Ganesh-Naik
Ganesh-Naik 
मुंबई

नाईकांपुढे युतीच्या नमो पॅनेलची उडाली दाणादाण; करिष्मा कायम!

सकाळ वृत्तसेवा

नवी मुंबई : भाजपच्या वाटेवर असलेले माजी मंत्री गणेश नाईक यांचा करिष्मा नवी मुंबई स्पोर्टस असोसिएशनच्या निवडणुकीनिमित्ताने पुन्हा एकदा नवी मुंबईकरांना पाहायला मिळाला आहे. नवी मुंबईतील पहिले क्रीडा संकुल असा नावलौकिक असलेल्या 'एनएमएसए'च्या कार्यकारणी निवडणुकीत नाईक समर्थक डॉ. दिलीप राणे पॅनेलने युतीच्या नेत्यांच्या नमो पॅनलचा अक्षरशः धुव्वा उडवला.

उपाध्यक्षासहीत इतर कार्यकारणी सदस्य अशा एकूण 12 जागांसाठी झालेल्या निवडणुकीत नमो पॅनेलला एकही जागा निवडून आणता आली नाही. या निवडणुकीत शिवसेनेचे जिल्हाप्रमुख विठ्ठल मोरे आणि भाजपचे जिल्हाध्यक्ष रामचंद्र घरत या दोघांनाही धुळ चारल्याने नाईक पुन्हा एकदा 'जायंट किलर' ठरले आहेत. 

तब्बल 36 वर्षांपूर्वी वाशी येथे स्थापन झालेल्या नवी मुंबई स्पोर्टस असोसिएशन हे नवी मुंबईतील सर्वात जुने क्रीडा संकुल आहे. गणेश नाईक या संकुलाचे अध्यक्ष असून गेली अनेक वर्षे त्यांच्या अधिपत्याखाली या संकुलाचा कारभार चालवला जातो. कार्यकारणीची मुदत संपल्यामुळे उपाध्यक्ष, खजिनदार व सरचिटणीस यांचसहीत सदस्य असे एकूण 12 जागांसाठी निवडणुक संपन्न झाली. परंतु, या निवडणुकीत पहिल्यांदाच नाईकांच्या पॅनेलसमोर युतीच्या नवी मुंबईतील तगड्या नेत्यांनी कंबर कसल्यामुळे नाईकांना कडवे आव्हान दिले होते.

तसेच नाईक भाजप प्रवेशाच्या मार्गावर असल्यामुळे या निवडणुकीतील विजय-पराजय त्यांच्या प्रवेशावर परिणाम करण्याचा काही भाजप नेत्यांचा प्रयत्न असल्यामुळे ही निवडणूक प्रतिष्ठेची झाली होती. त्यामुळे क्रीडा संकुलातील गैरव्यवहार, मर्जीतील लोकांना कंत्राटांचे वाटप, अंतर्गत कुरघोडी चव्हाट्यावर आल्या होत्या. नमो पॅनेलकडून राणे पॅनेलची उणीधुणी काढण्यात आली होती. परंतु तरीदेखील एनएमएसएच्या मतदारांनी राणे पॅनेलला पसंती दर्शवून नमो पॅनेलच्या नेत्यांना हादरा दिला आहे. या निवडणुकीत राणे पॅनेलचे 12 पैकी 11 जण बहुमताने निवडून आले आहेत. तर अपक्ष म्हणून उभ्या असलेल्या शिल्पा केनिया या निवडून आल्या. 

नमो अंगलट येणार ? 
नवी मुंबई स्पोर्टस असोसिएशनच्या निवडणूकीत युतीच्या नेत्यांतर्फे 'नमो' नावाचा केलेला वापर अंगलट येण्याची शक्‍यता आहे. या नावाच्या वापराला पक्षातर्फे कोणीही अधिकृत परवानगी दिलेली नसल्याचे सूत्रांकडून समजले आहे. परवानगी न घेता नमोचा वापर केल्यामुळे भाजपच्या पदाधिकाऱ्यांची चौकशी करण्यासाठी एका निरीक्षकाची नियुक्ती केल्याचे समजते आहे. तसेच बेकायदा पद्धतीने नाव वापरल्यामुळे भाजपचे जिल्हाध्यक्ष रामचंद्र घरत यांच्या पदावर गंडांतर येण्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे.

तसेच शिवसेनेतर्फेही जिल्हाप्रमुख विठ्ठल मोरे यांच्यावर पक्षश्रेष्टी नाराज असल्याचे समजते. आपल्यावर कारवाई होऊ नये, म्हणून या नेत्यांची वाशीतील विविध हॉटेलांमध्ये बैठकी सुरू होत्या. याबाबत घरत यांच्याशी संपर्क केला असता होऊ शकला नाही. 

नवी मुंबई स्पोर्टस असोसिएशनच्या निवडणूकीतील पॅनेलला देण्यात आलेल्या 'नमो' नावाचा आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नावातून तयार झालेल्या नमो नावाचा काहीही संबंध नाही. नमो नावाने समाजकार्य करणाऱ्या पदाधिकाऱ्यांना आम्ही याबाबत अवगत केले आहे. त्यामुळे नाव वापरल्याने भाजपतर्फे कारवाई करण्याचा प्रश्‍न उद्भवत नाही. आम्ही निवडणुकींच्या माध्यमातून क्रिडा संकुलातील वाईट पद्धती बाहेर काढण्याचा प्रयत्न केला. 
- विठ्ठल मोरे, उमेदवार, नवी मुंबई स्पोर्टस असोसिएशन

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Loksabha election 2024 : ''आम्ही खोक्यांच्या मागे गेलो नाहीत; कारण...'', 'सकाळ'च्या मुलाखतीत विनायक राऊत स्पष्टच बोलले

IPL 2024 PBKS vs CSK Live Score : धोनी गोल्डन डक; जडेजामुळे चेन्नईने मारली 168 धावांपर्यंत मजल

Akshaya Tritiya 2024 : अक्षय्य तृतीयेचा भगवान कुबेरांशी काय संबंध आहे? जाणून घ्या कारण

Job Discrimination : मुंबईत नोकरीसाठी मराठी माणसालाच नो एन्ट्री करणाऱ्या कंपनीला शिकवला धडा, एचआरने मागितली माफी!

Latest Marathi News Live Update : ठाणे, रायगडला उष्णतेचा एलो अलर्ट

SCROLL FOR NEXT