East West Corridor connectivity will make travel faster Prime Minister Narendra Modi
East West Corridor connectivity will make travel faster Prime Minister Narendra Modi sakal
मुंबई

PM Narendra Modi : ईस्ट वेस्ट कॉरिडॉर कनेक्टिव्हिटीने प्रवास होणार वेगवान; पंतप्रधान नरेंद्र मोदी

सकाळ वृत्तसेवा

मुंबई : सांताक्रूझ चेंबूर जोडरस्ता प्रकल्प (एससीएलआर) विस्तार या प्रकल्पाच्या पहिल्या टप्प्यातील प्रत्येकी एक मार्गिकेचे लोकार्पण आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते मुंबईतील एका कार्यक्रमात झाले.

महाराष्ट्र राज्य अग्निशामक इमारत ते रजाक जंक्शन पर्यंत उन्नत मार्गाच्या एका मर्गिकेचे आणि बीकेसी ते लाल बहादुर शास्त्री उड्डाणपुलाला जोडणाऱ्या उन्नत मार्गाच्या एका मर्गिकेचा फायदा हा वाहतूक कोंडी फोडण्यासाठी होणार आहे. तसेच पश्चिम द्रुतगती महामार्गावरील मालाड, कुरारगाव येथील पादचारी आणि वाहन भुयारी मार्गाचेही लोकार्पण यावेळी करण्यात आले.

एससीएलआर प्रकल्पाचे लोकार्पण

बीकेसी व कुर्ला भागातील वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी आणि विद्यमान सांताक्रूझ चेंबूर रस्त्या द्वारे (एससीएलआर) पूर्व आणि पश्चिम द्रुतगती महामार्गाना जोडण्यासाठी एमएमआरडीए राज्य शासनाच्या सहकार्याने सांताक्रूझ चेंबूर जोडरस्ता प्रकल्पाचा विस्तार दोन भागात करत आहे.

त्यानुसार पहिल्या भगात ५.९ किमी चा उन्नत मार्ग असणार आहे. सदर प्रकल्पाच्या पहिल्या भागतील वाहतुकीसाठी खुल्या करण्यात आलेला १.८ कि.मी. लांबीचा महाराष्ट्र राज्य अग्निशामक इमारत ते रजाक जंक्शन पर्यंत उन्नत मार्ग (अप रॅम्प) आणि १.८ कि.मी. लांबीचा महानगर टेलिकॉम निगम लि. (बीकेसी) ते लालबहादुर शास्त्री पुलाला (कुर्ला) जोडणारा १.२६ किमीचा उन्नत मार्ग (अप रॅम्प) बांधण्यात आले आहेत.

हे दोन्ही उन्नत मार्ग ज्यांची रुंदी ८.५ मी. इतकी असून ही २ लेनची मार्गिका आज वाहतुकीस खुली करण्यात आली आहे. त्यामुळे या मार्गावर ठिकठिकाणी होणाऱ्या वाहतूक कोंडीच्या समस्येतून वाहन चालकांची मुक्ती होणार आहे. अधिक वेगाने या मार्गावर प्रवास करण्याचा आणखी एक पर्याय वाहन चालकांसाठी उपलब्ध झाला आहे.

कूरारगाव ते मालाड रेल्वस्थानक प्रवासाच्या वेळेत होणार बचत

पश्चिम द्रुतगती महामार्गावरील मालाड येथील कुरारगाव पादचारी भुयारी मार्ग हा अरुंद असल्यामुळे पादचाऱ्यांना ये-जा करणात्याकरिता अडथळा ठरत होता. त्यामुळे मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणामार्फत कुरारगाव येथील अस्तित्वातील पादचारीभुयारी मार्गाचे रुंदीकरण करून २.५ मीटर रुंदीचा पादचारी मार्गासह बांधण्यात आलेला ४० मीटर लांबीचा आणि ३० मीटर रुंदीचा नवीन वाहन भुयारी मार्ग आहे.

सदरचा पादचारी व वाहन भुयारी मार्ग हा कुरारगाव ते मालाड रेल्वे स्थानक यांना जोडत असल्याने या परिसरातील वाहनांसाठी व पादचाऱ्यासाठी सोईस्कर होईल, तसेच त्यांच्या प्रवासाच्या वेळेत २० मिनिटांची बचत होईल.

''एससीएलआर प्रकल्पाच्या पूर्ततेची प्रतीक्षा मुंबईकर खूप दिवसांपासून करत होते अशा या नवीन एलिवेटेड कॉरिडॉरच्या लोकार्पणा मुळे मुंबई मधील ईस्ट वेस्ट कनेक्टिव्हिटी ची गरज पूर्ण होणार असून त्याचा फायदा लाखो मुंबईकर घेतील.

या कॉरिडॉर ने लाखो वाहने प्रवास करतील तसेच त्यांच्या वेळेची आणि इंधनाची बचत होणार आहे. कुरार अंडरपास देखील एक महत्त्वाचा प्रकल्प असून याचा देखील फायदा मुंबईकर नागरिकांना होणार आहे, असे उद्गार पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी यावेळी काढले.

नजीकच्या भविष्यात एमटीएचएल, मुंबई मधील प्रगतीपथावर असलेल्या मेट्रो मार्गिका तसेच इतर पायाभूत सुविधांचे महत्वाकांक्षी प्रकल्प लवकरच पूर्ण करून त्याचे लोकार्पण कर, असे कार्यक्रमा दरम्यान महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले.

वांद्रे कुर्ला संकुलातील एमटीएनएल जंक्शनपासून विद्यमान फ्लायओव्हरपर्यंत सुरू होणारा २ मार्गिकांचा उन्नत कॉरिडॉर प्रवाशांना सध्याच्या एससीएलआर मार्गे बीकेसी ते चेंबूर, टिळकनगर इत्यादी ठिकाणी वाहनांची रहदारी टाळून पूर्वीपेक्षा कमी वेळेत प्रवास करण्यास मदत करेल जेणेकरून त्यांच्या प्रवासाच्या वेळेत २५ मिनिटांहून अधिक बचत होणार आहे.

तसेच कुरार गाव येथील पादचारी भुयारी मार्ग मार्गाचे (Subway) रुंदीकरण केल्यामुळे आता वाहनांना आणि पादचाऱ्यांना याचा फायदा होणार आहे, असे एमएमआरडीएचे महानगर आयुक्त एस. व्ही.आर. श्रीनिवास म्हणाले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

LSG vs MI : मुंबई पॉवर प्लेमध्ये 'पॉवर'लेस; लखनौनं प्ले ऑफचं गणित बिघडवलं?

Modi Latur Rally: "देवानं मला असं मॅन्युफॅक्चर केलंय की..."; PM मोदींनी सांगितलं आपण मोठाच विचार का करतो

Hardik Pandya LSG vs MI : भारतीय संघातील स्थान सेफ होताच हार्दिकचा भोपळा; मुंबईचा संघ आला अडचणीत

Shivam Dube: 'युवराजबरोबर तुलना मुर्खपणाचे...', टी20 वर्ल्ड कपसाठी निवड झालेला शिवम दुबे काय म्हणाला

Loksabha election 2024 : ''जोपर्यंत जिवंत आहे तोपर्यंत मुस्लिमांना एससी, एसटी अन् ओबीसीतून आरक्षण मिळू देणार नाही'' मोदींचा काँग्रेसवर हल्ला

SCROLL FOR NEXT