मुंबई

मुंबईतल्या रेल्वे परिसरातील कचऱ्याची समस्या संपणार कधी? प्रवासी संघटना आक्रमक

कुलदिप घायवट

मुंबई:  रेल्वे स्थानकावर प्रवाशांची संख्या कमी असल्याने स्थानके स्वच्छ दिसून येत आहे. सीएसएमटी, भायखळा, शिवडी या स्थानकाचा कायापालट होण्यास सुरुवात झाली आहे. मात्र मध्य रेल्वे मार्गावरील अनेक स्थानकांवर आणि रेल्वे परिसरात अस्वच्छता दिसून येते. स्थानकावर तंबाखूजन्य पदार्थांचे थुंकण्याचे दाग, रेल्वे परिसरात कचऱ्याच्या पिशव्या, स्थानकाचा रंग उडालेला आहे. त्यामुळे स्थानकाची स्वच्छता करून, कचरा करण्याऱ्यांवर कारवाई करण्यात यावी. तेव्हाच स्थानकांचा कायापालट होऊ शकेल, अशी प्रतिक्रिया प्रवाशांकडून उमटत आहे. 

मध्य रेल्वे मार्गावरील स्वच्छता कर्मचारी स्वच्छता करताना दिसून येत आहेत. कचरा उचलणे, रेल्वे फलक पुसणे सुरु आहे. मात्र हार्बर मार्गावरील स्थानके अजूनही दुरावस्थेत आहेत. वडाळा-शिवडी रेल्वे मार्गा दरम्यान, खडवली-टिटवाळा दरम्यान रेल्वे मार्गावर कचऱ्याची समस्या दिसून येत आहे. रेल्वे मार्गावर राहणारे लोक रेल्वे परिसरात कचऱ्याच्या पिशव्या टाकतात. परिणामी, रेल्वे मार्गावर कचऱ्याचा ढीग जमला आहे. कचरा फेकणाऱ्यांवर महापालिका आणि रेल्वे प्रशासनाने समन्वय साधून कारवाई करावी, अशी भूमिका प्रवासी संघटना मांडत आहेत. 

सध्या लोकलमधून खूप कमी प्रमाणात प्रवासी प्रवास करत आहेत. त्यामुळे स्थानकावर स्वच्छता दिसून येत आहे. काही स्थानके अजूनही दुरावस्थेत आहेत. रेल्वे परिसरात, रेल्वे मार्गात कचरा साचलेला आहे. हा कचरा बाहेरील लोक टाकतात. त्यांच्यावर रेल्वे प्रशासनाने, रेल्वे सुरक्षा बलाने कारवाई केली पाहिजे.
सुभाष गुप्ता, अध्यक्ष, रेल यात्री संघ 

स्थानकाची सातत्याने देखभाल करणे आवश्यक आहे. जेणेकरून स्थानक नेहमी स्वच्छ दिसतील. रेल्वे परिसरात कचऱ्याच्या पिशव्या दिसून येतात. त्यामुळे रेल्वे मार्ग अस्वच्छ दिसतो. स्थानकांना रंगरंगोटीचे काम पुन्हा नव्याने करणे आवश्यक आहे. यासह कसारा दिशेकडील स्थानकावर पाणपोईची व्यवस्था वाढविणे आवश्यक आहे. 
राजेश घनघाव, अध्यक्ष, कल्याण-कसारा-कर्जत प्रवासी महासंघ

हेही वाचा- लॉकडाऊनमध्ये कुटुंबाची झोपमोड, घोरण्याच्या समस्येत 20 टक्क्यांनी वाढ

मला स्वच्छता ठेवण्यास आवडते. त्यामुळे माझे स्थानक देखील स्वच्छ ठेवणे मला आवडते. शिवडी स्थानकात बदली झाल्यानंतर स्थानकात अनेक बदल केले. प्रत्येक कर्मचाऱ्याला, प्रवाशांना स्थानक स्वच्छ राखण्याचे आवाहन केले. स्वतः स्थानकात फिरून रंगरंगोटीचे काम केले. त्यामुळे हार्बर मार्गावरील शिवडी स्थानक चमकू लागले आहे. 
एन. के. सिन्हा, स्थानक प्रबंधक, शिवडी  

---------------------------

(संपादन- पूजा विचारे)

Garbage in Mumbai local railway area travel organization

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Loksabha election 2024 : ''जोपर्यंत जिवंत आहे तोपर्यंत मुस्लिमांना एससी, एसटी अन् ओबीसीतून आरक्षण मिळू देणार नाही'' मोदींचा काँग्रेसवर हल्ला

T20 World Cup 2024: 'हार्दिकच्या जागेसाठी मोठी चर्चा, तर सॅमसन...', टीम इंडिया निवडीवेळी काय झालं, अपडेट आली समोर

LSG vs MI IPL 2024 Live : नेहलची झुंजार खेळी, टीम डेव्हिडची हाणामारी; मुंबईनं लखनौसमोर ठेवलं 145 धावांचे आव्हान

Covishield Vaccine : शरीरात रक्ताच्या गाठी होण्याचा धोका अन् हृदयासह मेंदूवर दुष्परिणाम; कोविशिल्ड लशीमुळे होणारा TTS काय आहे?

KL Rahul T20 WC 2024 : शुन्य दिवसांपासून... भारतीय संघाची घोषणा होताच लखनौने वगळलेल्या केएलसाठी केली पोस्ट

SCROLL FOR NEXT