तरुणीवर लैंगिक अत्याचार करणाऱ्या मांत्रिकाला अटक
तरुणीवर लैंगिक अत्याचार करणाऱ्या मांत्रिकाला अटक 
मुंबई

भूतबाधा घालवण्याच्या बहाण्याने सहा महिने लैंगिक अत्याचार

सकाळ वृत्तसेवा

नवी मुंबई : भूतबाधा घालविण्यासाठी पूजापाठ व होमहवन करण्याच्या बहाण्याने एका बोगस मांत्रिकाने खारघरमध्ये राहणाऱ्या ३२ वर्षीय तरुणीवर सहा महिने लैंगिक अत्याचार केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. सुशीलकुमार रमेशचंद्र चौहान (४३) असे या बोगस मांत्रिकाचे नाव असून, पीडित तरुणीवर लैंगिक अत्याचार करून हा बोगस मांत्रिक फरार झाला होता. मात्र, अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक कक्षाच्या विशेष पथकाने त्याला हरिद्वार येथून अटक केली. 

ही ३२ वर्षीय पीडित तरुणी खारघरमध्ये आईसह राहण्यास आहे. गत नोव्हेंबर महिन्यामध्ये पीडित तरुणीच्या वागणुकीत फरक पडल्याने तिच्यावरील उपचारासाठी उत्तर प्रदेशातून सुशीलकुमार चौहान या मांत्रिकाला घरी बोलावून घेतले होते. या मांत्रिकाने तरुणीला भूतबाधा झाल्याचे सांगून तिची भूतबाधा घालविण्यासाठी होमहवन व पूजापाठ करावा लागेल, असे सदर तरुणीच्या आईला सांगितले होते. त्यानुसार तीन-चार वेळेस या मांत्रिकाने होमहवन व पूजापाठ करण्याचा बहाणा केला; मात्र त्यानंतर त्याने संधी साधून या तरुणीला गुंगी येणारे द्रव्य देऊन तिच्यावर लैंगिक अत्याचार केले. त्यातच या बोगस मांत्रिकाच्या लैंगिक अत्याचारात वाढ होऊ लागल्याने या तरुणीने मागील आठवड्यात खारघर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला होता. गुन्हा दाखल झाल्यानंतर हा बोगस मांत्रिक फरार झाला होता. नवी मुंबई पोलिसांच्या विशेष पथकाने त्याला हरिद्वार येथून अटक केली. न्यायालयाने त्याची चार दिवसांच्या पोलिस कोठडीत रवानगी केली आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Jalgaon Major Accident: भरधाव कारच्या धडकेत मजुरी करण्याऱ्या आईसह दोन चिमुकले ठार!

IPL 2024 DC vs RR Live Score: राजस्थानला तगडा धक्का! आक्रमक खेळणारा कर्णधार सॅमसन झाला बाद, शतकही हुकले

Virtual Touch: बालकांना 'व्हर्च्युअल स्पर्शा'च्या धोक्याची जाणीवही करुन देणं गरजेच - हायकोर्ट

Navneet Rana: "काँग्रेसला मत देणं म्हणजे थेट पाकिस्तानला मत देणं"; नवनीत राणांचं वादग्रस्त विधान

यवतमाळ जिल्हा कारागृहातील धक्कादायक घटना; कारागृहातील अधिकारी, कर्मचाऱ्यावर कैद्यांच्या टोळीचा हल्ला

SCROLL FOR NEXT