मुंबई

धारावीतील ‘गरबी’ परदेशात

उत्कर्षा पाटील

मुंबई - गुजराती समाजामध्ये नवरात्रीतील गरब्याला खूप महत्त्व आहे. नऊ दिवसांत त्यांच्याकडून विविध लेस (रंगीबेरंगी पट्ट्या), आरसा, टिकल्या आणि मण्यांनी सजवलेल्या गरबीमध्ये (मडकी) दिवा लावून पूजन केले जाते.

धारावीतील कुंभारवाड्यात प्रत्येकाच्या घरात अशा ‘गरबी’ बनवण्याचे काम चालते. नवरात्रीसाठी कुंभारवाड्यात सुमारे एक लाख गरबी तयार केल्या जातात आणि त्यांचे मुंबईसह गुजरातमध्येही वितरण केले जाते. यंदा तर इकडच्या गरबी थेट परदेशात गेल्या आहेत.

धारावी कुंभारवाड्यातील कारागीर अब्बास गलवानी यांच्या गरबी अमेरिका, लंडन, जर्मनी, आफ्रिका आदी देशांतील ग्राहकांपर्यंत पोहोचल्या आहेत. या वर्षी अब्बास यांनी वेगळेपणा आणून दिवा ठेवण्यासाठी दरवाजा असलेल्या गरबीची निर्मिती केली आहे. विशेष म्हणजे त्या सर्वांची विक्री झाली आहे. अब्बास म्हणाले की, माझे विविध देशांत ग्राहक आहेत. त्यांच्या मागणीनुसार काहींना ६०० तर काहींना १२०० गरबी पाठवल्या आहेत. 

एका प्रकारात (पॅटर्न) साधारणतः १० गरबी तयार केली जातात. असे सुमारे १० ते १२ प्रकार आहेत. आमच्याकडे मुलुंडहून गरबींची ऑर्डर आहे. नक्षीच्या मदतीने आकर्षक घागरा तयार करण्यासाठी काही फॅशन डिझायनरही आमच्याकडून गरबी विकत घेतात.
- रेखा सरवय्या, गरबी सजावटकार 

आमच्याकडील गरबींचे मुंबईबरोबरच राज्यभरात वितरण होते. आतापर्यंत आमच्या सर्व गरबी पोहोचल्या आहेत. आता फक्त स्थानिक गिऱ्हाईकांसाठी गरबी विक्रीस ठेवल्या आहेत. 
- सिक्कीयार चौहान, गरबी विक्रेते

७५ ते १२०० पर्यंत किंमत
धारावीतील कुंभारवाड्यात प्रत्येक घरात महिलांकडून गरबीवर नक्षीकाम केले जाते. प्रत्येक घरातून सुमारे ५०० गरबी होतात. अशा तयार गरबी मुंबईतील सर्व भागांसह गुजरातमध्येही विक्रीसाठी पाठवल्या जातात. गरबीवरील आकर्षक डिझाईन व आकारानुसार त्याच्या किमती ठरतात. छोट्यात छोटी ७५, मध्यम १५० ते ५०० तर मोठी गरबी हजार ते बाराशेपर्यंत मिळते.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Lok Sabha 2024: मतदान केंद्रांना नायलॉनच्या जाळ्यांचे कवच, 101 वाघ असलेल्या जंगलात असं पार पडणार वोटींग

Latest Marathi News Update: पुण्यात १० मे रोजी राज ठाकरेंची सभा; मोहोळ यांचा करणार प्रचार

ICC Champions Trophy 2025 : चॅम्पियन्स ट्रॉफी खेळण्यासाठी भारत पाकिस्तानात जाणार? बीसीसीआयनं स्पष्टच सांगितलं

Viral Video: 'बाबा वारले,आई सोडून गेली..' रोल विकणाऱ्या १० वर्षांच्या मुलाची हिंमत पाहून भारावले आनंद महिंद्रा, केली मोठी घोषणा

Bomb Hoax in 16 Schools: मतदानादिवशी 16 शाळांना बॉम्बनं उडवून देण्याची धमकी! रशियातून आला ईमेल ? पोलिसांचं धाबं दणाणलं

SCROLL FOR NEXT