mumbai
mumbai sakal
मुंबई

कसे जाऊया डोंबिवली ला ट्रेन ने की रोडने बाप्पा यावेळी बोटीने जाऊ; बाप्पाचे उंदीर मामास सल्ला

शर्मिला वाळुंज

डोंबिवली : घरोघरी गणपती विराजमान झाले असून भक्तगण त्यांची मनोभावे पूजा करताना दिसत आहेत. डोंबिवलीतील भक्तांकडे जायचे कसे असा प्रश्न उंदीर मामाला पडला असून बाप्पाचे वाहन असलेल्या उंदीर मामा बाप्पाला विचारतात कसे जाऊया डोंबिवलीला ट्रेन ने की रोडने ? यावर बाप्पा त्यांना यावेळी बोटीने जाऊ...असा सल्ला देत आहेत. या संदेशाचा देखावा सध्या समाज माध्यमावर व्हायरल होत आहे. हा देखावा कधीचा, कोणी साकारला आहे याची माहिती नसली तरी, सध्याचे शहराचे भयाण वास्तव त्यातून मांडले गेल्याने त्याची चर्चा रंगली आहे. यामुळे प्रशासन आत्ता तरी जागे होणार आहे का? शहरातील रस्त्यांची परिस्थिती सुधारलेली नागरिकांना पहायला मिळणार आहे का ? असा सवाल उपस्थित होत आहे.

देशभरात तसेच परदेशात गणपती उत्सव मोठ्या भक्तीभावात साजरा होत आहे. स्वातंत्र्याचे अमृत महोत्सवी वर्ष तसेच गेले दोन वर्षे असलेला कोरोनाचा काळ त्यावर केलेली मात आदि घटना देखाव्यातून मंडळांनी तसेच घरगुती सजावटीमध्ये नागरिकांनी मांडल्याचे पहायला मिळाले आहे. एवढेच नाही तर राजकीय घडामोडींवर देखील कल्याण मधील विजय तरुण मित्र मंडळाने देखावा साकारल्याचे दिसून आले आहे. त्यातच सध्या समाज माध्यमावर एका देखाव्याचा फोटो व्हायरल होत आहे. यामध्ये कल्याण डोंबिवलीतील रस्त्यांचे वास्तव मांडण्यात आले आहे. शहरातील रस्त्यांची दुरावस्था आणि लोकलची गर्दी हे डोंबिवलीकरांना भेडसावणारे मोठे प्रश्न असून त्यावर अद्यापही तोडगा निघाला नाही. लोकलची जीवघेणी गर्दी आणि ती गर्दी टाळण्यासाठी रस्ते वाहतूकीचा पर्याय निवडावा तर रस्त्यांवरील खड्डे आणि वाहतूक कोंडीत खर्ची होणारा वेळ यामध्ये डोंबिवलीकर अडकले आहेत. त्यातून त्यांची सुटका करण्यासाठी विकासकामांच्या घोषणा केल्या जात आहेत, मात्र ही विकासकामे कधी पूर्ण होणार याविषयी मात्र कोणीच ठोस सांगत नसल्याने नागरिक हैराण झाले आहेत.

गणशोत्सव जवळ आला की रस्त्यांवरील खड्डे बुजविण्याच्या घोषणा केल्या जातात. त्यासाठी कोटीच्या कोटी टेंडर निघतात. पण खड्डे समस्या कायम असते. कल्याण-डोंबिवली आणि ग्रामीण परिसरात आजही रस्त्यावर खड्डे कायम आहे. बाप्पाचे आगमन झाले, गौरी आल्या मात्र रस्त्यावरील खड्डे काही पालिकेने बुजलेले दिसलेले नाहीत. याच प्रश्नावरून डोंबिवली मधील बाप्पाचा देखावा व्हायरल होत आहे. बाप्पा होडीत विराजमान असून वर्षांनुवर्षे कायम असलेले दोन प्रश्न,समस्या देखाव्यात सादर केल्या आहेत. डोंबिवलिकरांना भेडवसणाऱ्या महत्वाच्या समस्या म्हणजे लोकल मधील गर्दी आणि रस्त्यावरील खड्डे. याच वरून बाप्पाचे आणि उंदीर मामाचे संभाषण देखाव्यात सादर केले आहे. दरम्यान हा देखावा कोणी केला आहे आणि कधीचा आहे, हे समजलेले नाही. मात्र सध्याच्या परिस्थितीवर भाष्य करणारा असल्याने तो प्रचंड व्हायरल होत आहे. पाऊस पडला की खड्डे आणि उघडीप झाली की धूळ अशी परिस्थिती कल्याण डोंबिवली आणि ग्रामीण भागात आहे. यामुळे आता तरी सरकार याकडे गांर्भीयाने पाहणार का असा सवाल उपस्थित केला जात आहे.

काय आहे संभाषण....

उंदीर मामा - बाप्पा कसे जाऊया डोंबिवली ला ?

ट्रेन ने की रोड ने?

बाप्पा = वेडा आहेस का तू ?

ट्रेनमध्ये गर्दी ने तु गुदमरून जाशील,

डोंबिवलीला उतरताच येणार नाही.

आणि रोडने गेलास तर ट्रैफिक जाम वरुन

खड्ड्यांमध्ये धडपडशील

आयडिया ! यावेळेस आपण बोटीने जाऊ

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Kiran Sarnaik: आमदार किरण सरनाईक यांच्या कुटुंबातील ४ जणांचा अपघातात मृत्यू! पातूरमध्ये भीषण अपघात

Pune Traffic Update: उद्यापासून पुणे वाहतुकीत गर्डर लॉचिंग कामामुळे मोठे बदल, कोणते असतील पर्याय मार्ग?

Kapil Sharma : 'द ग्रेट इंडियन कपिल शो'साठी कपिल शर्मा घेतो 'इतकं' मानधन !

Chitra Wagh: "चित्रा वाघ यांनी माफी मागावी अन्यथा..."; 'पॉर्नस्टार' प्रकरणावर अभिनेत्याचा गंभीर इशारा

RBI: गुंतवणूकदार मालामाल! रिझर्व्ह बँकेचा एक निर्णय अन् कंपनीचे शेअर्स तुफान तेजीत

SCROLL FOR NEXT