मुंबई

भूमिगत मेट्रो खोदकामामुळे वीजवाहिन्या तुटणार नाहीत 

सकाळवृत्तसेवा

मुंबई - पावसाळ्याच्या तोंडावर होत असलेल्या मेट्रोच्या खोदकामामुळे भूमिगत वीजवाहिन्या तुटणार नाहीत, अशी हमी देण्याची मागणी महावितरणने मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाकडे (एमएमआरडीए) केली आहे. 

मुलुंड, भांडुप, ठाणे, नवी मुंबईत महावितरणमार्फत वीजपुरवठा केला जातो. याच मार्गातून मेट्रो- 4 (वडाळा-कासारवडवली) आणि मेट्रो- 6(स्वामी समर्थनगर-विक्रोळी) चे मार्ग जातात. त्यामुळे या मार्गांच्या खोदकामाचा फटका वीजवाहिन्यांना बसणार नाही, याचे आश्‍वासन महावितरणने मागितले आहे. पावसाळ्यात या भागात वीज खंडित झाल्याच्या दरवर्षी मोठ्या संख्येने तक्रारी येतात. त्यामुळे या भागात असे प्रकार घडू नयेत, याची खबरदारीचा उपाय म्हणून एमएमआरडीए काय पावले उचलत आहे? अशी विचारणा महावितरणाने एमएमआरडीएकडे केली आहे. पावसाळ्यात रस्त्यांना पडणारे खड्डे आणि मेट्रोचे खोदकाम; तसेच या भागातील वीज खंडित होण्याची ठिकाणे निश्‍चित केली जात असून, तेथील वीजवाहिनींच्या दुरुस्तीचे काम महावितरणाने हाती घेतले आहे. तसेच खबरदारी म्हणून एमएमआरडीएच्या अधिकाऱ्यांसोबत समन्वय राखला जात असल्याची माहिती महावितरणाच्या अधिकाऱ्यांनी दिली. एमएमआरडीएच्या अधिकाऱ्यांसोबत वेळोवेळी बैठका घेतल्या जात असल्याची माहितीही त्यांनी दिली. पावसाळ्यात वीज खंडित झाल्याने या परिसरातील नागरिकांना कुठल्याही स्वरूपाचा त्रास होणार नाही, यासाठी विशेष काळजी घेण्याचे आदेशही एमएमआरडीच्या वतीने दिले आहेत. सध्या या पट्ट्यातील 45 ठिकाणे निश्‍चित करण्यात आली असून या ठिकाणी वारंवार वीज खंडित होण्याच्या तक्रारी गेल्या काही वर्षांत आढळून आल्या आहेत. त्यामुळे मेट्रोच्या खोदकामाच्या कामासोबतच येथील वीजवाहिन्या दुरुस्तीचे काम हाती घेण्यात आल्याचेही अधिकाऱ्यांनी सांगितले. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

DC vs MI : गोलंदाजीतली 'गळती' मुंबईच्या मुळावर; बॅटिंगमध्ये फर्स्ट क्लास तर बॉलिंगमध्ये नापास

Jolly LLB 3 : आता रंगणार जॉली विरुद्ध जॉली केस; सिनेमाच्या शूटिंगबाबत महत्त्वाची अपडेट आली समोर

Google वर जाहिराती करण्यासाठी भाजपने खर्च केले 100 कोटी; BJP पहिल्या स्थानावर तर काँग्रेस कितव्या स्थानावर? वाचा सविस्तर...

CM Yogi Aadityanath : ''काशी अन् अयोध्येनंतर आता मथुरेकडे प्रस्थान...'' योगी आदित्यनाथांचे स्पष्ट संकेत

Onion Export: केंद्रानं खरंच कांदा निर्यातबंदी उठवली की केवळ निवडणूक जुमला? जाणून घ्या

SCROLL FOR NEXT