मुंबई

महिला डब्यावरील नव्या चिन्हाबाबत नाराजी

सकाळवृत्तसेवा

मुंबई - पश्‍चिम रेल्वेच्या लोकलमधील महिला डब्यावर असलेले साडीतील महिलेचे रेखाचित्र (लोगो) बदलून आधुनिक कॉर्पोरेट वेशातील महिलेचे रेखाचित्र लावल्यामुळे महिला प्रवाशांमध्ये नाराजी पसरली आहे. त्यामुळे जुने चिन्ह पुन्हा लावण्याची मागणी महिला संघटनांकडून होत आहे.

लोकलमधील ११० महिला डब्यांवर नवे चिन्ह झळकेल, असे पश्‍चिम रेल्वेकडून सांगण्यात आले.नव्या ‘कॉर्पोरेट’ चिन्हाचे काही प्रमाणात स्वागत होत असले, तरी समाजमाध्यमांतून पश्‍चिम रेल्वेवर टीका केली जात आहे. रेल्वे प्रशासनाने लोगो बदलण्याऐवजी महिला प्रवाशांसाठी अद्ययावत सुविधा उपलब्ध करून द्याव्यात. महिला प्रवाशांच्या सुरक्षिततेकडे अधिक लक्ष द्यावे, अशी मागणी होत आहे. 

महिला संघटना म्हणतात, त्यापेक्षा सुविधा द्या!
पश्‍चिम रेल्वे प्रशासनाने त्याऐवजी महिला प्रवाशांना सुविधा पुरवण्याकडे अधिक लक्ष दिले पाहिजे. रेल्वेने चिन्हात बदल करून ‘मॉडर्न’ होण्याऐवजी कामाच्या पद्धतीत आधुनिकता आणल्यास प्रवास सुखाचा होईल, अशी मागणी महिला प्रवासी रेल्वे संघटनेच्या अध्यक्षा वंदना सोनवणे यांनी केली.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Nana Patole : खोके द्या, फोडा अन् राज्य करा ; पटोलेंची मोदींवर टीका,राज्याचे नुकसान केल्याचा आरोप

Prakash Ambedkar : सुळे, पाटलांमुळे बारामतीतून माघार ; डॉ. प्रकाश आंबेडकरांनी फोडले गुपित,यंदा खाते उघडणार

Water Scarcity : पिण्याच्या पाण्यासाठी दाहीदिशा वणवण ; राज्यात भीषण टंचाई,७४९५ वस्त्यांवर टँकरद्वारे पुरवठा

Latest Marathi News Live Update : PM मोदींची माढा, धाराशिवसह लातूरमध्ये सभा, तर 25 वर्षानंतर वेल्ह्यात धडाडणार शरद पवारांची तोफ

Daily Rashi Bhavishya : आजचे राशिभविष्य - 30 एप्रिल 2024

SCROLL FOR NEXT