नवनिर्वाचित महापौरांचे अभिनंदन करताना पदाधिकारी
नवनिर्वाचित महापौरांचे अभिनंदन करताना पदाधिकारी 
मुंबई

भिवंडी पालिकेत आर्थिक घोडेबाजार

शरद भसाळे

भिवंडी : भिवंडी पालिकेच्या महापौर आणि उपमहापौर पदाच्या निवडणुकीत धक्कादायक निकाल लागला. या निवडणुकीत मोठ्या प्रमाणात आर्थिक घोडेबाजार झाल्याने काँग्रेसच्या नगरसेवकांनी पक्षाला लाथाडून सरळ भाजप कोणार्क विकास आघाडीला उघडपणे साथ दिली. त्यामुळे गेल्या अडीच वर्षांपासून सत्तेवर असलेल्या काँग्रेसला लोकसभा, विधानसभा निवडणुकीनंतर पुन्हा एकदा महापालिका महापौर निवडणुकीत जोरदार झटका बसला आहे.

भाजपचे खासदार कपिल पाटील, आमदार महेश चौगुले आणि माजी महापौर विलास आर. पाटील यांनी आघाडीची सत्ता उलथवून चमत्कार केल्याने कोणार्क आघाडीला विजय मिळविता आला. भिवंडी महापालिकेच्या २०१७ मध्ये झालेल्या निवडणुकीत ९० जागांपैकी कॉँग्रेसने ४७ जागा मिळवून बहुमत संपादन केले. तर भाजपने २० शिवसेनेने १२, कोणार्क आघाडी व रिपब्लिकन पक्षाने प्रत्येकी चार, समाजवादी पक्षाला दोन आणि एक अपक्ष नगरसेवक निवडून आले होते. 

त्यामुळे कॉँग्रेसने २०१७ मध्ये शिवसेनेच्या मदतीने महापौरपद मिळविले होते. त्याबदल्यात काँग्रेसने सेनेला उपमहापौरपद दिले. त्यामुळे भाजप व कोणार्क विकास आघाडीला सत्तेपासून दूर राहावे लागले. याची सल भाजप, कोणार्क विकास आघाडीला होती. त्यामुळे आज झालेल्या निवडणुकीत भाजप-कोणार्क विकास आघाडीने काँग्रेसच्या १८ नगरसेवकांना फोडून महापालिकेत सत्ता स्थापन केली आहे. 


विधानसभेपाठोपाठ राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये शिवसेना, राष्ट्रवादी कॉंग्रेस आणि कॉँग्रेस आघाडीची वल्गना करणाऱ्या महाविकास आघाडीच्या नेत्यांना भिवंडीतून जोरदार धक्का बसला आहे. त्यामागे खासदार कपिल पाटील, महेश चौघुले आणि विलास पाटील यांची एकत्रित रणनिती कारणीभूत ठरल्याचे बोलले जात आहे.

जिल्हाधिकारी अडकले 
भिवंडी पालिकेत महापौर व उपमहापौरपदाची निवडणूक गुरुवारी दुपारी १२ वाजता मुंबई उपनगराचे जिल्हाधिकारी शिवाजीराव जोंधळे यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित करण्यात आली होती, मात्र भिवंडीतील खराब रस्ते व वाहतूक कोंडीमुळे निवडणूक निर्णय अधिकारी या निवडणुकीसाठी २० मिनिटे उशिरा पोहचले.

काँग्रेस पक्षाचे व्हीप वाटप
काँग्रेस पक्षाचे गटनेते हलीम अन्सारी यांनी निवडणूक प्रक्रिया सुरू असताना काँग्रेसच्या नगरसेवकांना पक्षाचे व्हीप वाटप सुरू केले. त्यावर काँग्रेसचे नगरसेवक इम्रान खान यांनी आक्षेप घेत व्हीप वाटपाचे काम बंद पाडले. विशेष म्हणजे काँग्रेस गटनेते हलीम अन्सारी यांनी सुरुवातीला काँग्रेस उमेदवार रिषिका राका यांच्या नावाने दोन दिवसांपूर्वी पक्षाचा व्हीप जाहीर केला असताना आज प्रत्यक्षात निवडणुकीच्या दिवशीच वर्तमानपत्रात कोणार्क विकास आघाडीच्या नगरसेविका प्रतिभा विलास पाटील यांना मतदान करा, अशी जाहिरात खुद्द काँग्रेस गटनेत्यांनी दिल्याने तंटा निर्माण झाला होता.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Gorakhpur Express Food Poisoning : अंडा बिर्याणीने केला प्रवाशांचा घात; गोरखपूर एक्स्प्रेसमधील ९० जणांना अन्नातून विषबाधा

Latest Marathi News Live Update: नागपूरकडे निघालेल्या हेलिकॉप्टरचं जालन्यात इमर्जन्सी लँडिंग

Champions Trophy 2025 : जागा ठरली! पाकिस्तानने केली मोठी घोषणा; PCBच्या निर्णयानंतर BCCI उचलणार मोठं पाऊल?

Kansas Bizarre : आधी बायकोची केली हत्या, मग विम्याच्या पैशातून खरेदी केली चक्क 'सेक्स डॉल'.. पोलीसही झाले हैराण!

Shilpa Shetty: शिल्पाच्या मुलाला पंजुर्लीने दिला आशीर्वाद! काय आहे शिल्पाचं कांतारा कनेक्शन ?

SCROLL FOR NEXT