kudus
kudus 
मुंबई

पालघर - कुडूस ग्रामपंचायतीच्या उपसरपंच पदी डॉ. गिरीश चौधरी 

सकाळवृत्तसेवा

वाडा : वाडा तालुक्यातील कुडूस या ग्रामपंचायतीच्या उपसरपंच पदी काँग्रेसचे युवा कार्यकर्ते डॉ.गिरीश चौधरी यांची बिनविरोध निवड करण्यात आली. सरपंच छबी तुंबडा यांच्या अध्यक्षतेखाली आज ग्रामपंचायतीची विशेष सभा घेण्यात आली. या सभेत चौधरी यांची बिनविरोध निवड करण्यात आली. या निवडीमुळे त्यांचे सर्वत्र अभिनंदन केले जात आहे. 

कुडूस ही ग्रामपंचायत श्रीमंत म्हणून संपूर्ण तालुक्यात ओळखली जाते. या ग्रामपंचायतीची सदस्य संख्या बारा आहे. सदस्यांत ठरलेल्या समझोता प्रमाणे पहिले दोन वर्षे तत्कालीन उपसरपंच अंजुमन सुसे यांचा दोन वर्षाचा कालावधी संपुष्टात आल्याने त्यांनी राजीनामा दिला होता.त्यामुळे उपसरपंच पद रिक्त होते. या पदासाठी आज झालेल्या निवडणुकीत डॉ.गिरीश चौधरी यांचा एकमेव अर्ज प्राप्त झाल्याने त्यांची उपसरपंच पदी निवड झाल्याची घोषणा करण्यात आली.  

ग्रामपंचायतीच्या अखत्यारित येणाऱी विकास कामे दलित व आदिवासी वस्तीतील प्रलंबित कामे, गावातील रस्ते, पाणी योजना, स्वच्छता ही कामे अग्रक्रमाने हाती घेऊन स्वच्छ कुडूस व सुंदर कुडूस करण्याचा प्रयत्न करणार असल्याचा मानस डॉ. चौधरी यांनी बोलून दाखविला आहे. 

पालघर जिल्हा परिषदेच्या महिला व बालकल्याण समितीच्या सभापती धनश्री चौधरी, वाडा पंचायत समितीचे उपसभापती जगन्नाथ पाटील, भाजपचे नेते निलेश सांबरे, इरफान सुसे, मुस्तफा मेमन, रामदास जाधव,सामाजिक कार्यकर्ते श्रीकांत भोईर, माजी सरपंच पांडुरंग चौधरी, भगवान चौधरी, नितीन जाधव, नरेश आकरे आदी मान्यवरांनी नवनिर्वाचित उपसरपंच डॉ. चौधरी यांचे अभिनंदन करून त्यांना पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Amit Shah Fake Video: अमित शाहांच्या Edited व्हिडिओबाबत दिल्ली पोलिसांची मोठी कारवाई, गृहमंत्रालयाच्या तक्रारीवरून FIR दाखल

New Zealand squad T20 WC24 : टी-20 वर्ल्ड कप 2024 साठी संघाची घोषणा! 'हा' खेळाडू सांभाळणार कर्णधारपदाची धुरा

Israel-Hamas War: शस्त्रसंधीच्या चर्चा सुरू असतानाच इस्राइलने गाझामध्ये डागली क्षेपणास्त्रे; हल्ल्यात 13 जणांचा बळी, कित्येक जखमी

Chhattisgarh Accident News: कार रस्त्यावर उभी असताना पिकअपची धडक अन्.... भीषण अपघातात ८ ठार, मृतांमध्ये 3 लहान मुलांचा समावेश

Ruturaj Gaikwad CSK vs SRH : ऋतु बहरला, देशपांडेही चमकला; सीएसकेनं बालेकिल्ला परत मिळवला!

SCROLL FOR NEXT