मुंबईत लॉकडाउन वाढवण्याचा निर्णय टास्कफोर्सवर अवलंबून?

काय म्हटलय पालकमंत्री अस्लम शेख यांनी ?
अस्लम शेख
अस्लम शेख

मुंबई: मुंबईत लॉकडाउनचा (mumbai lockdown)दुसरा टप्पा येत्या १५ मे रोजी संपतोय. कोरोनाची स्थिती देखील मुंबईत नियंत्रणात आलीय. रुग्णालयात ऑक्सिजन बेड्स, व्हेंटिलेटर्स उपलब्ध आहेत. त्यामुळे लॉकडाउन आता पुढे वाढवणार का? याची चर्चा सुरु झाली आहे. या बद्दल मुंबईचे पालकमंत्री अस्लम शेख यांना विचारले. "कोरोनाची आताची स्थिती नियंत्रणात आलीय. इन्फ्रास्ट्रक्चरची उभारणी करतोय. या सगळ्याचा विचार करण्यात येईल" असे अस्लम शेख (aslam shaikh) म्हणाले. (Will covid taskforce decide about mumbai lockdown aslam shaikh)

"लॉकडाउन पुढे वाढवायचा असेल, तर कुठले निर्बंध शिथील करता येतील, काय उघडता येईल. कुठले निर्बंध अधिक कठोर करता येतील, याचा अभ्यास करतोय. आपल्याकडे टास्क फोर्स आहे. त्यांची मत जाणून घेतोय, त्यामुळे यश मिळत आहे" असे अस्लम शेख म्हणाले.

अस्लम शेख
VIDEO: मुंबईचं ऑक्सिजन मॉडेल नेमकं कसं आहे ? समजून घ्या...

"टास्क फोर्स काय शिफारस करते, त्यावर मंत्रिमंडळाच्या बैठकीत चर्चा करुन पुढील निर्णय घेऊ" असे अस्लम शेख यांनी सांगितले. "लॉकडाउन करण्याचा निर्णय यशस्वी ठरला आहे. मुंबई-महाराष्ट्रात यश दिसून आलं" असा दावा अस्लम शेख यांनी केला.

अस्लम शेख
बदलापुरात १९ वर्षाच्या मुलाने २४ तासात २५ चितांना दिला अग्नि

"सुरुवातीला दररोज १० हजारपेक्षा जास्त रुग्णसंख्या होती. ती आता ३ हजारपर्यंत खाली आला आहे. तिसरी लाट येणार ही शक्यता गृहीत धरुन आम्ही जंम्बो कोविड सेंटरची उभारणी करतोय" असे अस्लम शेख म्हणाले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com