मुंबई

शिकवणी वर्गांची अग्निसुरक्षा वाऱ्यावर 

सुजित गायकवाड

नवी मुंबई -  शहरात सुरू असलेल्या शिकवणी वर्गातील (कोचिंग क्‍लासेस) इमारतींमध्ये आग विझवण्याबाबत प्रणाली सुरू नसल्याचे "टीम सकाळ'ने केलेल्या पाहणीत निदर्शनास आले. नेरूळ, वाशी, ऐरोली येथे सुरू असलेल्या नामांकित शिकवणीच्या इमारतींमध्ये आग लागल्यास ती विझवण्यासाठी आवश्‍यक असलेली यंत्रणाच काम करीत नसल्याचे या भागात काम करणाऱ्या सुरक्षा रक्षकांनी सांगितले. "टीम सकाळ'ने प्रत्यक्ष जाऊन केलेल्या पाहणीत अनेक ठिकाणी आग विझवण्यासाठी बसवलेल्या जलवाहिन्यांमध्ये कागद व कपडे कोंबल्याचे दिसून आले; तर काही इमारतींमध्ये आग लागल्यास खाली उतरण्यासाठी असलेल्या जिन्यांमध्ये वापरात नसलेल्या वस्तू साठवून ठेवल्या आहेत. 

गुजरातमधील सुरत शहरात "तक्षशिला' नावाच्या खासगी शिकवणी वर्गात लागलेल्या भीषण आगीत तब्बल 18 विद्यार्थ्यांचा होरपळून जीव गेला. आग लागल्यानंतर बाहेर पडण्यासाठी मार्ग नसल्याने अनेकांनी इमारतीच्या छतावरून उड्या मारल्यामुळे त्यांचा जीव गेला. या घटनेमुळे सुरतसारख्या सर्वच उपनगरातील खासगी शिकवण्यांच्या अग्निसुरक्षेचा प्रश्‍न ऐरणीवर आला आहे. 

नवी मुंबईत नेरूळ, सेक्‍टर- 20, रेल्वेस्थानकासमोर, वाशी येथे सेक्‍टर- 17, वाशी प्लाझा, ऐरोली येथे सेक्‍टर- 4 यासहित इतर विविध ठिकाणी रहिवासी इमारतींमध्ये शिकवणी वर्ग सुरू आहेत. या शिकवणी वर्गांकरिता कायद्यात तरतूद नसल्याचा गैरफायदा घेत वाट्टेल त्या ठिकाणी शिकवणी वर्ग सुरू केले जात आहेत; मात्र शिकवणी सुरू करताना विद्यार्थ्यांच्या सुरक्षेला तिलांजली दिली जात आहे. 

नेरूळ रेल्वेस्थानकासमोर नवी मुंबईतील सर्वाधिक शिकवणी वर्ग सुरू आहेत. मोरेश्‍वर आपार्टमेंट, ओम शिवम सेंटर, ओमसाई दत्त निवास, चंद्राई आर्केड, शंकर ठाकूर सदन, इंद्रप्रस्थ बिल्डिंग आदी इमारतींमध्ये सुरू असलेल्या खासगी शिकवण्यांची पाहणी केली. मोरेश्‍वर अपार्टमेंटच्या विंग ए व बीमध्ये तळमजल्यावरच शिकवणी वर्गाच्या कार्यालयासमोर जिन्यात जुन्या वस्तू गोदामासारख्या साठवल्या आहेत. 

चार मजल्यांच्या या इमारतीमध्ये रहिवासीसुद्धा राहतात. वरच्या दुसऱ्या व तिसऱ्या मजल्यावर शिकवणीचे वर्ग भरवले जातात; परंतु या इमारतीमध्ये आग विझवण्यासाठी यंत्रणेचे लवलेश कुठेच दिसला नाही. उलट आग लागल्यास खाली उतरताना जिन्यातूनही एकाच वेळेला दोन जण येऊ शकतात, एवढीच जागा शिल्लक आहे. या शिकवण्यांमध्ये सीईटी, जेईई, एनईईटी, पदवी व पदव्युत्तर शिक्षणाचे प्रशिक्षण दिले जाते. त्याकरिता मुंबई, ठाणे, पनवेल व उरणपासून शेकडो विद्यार्थी रोज शिक्षण घेण्यासाठी येत आहेत. 

करिअर इन्स्टिट्यूट असलेल्या ओम शिवम सेंटर इमारतीमध्येही आग विझवण्यासाठी लावण्यात आलेल्या जलवाहिन्यांमध्ये कापडे कोंबून तोंडे बंद केली आहेत. जिन्याखालीच अनेक भंगार वस्तू ठेवल्या आहेत. रेल्वेस्थानकासमोरील या सर्व इमारती एकमेकीला लागून आहेत. दाटीवाटीने बांधकाम केल्यामुळे एका इमारतीला लागलेली आग वेळीच रोखली नाही, तर सर्व इमारती भस्मसात होतील, अशी परिस्थिती नेरूळमध्ये आहे. 

वाशी, सेक्‍टर- 9 व सेक्‍टर- 10 मध्ये सुरू असलेल्या इमारतींमधील छत पत्रा लावून बंद केले असल्याने दुर्घटना घडल्यास बाहेर पडण्यासाठीही वाट उरलेली नाही. 

सुरतमधील घटनेनंतर शहरात सुरू असलेल्या सर्व खासगी शिकवणी वर्गांची तपासणी करण्याचे आदेश अग्निशमन विभागाला दिले आहेत. कोणी आग विझवण्याबाबत खबरदारी घेतली नसेल, तर त्यांच्यावर कडक कारवाई करण्यात येईल. 
- डॉ. एन. रामास्वामी, आयुक्त 

सरकारी नियम धाब्यावर 
सर्वाधिक खासगी शिकवण्या नेरूळ शहरात रेल्वेस्थानकांसमोरील इमारतींमध्ये आहेत. या शिकवणी वर्गांच्या खालीच बऱ्याच ठिकाणी अंडा-बुर्जीच्या हातगाड्या, चिकन तंदुरीची दुकाने, छोटी कॅन्टीन आदी दुकाने आहेत. यात बेकायदा पद्धतीने गॅस सिलिंडरवर अन्न शिजवले जाते. कोणतीही खबरदारी नसल्यामुळे अचानक आग लागल्यास मोठ्या दुर्घटनेची शक्‍यता नाकारता येत नाही. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Lok Sabha Hatkanangale: निवडणुकीच्या रिंगणात असलेल्या राजू शेट्टींना चित्रपटात काम करावसं का वाटलं? जाणून घ्या

Gulabrao Patil: भाजपवाल्यांनी काम केलं नाही तर आम्ही... गुलाबराव पाटलांच्या वक्तव्यामुळे BJP कार्यकर्त्यांमधे संभ्रम

Bajrang Punia Suspended : बजरंग पुनियाचे स्वप्न भंगले... डोपिंग टेस्ट न केल्याने निलंबित

Summer Fashion Tips : उन्हाळ्यात कूल आणि स्टायलिश दिसायचंय? मग, अशा प्रकारच्या कलर पॅटर्न्सची करा निवड

Raju Shetti in Hatkanangale: 'राजकारणात यायचं म्हणजे गेंड्याची कातडी लागते'; राजकारण की चळवळ, राजू शेट्टींची कशाला पसंती?

SCROLL FOR NEXT