Nawab Malik
Nawab Malik Sakal
मुंबई

मनी लॉन्ड्रिंग प्रकरणी मलिकांविरोधात 5,000 पानांचे आरोपपत्र दाखल

सकाळ डिजिटल टीम

मुंबई : दाऊद इब्राहिमशी संबंधित कथित मनी लाँड्रिंग प्रकरणात अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) गुरुवारी महाराष्ट्राचे अल्पसंख्याक विकास मंत्री नवाब मलिक यांच्याविरुद्ध आरोपपत्र दाखल केले आहे. मनी लाँड्रिंग प्रकरणात राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते मलिकांना 23 फेब्रुवारी रोजी अटक करण्यात आली असून, सध्या ते न्यायालयीन कोठडीत आहे.

ईडीच्या वकिलांनी सांगितले की, कोर्टाच्या रजिस्ट्रीमध्ये 5,000 पानांचे आरोपपत्र दाखल करण्यात आले असून, मनी लाँडरिंग प्रतिबंधक कायद्याच्या प्रकरणांसाठी विशेष न्यायालय कागदपत्रांच्या पडताळणीनंतर आरोपपत्राची दखल घेईल असे वकिलांनी स्पष्ट केले.

नवाब मलिक यांचे कुटुंबीय तपासात सहकार्य करत नसल्याचे ईडीने म्हटले असून, ईडीने विशेष न्यायालयाला सांगितले की, नवाब मलिकांची मुले अमीर मलिक आणि फराज मलिक अनेक समन्स बजावल्यानंतरही चौकशीसाठी ईडीसमोर हजर झाले नाहीत. मलिकांविरोधात दाखल करण्यात आलेल्या आरोपपत्र एकूण 5 हजार पानी असून, 9 खंड आणि 52 परिशिष्ट आरोपपत्रात समाविष्ट करण्यात आले आहे. मनी लाँड्रिंग प्रकणात मलिक सध्या न्यायालयीन कोठडीत आहेत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Share Market Today: शेअर बाजारात नफा कमावण्याची मोठी संधी; आज 'या' 10 शेअर्सवर ठेवा लक्ष

Latest Marathi News Update : झारखंडमध्ये ईडीचे छापे, मंत्र्याच्या कर्मचाऱ्याकडून करोडोंची रोकड जप्त

Nashik Crime News : बँकेच्या सेफ्टी लॉकरमधील 5 कोटींचे दागिन्यांवर डल्ला! घरफोडीचा गुन्हा दाखल

Poha Chila Recipe : सकाळच्या नाश्त्यामध्ये बनवा हेल्दी अन् टेस्टी पोहा चिला, एकदम सोपी आहे रेसिपी

MS Dhoni IPL 2024 : 'धोनीला 9व्या क्रमांकावर बॅटिंग करायची असेल तर त्याने खेळू नये...', चेन्नईच्या थालावर भडकला मुंबईचा माजी कर्णधार

SCROLL FOR NEXT