मुंबई

तिन्ही डॉक्‍टर जामिनासाठी सत्र न्यायालयात 

सकाळ वृत्तसेवा

डॉ. तडवी आत्महत्या प्रकरण :
मुंबई -  महापालिकेच्या नायर रुग्णालयातील डॉ. पायल तडवी यांच्या आत्महत्येप्रकरणी अटकेत असलेल्या तिन्ही महिला डॉक्‍टरांनी आता जामिनासाठी सत्र न्यायालयात अर्ज केला आहे. यासंदर्भात 10 जूनला सुनावणी होईल. दरम्यान, आरोपींचा ताबा मिळावा म्हणून गुन्हे शाखेने उच्च न्यायालयात केलेल्या याचिकेवर गुरुवारी (ता. 6) सुनावणी होईल. 

डॉ. पायल यांनी रुग्णालयाच्या वसतिगृहात गळफास घेऊन आत्महत्या केली होती. सतत जातिवाचक शेरेबाजी करून मानसिक छळ होत असल्यामुळे त्यांनी आत्महत्या केली, असा आरोप पोलिसांनी डॉ. भक्ती मेहरे, डॉ. हेमा अहुजा आणि डॉ. अंकिता खंडेलवाल यांच्यावर केला आहे. आग्रीपाडा पोलिसांनी या तिघींविरोधात रॅगिंग आणि "ऍट्रॉसिटी' कायद्याखाली गुन्हा दाखल केला आहे. राज्य सरकारने या प्रकरणाचा तपास आता गुन्हे शाखेकडे वर्ग केला आहे. 

सत्र न्यायालयाने न्यायालयीन कोठडी सुनावलेल्या या तिन्ही महिला डॉक्‍टरांच्या जामीन अर्जावर मंगळवारी सुनावणी झाली. याबाबत पोलिसांना भूमिका स्पष्ट करण्याचे निर्देश सत्र न्यायालयाने दिले. दरम्यान, चौकशीला पुरेसा वेळ मिळाला नाही, म्हणून आरोपींचा पुन्हा ताबा देण्याची मागणी गुन्हे शाखेने उच्च न्यायालयाकडे केली. याबाबत न्या. संदीप शिंदे यांच्यापुढे याचिकेचा उल्लेख करण्यात आला. या याचिकेवर गुरुवारी सुनावणी होईल. 

"काही जणांचे जबाब बाकी' 
डॉ. पायल यांच्या आत्महत्येबाबतची चिठ्ठी पोलिसांना अद्याप मिळालेली नाही. अन्य काही जणांचे जबाब घेणे गरजेचे आहे. त्यामुळे आरोपींचा ताबा द्यावा, अशी पोलिसांची मागणी आहे. केस डायरी आणि शवविच्छेदन अहवालावरून डॉ. पायल यांनी आत्महत्या केल्याचे निदर्शनास येत नाही, असे मागील सुनावणीत पोलिसांनी न्यायालयाला सांगितले होते. त्या वेळी आरोपींना पुन्हा गुन्हे शाखेच्या ताब्यात देण्यास सत्र न्यायालयाने नकार दिला होता. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Eknath Shinde : मुख्यमंत्री झाले गुरुजी, कामियाची घेतली शाळा.. ''पुरणपोली नहीं पुरणपोळी, ठाना नव्हे ठाणे..'' Video Viral

IPL 2024, CSK vs PBKS Live Score: चेन्नईसाठी ऋतुराज-रहाणेकडून दमदार सुरुवात; पंजाबच्या गोलंदाजांचा विकेट्ससाठी संघर्ष

PM Modi Exclusive: क्लिनचिट मी दिलेली नाही.. भ्रष्टाचाराच्या लढ्यावर मोदी अजूनही ठाम, विरोधकांच्या प्रश्नाला थेट उत्तर

आणिबाणी नंतरच्या निवडणुकी नंतर वाळवा तालुक्याला लागली होती लॉटरी; नेमके काय घडले ?

Zapatlela 3 : 'झपाटलेला ३' मध्ये पुन्हा लक्ष्याच ? ; हॉलिवूडनंतर पहिल्यांदाच मराठीत प्रयोग

SCROLL FOR NEXT