मुंबई

डॉक्‍टरांचा संप बेतला चिमुकल्याच्या जिवावर

सकाळन्यूजनेटवर्क

मुंबई - आपल्या हक्काच्या मागण्यांसाठी डॉक्‍टरांनी पुकारलेल्या संपामुळे वेळीच उपचार न मिळाल्याने बोरिवली येथील स्वर्ण फाटक (वय तीन वर्षे) या चिमुकल्याला आपला जीव गमवावा लागला आहे. मागील महिन्यात नायर रुग्णालयात शस्त्रक्रिया झालेल्या स्वर्णला अचानक श्‍वसनाचा त्रास सुरू झाला होता, त्यामुळे जवळच्या महापालिकेच्या रुग्णालयात पालकांनी धाव घेतली. मात्र, डॉक्‍टरांच्या संपामुळे आणि अपुऱ्या सोई- सुविधांमुळे वेळेत उपचार न मिळाल्याने त्याचा मृत्यू झाला.

नाक आणि हिरडी यामध्ये पोकळी असल्याने गेल्या महिन्यात स्वर्ण फाटक याच्यावर शस्त्रक्रिया करण्यात आली होती. मात्र, गुरुवारी (ता. 23) सकाळी छातीत कफ झाल्याने त्याला श्‍वसनाचा त्रास सुरू झाला. नातेवाईक लगेचच जवळच्या माता- बालक रुग्णालयात त्याला घेऊन गेले. पण, संपामुळे आणि रुग्णालयातील अपुऱ्या सोई- सुविधांमुळे डॉक्‍टरांनी त्याच्यावर उपचार करण्यास नकार दिला. त्यामुळे त्यांनी तत्काळ खासगी रुग्णालय गाठले. मात्र त्या ठिकाणीही संपाचे कारण सांगण्यात आले. कुठेच उपचार होत नसल्याने फाटक कुटुंबीयांनी नायर रुग्णालयात जाण्याचा निर्णय घेतला. पण, या सर्व प्रकारात जवळपास तीन दोन ते अडीच तास उलटले होते. रुग्णालयात जाण्यापूर्वी स्वर्णने अखेरचा श्‍वास घेतल्याचे नातेवाइकांनी सांगितले.

बोरिवलीतील माता- बालक रुग्णालयाचे काम सुरू असल्याने सुविधांचा अभाव आहे. मात्र, संबंधित प्रकरणात मुलावर उपचार का झाले नाही, याचा आढावा घेऊन योग्य ती कारवाई केली जाईल.
- डॉ. अविनाश सुपे, अधिष्ठाता, केईएम रुग्णालय

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Amit Shah Fake Video: अमित शाहांच्या Edited व्हिडिओबाबत दिल्ली पोलिसांची मोठी कारवाई, गृहमंत्रालयाच्या तक्रारीवरून FIR दाखल

New Zealand squad T20 WC24 : टी-20 वर्ल्ड कप 2024 साठी संघाची घोषणा! 'हा' खेळाडू सांभाळणार कर्णधारपदाची धुरा

Israel-Hamas War: शस्त्रसंधीच्या चर्चा सुरू असतानाच इस्राइलने गाझामध्ये डागली क्षेपणास्त्रे; हल्ल्यात 13 जणांचा बळी, कित्येक जखमी

Chhattisgarh Accident News: कार रस्त्यावर उभी असताना पिकअपची धडक अन्.... भीषण अपघातात ८ ठार, मृतांमध्ये 3 लहान मुलांचा समावेश

Ruturaj Gaikwad CSK vs SRH : ऋतु बहरला, देशपांडेही चमकला; सीएसकेनं बालेकिल्ला परत मिळवला!

SCROLL FOR NEXT