मुंबई

Mumbai Rains : पावसामुळे मुंबई विमानतळाचे वेळापत्रक कोलमडले

सकाळ वृत्तसेवा

मुंबई : मुंबईत सुरु असलेल्या मुसळधार पावसामुळे विमानतळाचा मुख्य धावपट्टी गुरुवारपर्यंत बंद राहणार आहे. मुंबईतील विमानतळावर स्पाईसजेट कंपनीचे जयपूर ते मुंबई विमान सोमवारी रात्री धावपट्टीवरून घसरले. यामुळे मंगळवारी रात्रीपर्यंत छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावरील 52 उड्डाणे रद्द, 55 विमानांचे मार्ग बदलले तर 100 हून अधिक विमानांच्या वेळात बदल तसेच स्पाईसजेटचे विमान दुरुस्तीसाठी एअर इंडियाचा चमू मंगळुरूहून मुंबईत दाखल झाले आहेत.

सोमवारी रात्री 11.45 च्या सुमारास मुसळधार पावसामध्ये स्पाइस जेटचे विमान लँडिंग करताना धावपट्टीवरुन उतरले होते. बोईंग 737-800 हे विमान अजूनही धावपट्टीवर अडकून पडले आहे. मुसळधार पावसामुळे रविवारी रात्रीपासूनच व्हिजिब्लिटी कमी झाली आहे. असे असताना देखील विमानाला धावपट्टीवर उतरण्याची परवानगी देण्यात आली होती. मुंबई विमानतळाची धावपट्टी 2 हजार 290 मीटर इतकी असल्याची माहिती मुंबईतील विमानतळ अधिकाऱ्यांनी दिली.

तसेच पावसामुळे विमान रद्द झाल्यासंदर्भात प्रवाशांकडून आरक्षण रद्द शुल्क आकारले जाणार नाही. मुंबईच्या विमानतळावरुन दररोज सरासरी 950 विमानांची ये-जा होते. परंतु पावसामुळे रविवार मध्यरात्रीपासून ते सोमवार सायंकाळपर्यंत 265 विमानांना विलंब झाला. त्यापैकी 152 विमानांचे उड्डाण तर 113 येणाऱ्या विमानांचा समावेश होता.

सर्वाधिक विलंब मध्यरात्रीपासून पहाटे साडेपाच या कालावधीत झाला. परंतु आयएलएस प्रणाली असल्याने कमी दृश्यतेतही एकही विमान रद्द झाले नाही अथवा मार्ग बदलावा लागला नाही.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Jalgaon Major Accident: भरधाव कारच्या धडकेत मजुरी करण्याऱ्या आईसह दोन चिमुकले ठार!

IPL 2024 DC vs RR Live Score: कुलदीप यादवचा राजस्थानला दुहेरी धक्का! एकाच षटकात दोन फलंदाजांना धाडलं माघारी

Virtual Touch: बालकांना 'व्हर्च्युअल स्पर्शा'च्या धोक्याची जाणीवही करुन देणं गरजेच - हायकोर्ट

Navneet Rana: "काँग्रेसला मत देणं म्हणजे थेट पाकिस्तानला मत देणं"; नवनीत राणांचं वादग्रस्त विधान

यवतमाळ जिल्हा कारागृहातील धक्कादायक घटना; कारागृहातील अधिकारी, कर्मचाऱ्यावर कैद्यांच्या टोळीचा हल्ला

SCROLL FOR NEXT