मुंबई : गेली सात ते आठ वर्षापासून नाताळ काळात सांताक्लॉज बनून लोकांच्या आयुष्यात आनंद देणारे सायन फ्रेंड सर्कलचे अध्यक्ष अशोक कुर्मी यांनी खाऊचे वाटप न करता मास्क आणि सॅनिटायझरचे वाटप केले आहे. ख्रिस्ती बांधवांचा नाताळ हा सण दोन दिवसांवर आहे. दरवर्षी उत्साहात पार पडणारा हा सण खाऊ आणि विविध भेट वस्तू देणारा सांताक्लॉज हा ख्रिसमसमध्ये लहानग्यांपासून मोठ्यांना हवाहवासा वाटत असतो . मात्र, यंदा कोरोनामुळे शासनाच्या नियमांचे पालन केले जाईल. मात्र, त्यातही नाताळ अगदी उत्साहात साजरा केला जावा आणि तेही सर्व नियम पाळून यासाठी कुर्मी यांनी मुंबईतील अनेक गर्दीच्या ठिकाणी सांता बनून कोरोनाबाबतचे मार्गदर्शन केले. मुंबईतील धारावी, कुर्ला, कलानगर, दादर, सायन, सीएसएमटी स्थानक येथे जाऊन लोकांना कुर्मी आणि त्यांच्या संस्थेतील सहकाऱ्यांनी मास्क आणि सॅनिटायझरचे वाटप केले.
सायन फ्रेंड सर्कलचे अध्यक्ष अशोक कुर्मी हे गेल्या सात ते आठ वर्षांपासून सांताक्लॉज बनून नाताळनिमित्त मुलांना खाऊ आणि खेळण्याचे वाटप करतात. पण, यंदा ख्रिसमसनिमित्त गेल्या 7 डिसेंबरपासून शीव, धारावी, माटुंगा, वडाळा, सीएसएमटी अशा विविध भागांत जाऊन मास्क, जंतुनाशक, मास्क आणि सामाजिक अंतर ठेवण्याचं संदेश देत फिरत आहेत . आतापर्यंत २०० हून अधिक बस आणि तितकेच बसस्टॉप आणि सार्वजनिक वाहनांचे त्यांनी निर्जंतुकीकरण केले. सांता बनलेल्या कुर्मी यांनी यंदाच्या उपक्रमाबाबत सांगितलं की, 'मी गेल्या 7 ते 8 वर्षांपासून मुंबईतील लोकांना स्टेशनरी किंवा इतर गरजेच्या वस्तूंचे वाटप करत होतो. पण, यंदा कोरोनामुळे मास्क आणि सॅनिटायझर वाटण्याचा निर्णय घेत आतापर्यंत १६०० हून अधिक मास्कचे वाटप केले आहे. तर, किमान ५०० हून अधिक सॅनिटायझर दिले आहेत. रस्त्यावर अनेकजण मास्कशिवाय बिनधास्त फिरतायत . त्यामुळे ही कल्पना डोक्यात आली. यंदा सांताक्लॉज सगळ्यांच्या आयुष्यात आनंदासोबत सुरक्षिततादेखील घेऊन येणार आहे . २५ डिसेंबरपर्यंत हा उपक्रम राबवला जाईल.
--------------------------------------------------------------
( संपादन - तुषार सोनवणे )
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.