो गाड्यांतून प्रवास करण्यास प्रतिबंध आहे. त्यामुळे नव्या मोनो आणि मेट्रो सेवेत डबेवाल्यांसाठी आरक्षित जागा किंवा वेगळा डबा द्यावा, अशी मागणी डबेवाला संघटनांनी एमएमआरडीएकडे केली आहे.

डबेवाला संघटनांनी या मागणीचे निवेदन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाचे (एमएमआरडीए) आयुक्त आर. ए. राजीव यांना पाठवले आहे. यासंदर्भात लवकरच त्यांची भेट घेणार असल्याची माहिती मुंबई डबेवाला संघटनेचे अध्यक्ष सुभाष तळेकर यांनी दिली. मुंबई डबेवाला संघटनेच्या पाच हजार सदस्यांमार्फत सुमारे दोन लाख डबे दररोज पोहोचवले जातात. त्यासाठी डबेवाले लोकल सायकलचा वापर करतात; तसेच चालतही जातात, असे निवेदनात नमूद करण्यात आले आहे.

रेल्वे प्रशासनाने डबेवाल्यांना लोकलमधील सामानाच्या डब्यातून गर्दीच्या वेळी जेवणाचे डबे नेण्यासाठी विशेष परवानगी दिली आहे. उपनगरी गाड्यांतील राखीव डब्यांतून जेवणाचे डबे नेताना मोठी कसरत करावी लागते. पूर्व आणि पश्‍चिम उपनगरांमध्ये डबे पोहोचवण्यासाठी लागणारा वेळ आणि श्रम वाचवण्यासाठी मोनो आणि मेट्रो सेवांचा वापर करण्याची परवानगी मिळावी, अशी डबेवाला संघटनांची मागणी आहे. 

‘अपंगांप्रमाणे आमचाही विचार करा’
मुंबईत सध्या एक मेट्रो आणि एक मोनो मार्ग सुरू आहे; दोन मेट्रो सेवा लवकरच सुरू होणार आहेत. एमएमआरडीएने मेट्रोच्या नव्या डब्यांत अपंगांच्या तिचाकी सायकलसाठी वेगळी जागा दिली आहे. त्याचप्रमाणे डबेवाल्यांचाही विचार करावा, असे डबेवाला संघटनेचे म्हणणे आहे.
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Covishield बनवणाऱ्या कंपनीने ब्रिटिश कोर्टात मान्य केले लसीचे दुष्परिणाम! कोणते साईड एफेक्ट्स होतात जाणून घ्या

Accident News: लग्नाला जात असताना भीषण अपघात; खडी भरलेला हायवा 3 स्कॉर्पिओवर उलटला अन्..., 6 जणांचा मृत्यू

Team India Squad T20 WC : संघाची घोषणा होण्याआधी मोठी अपडेट; टीम इंडियाचा उपकर्णधार बदलणार... पांड्याची जागा घेणार 'हा' खेळाडू?

Share Market Today: शेअर बाजारातील तेजी आजही कायम राहील का? काय आहे तज्ज्ञांचा अंदाज

Latest Marathi News Live Update : विजय शिवतारे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या भेटीला

SCROLL FOR NEXT