Anil Deshmukh
Anil Deshmukh File photo
मुंबई

अनिल देशमुखांविरोधात ईडीकडून गुन्हा दाखल

सुरज सावंत

मुंबई: राज्याचे माजी गृहमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अनिल देशमुख यांच्याविरोधात सीबीआय पाठोपाठ ईडीने (enforcement directorate)गुन्हा दाखल केला आहे. अनिल देशमुख (anil dehsmukh) यांच्यासाठी हा एक झटका आहे. १०० कोटी वसुलींच्या आरोपांचा ईडीही तपास करत होती. याच प्रकरणात हा गुन्हा नोंदवण्यात आला आहे. ईडी आता चौकशीसाठी देशमुख यांना समन्स पाठवू शकते. या प्रकरणात या पूर्वीही सीबीआयने गुन्हा नोंदवला होता. (enforcement directorate file complaint against anil dehsmukh)

मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांच्या आरोपांमुळे अनिल देशमुख अडचणीत आले होते. परमबीर सिंह यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना पाठवलेल्या पत्रात अनिल देशमुखांनी सचिन वाझेंना महिन्याला १०० कोटींच्या वसुलीचे टार्गेट दिल्याचा आरोप केला होता.

परमबीर सिंह यांनी या प्रकरणात उच्च न्यायालयातही याचिका दाखल केली होती. उच्च न्यायालयाने जयश्री पाटील यांच्या याचिकेवर सुनावणी करताना सीबीआयला अनिल देशमुख यांची प्राथमिक चौकशी करण्याचे आदेश दिले होते. त्यानंतर अनिल देशमुख यांना गृहमंत्रीपदाचा राजीनामा द्यावा लागला होता.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Lok Sabha Election : PM मोदींबद्दलच्या टिप्पणीनंतर भाजपमधून हाकालपट्टी, आता पोलिसांनी केली अटक; जाणून घ्या प्रकरण

Aaditya Thackeray : आदित्य ठाकरे कोल्हापुरात; म्हणाले, खोके सरकारने एकही नवा उद्योग आणला नाही

Mumbai Indians : भारी खेळतोय मात्र तिलक वर्मा मुंबई इंडियन्ससाठी 'अनलकी' ठरतोय? पाहा आकडेवारी काय सांगते

NCB अन् ATS ची मोठी कारवाई! गुजरातच्या सीमेवर 80 किलो ड्रग्ससह 14 पाकिस्तानी अटकेत

Lok Sabha Election : AAPने निवडणूक प्रचारासाठी तयार केलेले 'ते' गाणे वापरण्यास निवडणूक आयोगाची मनाई; नेमकं काय आहे प्रकरण?

SCROLL FOR NEXT