hema upadhyay and chintan upadhyay
hema upadhyay and chintan upadhyay sakal
मुंबई

Hema Upadhyay Murder: विभक्त पत्नी आणि वकिलाच्या हत्येप्रकरणी सुप्रसिद्ध चित्रकाराला जन्मठेपेची शिक्षा! नाल्यात सापडले होते मृतदेह

सकाळ वृत्तसेवा

मुंबई - मुंबईतील दिंडोशी न्यायालयाने चित्रकार चिंतन उपाध्याय यांना त्यांची विभक्त पत्नी हेमा उपाध्याय आणि त्यांच्या वकिलांच्या हत्येचा कट रचल्याप्रकरणी जन्मठेपेची शिक्षा ठोठावण्यात आली आहे. अतिरिक्त सत्र न्यायाधीश एस वाय भोसले यांनी मंगळवारी हेमा उपाध्याय आणि त्यांचे वकील हरीश भंभानी यांच्या हत्येच्या खटल्यात शिक्षा सुनावली आहे.

आरोपी चिंतन उपध्यायसह अन्य 3 आरोपी विजय राजभर, प्रदीप राजभर आणि शिवकुमार राजभरना सुद्धा जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे. हेमा उपाध्याय हत्याकांड प्रकरणी 5 ऑक्टोबर रोजी दिंडोशी न्यायालयाने सुनावणी पूर्ण करत आरोपी चिंतन उपाध्यायला दोषी ठरवले होते. न्यायालयाने आरोपी चिंतनला विभक्त पत्नी हेमा उपाध्याय आणि वकिल हरेश भंबानी यांच्या हत्येचा कट रचल्याच्या आरोपात दोषी ठरवले होते.

युक्तिवाद

आरोपींने या प्रकरणी एका वकिलाचीही हत्या केली आहे. हा एकप्रकारे न्यायव्यवस्थेवरील हल्ला आहे. परिणामी आरोपींना फाशीची शिक्षा देण्याची मागणी सरकारी वकिलांनी न्यायालयात केली आहे. हेमा आणि तिच्या वकिलाच्या हत्येचा छडा लावू न शकलेल्या पोलिसांनी आपल्या वैवाहिक कलहाचा गैरफायदा घेतला.

तसेच आपल्याला लक्ष्य करून याप्रकरणी गोवले, असा दावा चिंतन याच्या वकीलाकडून न्यायालयात केला होता. अटकेनंतर पोलिसांनी बळजबरीने आपला कबुली जबाब घेतला. त्यासाठी पोलिसांनी आपला अतोनात छळ केल्याचा दावाही उपाध्याय याने केला होता.

प्रकरण थोडक्यात

हेमा आणि भंबानी यांची 11 डिसेंबर 2015 रोजी हत्या करण्यात आली होती. तसेच त्यांचे मृतदेह एका खोक्यात ठेवून कांदिवली परिसरात फेकण्यात आले होते. या प्रकरणी मुख्य आरोपी विद्याधर राजभरला अटक करण्यात आली. त्यानंतर तपासा दरम्यान हेमा हिच्या हत्येचा कट रचल्याच्या संशयावरून पोलिसांनी उपाध्याय याला अटक केली होती.

उपाध्याय याला वैवाहिक वाद संपवायचा होता. म्हणूनच त्याने हेमाच्या हत्येचा कट रचल्याचा पोलिसांचा आरोप होता. या प्रकरणी 6 वर्षे तुरूंगवास भोगल्यानंतर सर्वोच्च न्यायालयाने चिंतन उपाध्यायला जामीन मंजूर केला होता.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2024, KKR vs SRH: कोण गाठणार फायनल? कोलकता-हैदराबादमध्ये रंगणार ‘क्वॉलिफायर वन’चा थरार

Pune Porsche Car Accident : ''जबाबदार लोकप्रतिनिधी म्हणून मी घटनास्थळावर पोहोचलो अन्...'', आमदार टिंगरेंनी अपघाताबद्दल आरोपावर स्पष्टच सांगितलं

Beed Bogus Voting : ''बोगस वोटिंग प्रकरणात कठोर कारवाई करा'' बीडच्या प्रकरणात शरद पवारांनी घातलं लक्ष

Nashik Crime News: आयुक्तालय हद्दीत आचारसंहिता भंगचे 7 गुन्हे! विविध पोलीस ठाण्यांमध्ये अदखलपात्र गुन्हे दाखल

Julian Assange : 'विकीलिक्स'चे संस्थापक असांज यांना लंडनमधील कोर्टाचा मोठा दिलासा! प्रत्यार्पणाला देता येणार आव्हान

SCROLL FOR NEXT